niyojanbhan321अनेकदा सेवानिवृत्त होण्यास दोन ते तीन वष्रे शिल्लक असताना निवृत्तीपूर्व नियोजन केले जाते. असेच निवृत्तीला वर्ष शिल्लक असताना करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा हा वेध..
आíथक नियोजनाचे जे काही विविध प्रकार आहेत, त्यापकी एक निवृत्तीपूर्व नियोजन (Pre Retirement Planning) आहे. अनेकदा सेवानिवृत्त होण्यास दोन ते तीन वष्रे शिल्लक असताना निवृत्तीपूर्व नियोजन केले जाते. आजच्या भागात सेवानिवृत्तीस एक वर्ष शिल्लक असलेल्या सुप्रिया कुलकर्णी (वय ५४) यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. दुबईत वास्तव्यास असलेल्या सुप्रिया ‘लोकसत्ता’च्या इंटरनेट आवृत्तीच्या वाचक आहेत. त्यांना भारतातील एका खासगी बँकेच्या विक्री प्रतिनिधीने ‘रिलायन्स लाइफ इन्शुरन्स’ या विमा कंपनीच्या एका ‘गॅरेन्टिड रिटर्न’ पद्धतीच्या एका योजनेचे दुबईत सादरीकरण केले. त्यांना ही योजना फायद्याची आहे किंवा कसे व त्यांच्या निवृत्तीपश्चातच्या आíथक नियोजनाबाबत सल्ला घेण्यासाठी त्यांनी भेट घेतली.
सुप्रिया यांचे आई-वडील दोघेही सांगलीत शिक्षक होते. आई १० वर्षांपूर्वी तर वडील सात वर्षांपूर्वी निवर्तले. सुप्रिया यांना एक लहान विवाहित बहीण आहे. ती बँक ऑफ इंडियात असून सुप्रिया यांचा भाचा अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षांला शिकत आहे. सुप्रिया बारावीपर्यंत सांगलीत शिकल्या. त्यांनी पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्रात बी.एस्सी. केले. यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून एमबीएचेही शिक्षण घेतले. नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत त्यांनी १० वष्रे मुंबईत तीन ठिकाणी नोकऱ्या केल्या. पहिलीच नोकरी कांदिवलीतील ‘इप्का लॅब्ज’ या औषधनिर्मिती कंपनीत केली. तर भारतातील शेवटची नोकरी त्यांनी ‘इंडियन हॉटेल्स’च्या विपणन विभागात केली. प्रवासासाठी सोयीचे म्हणून त्यानी बोरिवलीत सुरुवातीच्या काळात सदनिका भाडय़ाने घेतली.
गेली ३० वष्रे त्या कागदोपत्री बोरिवलीच्या रहिवासी असल्या तरी गेल्या १३ वर्षांपासून त्या भारताबाहेर नोकरी करत आहेत. गेली सात वष्रे त्या दुबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत आहेत. या हॉटेलच्या व्यवसाय विस्तार विभागप्रमुख  म्हणून त्या कार्यरत आहेत. कंपनीबरोबर असलेला सुप्रिया यांचा करार संपण्यास अद्याप एक वर्ष आहे. मात्र ऑक्टोबर २०१५ अथवा त्याआधी त्यांचा स्वेच्छेने सेवामुक्त होण्याचा विचार आहे.
मुंबईत नोकरी करत असताना त्यांनी बोरिवली येथील अशोकवन वसाहतीत ‘वन बीएचके’ सदनिका घेतली होती. त्यांनी भारत सोडल्यावर त्यांचे आई-वडील महिना- दोन महिन्यांतून या सदनिकेत मुक्काम करत. काही वर्षांनी त्यांच्या आई-वडिलांनी दोन्ही मुली मुंबईत असल्याने कायम वास्तव्यासाठी मुंबईची निवड केली. म्हणून त्यांनी याच परिसरात एका नव्याने बांधलेल्या संकुलात ‘टू बीएचके’ सदनिका घेतली. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटल्याने त्यांनी या सदनिकेची निवड केली. या सदनिकेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली आहे. सुप्रिया यांच्याकडे ‘एलआयसी’च्या पारंपरिक व मनीबॅक पद्धतीच्या १० योजना असून या योजनांची मुदतपूर्ती पुढील तीन वर्षांत होणार आहे. या योजनांच्या मुदतपूर्तीनंतर त्यांना पुढील चार वर्षांत २० लाख रुपये मिळणार आहेत. त्यांच्या मत्रिणीच्या सांगण्यावरून जानेवारी २०१३ पासून त्या दरमहा १०,००० रुपयांची ‘एसआयपी’ करत आहेत. त्यांच्याकडे ६२ लाख रुपयांच्या बँक मुदत ठेवी आहेत. पुढील वर्षभरात त्यांच्याकडे २४ लाख रुपये गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतील.   
 
सुप्रिया कुलकर्णी यांना सल्ला :
सुप्रिया यांना दोन प्रश्न पडले होते. पहिला प्रश्न त्यांना सांगण्यात आलेली ‘गॅरेन्टिड रिटर्न’ पद्धतीची योजना घ्यावी का हा होता. खरे तर या योजनेच्या नावातच ‘मिस सेिलग’ दडलेले आहे. या योजनेत सुप्रिया यांना दरवर्षी पाच लाख विम्याचा हप्ता १० वष्रे भरायचा असून त्यांना २५ लाख रुपयांचे विमाछत्र मिळणार आहे. पाचव्या वर्षी व त्यानंतर दहाव्या वर्षांपासून त्यांना ठरावीकरक्कम मिळणार आहे. ही योजना खरेदी न करण्याचा सल्ला सुप्रिया यांना दिला. याचे पहिले कारण, त्यांचे उत्पन्न येत्या दोन वर्षांत किंवा त्याच्याही आधी थांबणार आहे. मिळणाऱ्या व्याजातून या योजनेचे हप्ते भरणे कितपत योग्य आहे, याचा विचार सुप्रिया यांनी करावयास हवा. दुसरे कारण, योजनेचा परताव्याचा दर ४.०८ टक्के इतका कमी आहे. सध्या बँक ठेवींचे दर आठ टक्क्याच्या आसपास असताना नको असलेला विमा अधिक ४.०८ टक्के परताव्याचा दर यात कसले आले ‘गॅरेन्टिड रिटर्न? याचा दुसरा अर्थ, त्यांना विमा कंपनी देत असलेले विमाछत्र खूप महाग आहे. तिसरा मुद्दा असा की, सुप्रिया यांच्यावर कोणीही अवलंबून नाही. सबब त्यांना जीवनविम्याची आवश्यकता नाही. म्हणून ही योजना खरेदी करू नये.
आता सुप्रिया यांच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. त्यांना त्यांचे आíथक नियोजन करून हवे आहे. लठ्ठ पगार, फारसा खर्च नसल्याने शिल्लकसुद्धा तशीच लठ्ठ असेल, असा विचार करून आजपर्यंत बचतीचे काय केले, असा प्रश्न विचारला. ‘दोन वेळा घर घेतले. त्यासाठी घेतलेले कर्ज फेडले व ६२ लाख रुपयांच्या मुदत ठेवी केल्या. परंतु मिळवलेला पगार व बचत यांचा ताळमेळ जुळत नाही’, असे त्या म्हणाल्या. ही खंत केवळ सुप्रिया यांचीच नाही तर मासिक ३० हजार पगारापासून ते तीन लाखांपर्यंत वेतन असलेल्यांचीसुद्धा आहे. या सदराच्या निमित्ताने ज्या वाचकांशी गाठ पडली त्यापकी बहुतांशी वाचकांची ही खंत होती. याचे एक कारण आíथक नियोजनशून्यता. एसआयपी किंवा बँकेची आवर्ती ठेव हा एक उपाय आहे.
पुढील वर्षी सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतरच्या दोन वर्षांत सुप्रिया यांच्याकडे साधारणत: ९० लाख गुंतवणूकयोग्य रोकड असेल व त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या ३० वष्रे आयुष्य जगतील या गृहीतकावर त्यांचे नियोजन केले आहे. जीवन विम्याची सुप्रिया कुलकर्णी यांना आवश्यकता नाही, हे म्हणत असताना त्यांना मोठय़ा आरोग्य विम्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला कमी होत जाणारे व्याजदर, औषध उपचारांचा वाढता खर्च यामुळे त्यांच्यासमोर बचतीची क्रयशक्ती (ढ४१ूँं२्रल्लॠ ढ६ी१) टिकविण्याचे आव्हान आहे. तिसरी गोष्ट, सध्या त्या अनिवासी भारतीय आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्या निवासी भारतीय होतील. यामुळे त्यांच्या उत्पनाची कररचना बदलणार आहे. यामुळे बँक ठेवी या प्राप्तिकर आकारणीच्या दृष्टीने कुचकामी ठरणार आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांना केवळ बँकेच्या मुदत ठेवी व विमा कंपन्यांच्या निवृत्ती योजना कामाच्या नाहीत. जसे व्याज दर कमी होणार आहेत तसेच समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड योजनांचा परतावादेखील कमी होणार आहे. पॉल सॅम्युअलसन यांना या सिद्धांतासाठी नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. बाजार जसा कार्यक्षम होईल तसा गुंतवणुकीवरील परताव्याचा दर कमी होतो हे त्यांनी सिद्ध केले असून भारतीय शेअर बाजारदेखील याला अपवाद नाहीत. आज रोखे व अव्वल फंड यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास गुंतवणुकीवर १४ ते १६ टक्के परतावा मिळू शकतो. आणखी २० वर्षांनी हा दर आठ टक्क्यांच्या जवळपास असेल. हे लक्षात घेता, सुप्रिया यांच्या गुंतवणुकीत समभागाचे प्रमाण वाढणे जरुरीचे आहे. यासाठी तुमच्या सुरू असलेल्या एसआयपी सुरू ठेवायच्या असून या योजनांत १० पट वाढ करायची आहे.
९० लाखांपकी ४५ लाख रोखे गुंतवणूक करणारे फंड व बँकांच्या मुदत ठेवी व ४५ लाख म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवयाचे आहेत. २० लाखांचे आरोग्य विमाछत्र व ५० लाखांचे अपघाती विमाछत्र देणारा विमा खरेदी करावयाचा आहे. या दोन्ही विमा योजना न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स विमा कंपनीकडून खरेदी करावयाच्या आहेत. हा विमा केवळ भारतातील अपघात व औषध उपचाराला विमा संरक्षण देतो. परंतु विमाछत्र घेतले म्हणजे उद्यापासून संरक्षण मिळाले असे नाही. विमा खरेदीपूर्व आजारांना (स्र्१ीी७्र२३ील्लूीीि२ीं२ी२) विमा संरक्षण मिळत नाही. हा कालावधी सहा महिने ते तीन वष्रे आहे. म्हणजे पॉलिसीचे पूर्ण फायदे मिळण्यास तीन वर्षांचा कालावधी जावा लागतो. म्हणून आजच आरोग्य विमा खरेदी करा.
सुप्रिया यांच्या गुंतवणुकीचा आवाका पाहता एखाद्या कुशल आíथक नियोजकाचा शोध घ्यावा लागेल. त्यांच्या पश्चात मालमत्ता ही निवडलेल्या वारसाकडे जावी अथवा मालमत्तेची योग्य वासलात लागणे हेही आíथक नियोजनाइतकेच महत्त्वाचे आहे. इच्छापत्र कसे असावे यासाठी एखाद्या कायदे सल्लागाराशी बोलणे सुरू करावे व हे काम सेवानिवृत्ती स्वीकारल्यावर सहा महिन्यांत पूर्ण करावे. हाच अर्थ साक्षरतेचा पाठ या निमित्ताने घेता येईल.
सुप्रिया कुलकर्णी यांनी निवृत्तीपूर्व करावयाच्या गोष्टी :
* २० लाखांचे आरोग्य विमा छत्र असलेला न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा विमा घेणे.
* ५० लाखांचे अपघाती विमा छत्र असलेलान्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा विमा घेणे.
* दोन वर्षांनी उत्पन्न सर्वोच्च दराने करपात्र असल्याने एक पीपीएफ खाते उघडणे.
* दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने रोखे म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतविणे.
* आपले इच्छापत्र करण्याची प्राथमिक तयारी करणे.