आपलेही करविषयक प्रश्न   असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय,   ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
प्रश्न : मी अनिवासी भारतीय (NRI) आहे. माझे आई-वडील भारतात राहतात. मी त्यांना घरखर्चासाठी बाहेरून पसे पाठवतो. त्यावर त्यांना भारतात कर भरावा लागेल का?
– अमर घोरपडे.
उत्तर : आपण आई-वडिलांसाठी घरखर्चासाठी पाठवलेले पसे हे आई-वडिलांना करपात्र नाहीत.
 
प्रश्न : मला २०१३-१४ साठी ओव्हरटाइम मिळाला. तो कंपनीने करपात्र उत्पन्नात दाखवला आहे. ते उचित आहे का?
– संजय ठेंग.
उत्तर : कंपनीने दिलेला ओव्हरटाइम हा पगाराच्या उत्पन्नामध्ये गणला जाईल. तो करपात्र आहे. त्यावर आपल्याला कर भरावा लागेल. त्यामुळे ओव्हरटाइम कंपनीने करपात्र उत्पन्नात दाखवला आहे, हे उचित आहे.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे करपात्र उत्पन्न २,७३,००० रुपये (कलम ८० क आणि ८० ड प्रमाणे वजावट कमी करून) आहे. मला किती कर भरावा लागेल? २,००० रुपयांची सूट मिळेल का?
– जी. एस. वैद्य.
उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे २,५०,००० रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. बाकी रकमेवर १०% प्रमाणे २,३०० रुपये कर येतो. आपले उत्पन्न ५,००,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ८७ अ कलमाप्रमाणे २,००० रुपयांची कर वजावट मिळून आपल्याला ३०० रुपये कर आणि ९ रुपये शैक्षणिक अधिभार भरावा लागेल.

प्रश्न : मी घर बांधण्यासाठी बँकेकडून आणि पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. मला दोन्ही कर्जाच्या परतफेडीची वजावट मिळू शकेल का?
– एक वाचक.
उत्तर : घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जावर दिलेली व्याजाची वजावट कलम २४ प्रमाणे मिळते. जर आपण एका घरासाठी दोन संस्थांकडून कर्ज घेतले असेल तर त्या दोन्ही कर्जाच्या व्याजावर वजावट मिळू शकते. परंतु ही वजावट एकूण मर्यादेपेक्षा जास्त मिळत नाही. उदा. जर आपले एकच घर असेल तर व्याजावर १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त वजावट मिळत नाही.

प्रश्न : मला तीन वर्षांपूर्वी आíथक वर्ष २०१०-११ मध्ये ३,२५,००० रुपये लघू मुदतीचा भांडवली तोटा झाला होता. त्या वर्षांच्या विवरणपत्रात मी तो पुढील वर्षांकरिता Carried Forward केला असे दर्शविले होते. या आíथक वर्षांत २०१३-१४ मध्ये मला घर विक्रीतून २,००,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा नफा झाला आहे. तीन वर्षांपूर्वीचा तोटा या वर्षीच्या दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा करू शकतो का?
– एक वाचक.
उत्तर : प्राप्तीकर कायदा कलम ७४ प्रमाणे लघू मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षांत होणाऱ्या लघू किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. त्यामुळे घर विक्रीतून झालेल्या २,००,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा नफा हा मागील वर्षांच्या लघू मुदतीच्या भांडवली तोटय़ातून वजा केल्यामुळे त्यावर कर भरावा लागणार नाही. लघू मुदतीचा उर्वरित तोटा १,२५,००० रुपये हा पुढील वर्षांसाठी Carried Forward करता येईल.

प्रश्न : माझे आíथक वर्ष २०१३-१४ पूर्वी करपात्र उत्पन्न नव्हते. त्यामुळे मी PAN साठी अर्ज केला नव्हता. परंतु या वर्षांमध्ये माझे करपात्र उत्पन्न २,३०,००० रुपये इतके आहे. कंपनीने १,०३० रुपयांची करकपात केली आहे. मला ढअठ साठी अर्ज करणे गरजेचे आहे का? असेल तर अर्ज कधी करावा?
– एक वाचक.
उत्तर : ज्या व्यक्तींचे एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना Permanant Account Number (PAN) घेणे गरजेचे आहे. आपण ज्येष्ठ नागरिक नाही, असे गृहीत धरले तर आपल्याला PAN घेणे बंधनकारक आहे. कारण आपले उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे. ढअठ साठी अर्ज ३१ मे २०१४ पूर्वी करावा लागेल. कारण आपले उत्पन्न २०१३-१४ वर्षांमध्ये करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे.

प्रश्न : माझा मुलगा मागील महिन्यात नोकरीनिमित्त भारताबाहेर गेला आहे. २०१३-१४ साठी त्याचे विवरणपत्र जुल महिन्यात भरावयाचे आहे. तो पुढील एक वर्ष भारतात येऊ शकत नाही. त्याच्या विवरणपत्रावर सही कोण करू शकते?
– एक वाचक.
उत्तर : तो स्वत: विवरणपत्रावर सही करू शकतो. त्याची सही घेणे शक्य नसेल तर त्याने निर्देश केलेली व्यक्ती विवरणपत्रावर सही करू शकते.