फंडाविषयक विवरण

फंडाचा गुंतवणूक प्रकार: समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार: समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)

गुंतवणूक: हा फंड ‘मल्टी कॅप’ प्रकारचा फंड आहे. या फंडाचा निधी लार्ज कॅप व मिड कॅप प्रकारच्या समभागात गुंतविला जातो. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन अधिभार आकारण्यात येईल. मुंबई शेअर बाजाराचा एसएनपी बीएसई १०० हा निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.

निधी व्यवस्थापक शैलेश राज भान हे या फंडाचे फंडाच्या सुरवातीपासून निधी व्यस्थापक आहेत. हे रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या या योजनेच्या बरोबर रिलायन्स टॉप २०० रिलायन्स फार्मा रिलायन्स फ्लेक्झी कॅप या अन्य फंडाचे निधी व्यवस्थापन पाहतात.

गुंतवणूक पर्याय: वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइंव्हेंस्ट)

फंडाबद्दल अन्य माहिती: (०२२) ३०९९४६०० या क्रमांकावर (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत) संपर्क केल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. अथवा http://www.reliancemutual.com या रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावरून थेट खरेदी करता येईल.

रिलायन्स इक्विटी अर्पोच्युनिटी हा फ्लेक्झी कॅप प्रकारचा फंड असल्याने आम्ही तत्कालीन मुल्यांकनानुसार लार्ज कॅप व मिड कॅप प्रकारच्या समभागामध्ये समतोल साधत असतो. मागील काही दिवसांपूर्वी मिड कॅप प्रकारच्या समभागांचे मुल्यांकन वाढल्यामुळे आम्ही आमच्या गुंतवणुका विकून नफा वसुली केली. भविष्यात मिड कॅपचे मुल्यांकन आकर्षक वाटल्यास आम्ही पुन्हा नव्याने गुंताणूकीचा विचार करु.
शैलेश राज भान,निधी व्यवस्थापक,रिलायन्स इक्विटी ऑर्पोच्युनिटी फंड