युनिलिव्हर, नोव्हार्टीस, ग्लॅक्सो, फियाट, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, व्होडाफोन, सिमेन्स या वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांत काय साम्य आहे, असे कुणी विचारल्यास पटकन उत्तर देणे कठीण आहे. अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात युरोप खंडात झाली आणि त्याच युरोप खंडात या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मूळ आहे, असे सांगितल्यास कंपन्यातील साम्य लक्षात येते. मागील विश्लेषणात आपण अमेरिकेतील गुंतवणूक संधीची माहिती करून घेतली होती. त्यास ‘अर्थ वृत्तान्त’च्या अर्थसाक्षर वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे कंपनीने कळविले. आज अमेरिकेनंतर महत्त्वाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोप खंडातील संधींची माहिती करून घेऊ.
रेलिगेअर इन्वेस्को म्युचुअल फंड ही रेलिगेअर या भारतातील वित्तीय सेवा देणारी कंपनी व इन्वेस्को या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नामांकनप्राप्त असलेल्या कंपनीची संयुक्त कंपनी आहे. ३१ डिसेंबर २०१३ अखेर रेलिगेअर इन्वेस्कोकडे १३७ अब्ज रुपयांचे निधी व्यवस्थापन होते. इन्वेस्को न्यूयॉर्क शेअर बाजारात सूचिबद्ध असून २०पेक्षा अधिक देशात मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात असलेली कंपनी आहे. रेलिगेअर इन्वेस्कोने पॅन युरोप इक्विटी फंड ही ‘फंड्स ऑफ फंड’ पद्धतीची योजना भारतीय गुंतवणुकदारांसाठी १४ ते २९ जानेवारी २०१४ दरम्यान प्राथमिक विक्रीसाठी खुली करून दिली आहे. हा फंड पुनर्वक्रिी करिता ३ फेब्रुवारी रोजी खुला होईल. या प्राथमिक विक्रीतून जमा झालेला निधी इन्वेस्को पॅन युरोपियन इक्विटी फंडाच्या युनिट्समधे गुंतविण्यात येतील.

इन्वेस्को पॅन युरोपियन इक्विटी फंड
भारत देश खुली अर्थव्यवस्था स्वीकारत असताना या योजनेची सुरुवात  २ जानेवारी १९९१ रोजी झाली. गेल्या २२ वर्षांत दोनदा जागतिक आíथक चढ-उतार पाहिलेली ही परिपक्व  योजना आहे, असे म्हणावयास हरकत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभाग व तत्सम गुंतवणुकीतून दीर्घकालीन नफा कमविणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ही योजना परताव्याच्या तुलनेसाठी ‘MSCI EUROPE ND’ हा निर्देशांक वापरते. जॉन सुपरप्लीस व मार्टनि वॉकर हे या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत. ६८ कंपन्यांचे समभाग गुंतवणूकीत असलेल्या या फंडाची मालमत्ता ३० नोव्हेंबर २०१३ रोजी १८,००० युरो होती. ८ जानेवारी २०१४ रोजी १८.७६ युरो हे उच्चांकी तर १३ जानेवारी २०१३ रोजी १३.९८ युरो हे नीचांकी मालमत्ता मूल्य(NAV) पहायला मिळाले. २०१३ च्या तिसऱ्या तिमाही अखेरीस युरोपीय अर्थव्यवस्था तीन वर्षांच्या मंदीतून बाहेर येण्याची सुचिन्हे दिसू लागली होती. युरोपच्या मध्यवर्ती बँकेने कमी व्याजदराची व स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविले. फेडच्याच धोरणाची (प्रोत्साहनपर रोखे खरेदीतील कपात) पुनरावृत्ती २०१४ च्या दुसऱ्या तिमाहीत युरोपात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन योजनेच्या गुंतवणुकीत योग्य ते बदल करण्याचे संकेत व्यवस्थापकीय जोडगोळीने नोव्हेंबर महिन्याच्या अहवालात दिले आहेत. गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या औषधनिर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तू यातील गुंतवणूक कमी करून भांडवली वस्तू, बँक, आदरातिथ्य या धाडसी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आíथक मंदीच्या सावटातून बाहेर येताना सर्वात जास्त फायदा येत्या वर्षभरात या क्षेत्राना होवू शकतो, असा व्यवस्थापकांना विश्वास वाटतो. असे घडल्यास फंडाचे मुख्य चलन असलेले युरो हे इतर चलनांच्या तुलनेत वधारेल. त्यामुळे भांडवली नफा जेव्हा रुपयात परावर्तीत केला जाईल तेव्हा फंडाचा परतावा आकर्षक असेल. मॉìनग स्टार या म्युच्युअल फंडांची पतमानांकन ठरविणाऱ्या संस्थेने पंचतारांकीत हे सर्वोच्च मानांकन दिले आहे. जॉन सुपरप्लीस व मार्टनि वॉकर यांची मंदीपेक्षा तेजीत उत्तम कामगिरी करण्याची ख्याती असल्यामुळे दोन वर्षांत हा फंड निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करेल, अशी अपेक्षा ठेवण्यास वाव आहे. या फंडात एकूण म्युचल फंड गुंतवणुकीच्या १०-२०% पेक्षा अधिक गुंतवणूक न करण्याची शिफारस करण्यात येत आहे.