19 January 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : रूपांतरण आणि पिकवण

दोन वर्षांपूर्वी १:१ प्रमाणात बक्षीस समभाग वाटपानंतर कंपनीने आपली कामगिरी उत्तम ठेवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

गुंतवणूकदारांनी कायम विश्वास ठेवावा अशा काही कंपन्या आहेत, त्यांत ग्राइंडवेल नॉर्टनचा समावेश करत येईल. १९४१ मध्ये या कंपनीने भारतात ग्राइंडिंग व्हिल्स तयार करण्याचे काम सुरू केले. १९९० मध्ये सेंट-गोबेन यांनी अमेरिकेतील नॉर्टन कंपनी जगभरात विकत घेतली आणि १९९६ मध्ये सेंट-गोबेनने ग्राइंडवेल नॉर्टनमधील आपले भाग भागभांडवल वाढवून भारतातील पहिली बहुसंख्य मालकीची उपकंपनी बनविली. आज, ग्राइंडवेल नॉर्टनच्या प्रमुख व्यवसायांमध्ये : अ‍ॅब्रेसिव्ह, सिरॅमिक मटेरियल बिझनेस (सिलिकॉन कार्बाईड आणि परफॉरमन्स सिरॅमिक्स अ‍ॅण्ड रिफ्रॅक्टरीज), परफॉरमन्स प्लास्टिक आणि एडीएफओआरएस समाविष्ट आहेत.

जानेवारी २०१९ पासून, या समूहाने आपल्या ‘ट्रान्स्फॉर्म अ‍ॅण्ड ग्रो’ प्रोग्रामअंतर्गत नवीन संघटनात्मक रचना स्वीकारली आहे. या नवीन रचनेत चार क्षेत्रीय व्यवसाय आणि जागतिक उच्च कार्यक्षमता सोल्युशन्स युनिटसह पाच अहवाल देणारी एकके आहेत. ग्राइंडवेल नॉर्टन ही समूहाच्या हाय परफॉर्मन्स सोल्यूशन्स युनिटचा भाग आहे. कंपनीच्या व्यवसायांमध्ये : अ‍ॅब्रेसिव्ह, सिलिकॉन कार्बाईड, परफॉरमन्स सिरॅमिक्स अ‍ॅण्ड रिफ्रॅक्टरीज, परफॉर्मन्स प्लॅस्टिक आणि अ‍ॅडफोर्स इ. समाविष्ट आहे. आयएनडीईसीपी (जागतिक स्तरावर सेंट-गोबेन समूहासाठी कॅप्टिव्ह इंडिया आयटी डेव्हलपमेंट सेंटर) हादेखील ग्राइंडवेल नॉर्टनचा एक भाग आहे. ग्राइंडवेल नॉर्टनची साहाय्यक कंपनी, सेंट-गोबेन सिरॅमिक मटेरियल, भूतान प्रा. लिमिटेड, सिलिकॉन कार्बाईड बनवते.

दोन वर्षांपूर्वी १:१ प्रमाणात बक्षीस समभाग वाटपानंतर कंपनीने आपली कामगिरी उत्तम ठेवली आहे. उत्तम व्यवस्थापन असलेली ही बहुराष्ट्रीय कंपनीचा एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करायला हरकत नाही. अजून दोनच दिवसांत म्हणजे ५ नोव्हेंबरला कंपनीचे सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होतील. त्यानंतर बाजाराचा कल पाहून खरेदी करता येईल.

ग्राइंडवेल नॉर्टन लि.

(बीएसई कोड – ५०६०७६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५९२.००

मिड कॅप समभाग

प्रवर्तक : सेंट गोबेन एस. ए.

व्यवसाय :  अ‍ॅब्रेसिव्ह ग्राइंडिंग

बाजार भांडवल : रु. ६,५५५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ६७२ / ४७२

भागभांडवल : रु.  ५५.३६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ५८.३२

परदेशी गुंतवणूकदार  ४.३५

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १५.१९

इतर/ जनता    २२.१४

पुस्तकी मूल्य :                रु. ९९.१६

दर्शनी मूल्य :   रु. ५/-

लाभांश :  २७५ %

प्रति समभाग उत्पन्न :    रु. १५.१

पी/ई गुणोत्तर : ३९

समग्र पी/ई गुणोत्तर :    २६.७

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ११५

रिटर्न ऑन कॅपिटल : २३.४७

बीटा :    ०.६

First Published on November 4, 2019 1:48 am

Web Title: saint gobain stock market investment abn 97
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा : शेतमालाच्या हमीभावाला ‘ऑप्शन्स’चा पर्याय
2 नावात काय? : अ‍ॅसेट बबल
3 अर्थ वल्लभ : आश्वासक वर्षपूर्ती
Just Now!
X