गेली सात वर्षे फळलेली सोन्यातील तेजी सरली आहे. शेअर बाजारात जीवघेण्या अनिश्चिततेचे खेळ सारखे सुरू आहेत. घसरणीचे वार्षिक आवर्तन पुरे करीत रुपयाने पुन्हा प्रति डॉलर ५८ च्या पल्याड नांगी टाकली आहे. रुपयाची ही गटांगळी भांडवली बाजारातील अधूनमधून दिसणाऱ्या उत्साहालाही मारक ठरत आहे. एकूण स्थिती सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्माणाच्या दृष्टीने निश्चितच हलाखीची आहे. यातून सुटका केव्हा आणि कशी यासंबंधी तज्ज्ञांनी केलेले हे दिशानिर्देश नक्कीच उद्बोधक ठरतील.