म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपल्याकडे दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे म्युच्युअल फंड वितरकामार्फत गुंतवणूक करणे आणि दुसरा म्हणजे थेट म्युच्युअल फंड कंपनीबरोबर व्यवहार करणे. जेव्हा आपण वितरकामार्फत गुंतवणूक करतो तेव्हा आपण ‘रेग्युलर प्लान’मध्ये गुंतवणूक करतो आणि जेव्हा थेट गुंतवणूक करतो तेव्हा ती ‘डायरेक्ट प्लान’मध्ये होते. या दोन्ही प्रकारांमध्ये फरक असतो तो खर्चाचा. रेग्युलर प्लानचा खर्च हा डायरेक्ट प्लानपेक्षा जास्त असतो. कारण त्यात वितरकाचे कमिशन असते. त्यामुळे समान कालावधीतील रेग्युलर प्लानचे परतावे हे डायरेक्ट प्लानपेक्षा कमी असतात. उदाहरण म्हणून खालील नमूद फंडांमध्ये रु. १,०००ची पाच वर्षांच्या (१ एप्रिल २०१३ ते १ मार्च २०१८) ‘एसआयपी’चे परतावे असे आहेत :

लगतचा तक्ता बघून तुम्हाला वाटले असेल की डायरेक्ट प्लानमध्येच गुंतवणूक करावी! जे गुंतवणूकदार स्वत:ची जोखीम क्षमता व्यवस्थित ओळखतात आणि ज्यांना म्युच्युअल फंडाची माहिती योग्य प्रकारे मिळवून आपल्या जोखीम क्षमतेला साजेल असे फंड निवडता येतो, त्यांच्यासाठी डायरेक्ट प्लान योग्य आहेत. परंतु ज्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कसा निवडायचा हे समजत नाही. त्यांनी वितरकाकडून पूर्ण माहिती मिळवून रेग्युलर प्लानमध्ये पैसे गुंतवावे. कारण जर वितरक तुमच्या विश्वासातला असेल तर तो तुम्हाला म्युच्युअल फंडाची पूर्ण माहिती देईल आणि तुमचा पैसा योग्य मार्गी लावण्यात तुमची मदत करेल. शिवाय जर तुम्हाला इंटरनेटवरून व्यवहार करता येत नसतील किंवा तुम्ही जिथे राहता तिथे म्युच्युअल फंडाचे कार्यालय नसेल, तर अशा वेळी वितरकामार्फत रेग्युलर प्लानमध्ये गुंतवणूक करावी.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

सूचना:  हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

  • या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.

– तृप्ती राणे