घर खरेदी करणे म्हणजे असंख्य पर्याय चाचपल्यानंतर योग्य तो निर्णय घेणे. केवळ योग्य घर घेणेच महत्त्वाचे नसते, तर सर्वोत्तम गृहकर्ज निवडणेही तितकेच महत्त्वाचे असते. आपल्यापकी अनेकांसाठी गृहकर्ज ही सर्वात मोठी आíथक बांधीलकी असल्याने याबाबतीत पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. मुळात गृहकर्ज मिळविताना मंजुरीची प्रक्रिया माहीत असल्यास प्रवास सोपा होतो.  
गृहकर्ज कोणाला मिळू शकते?
गृहकर्ज कोणाला मिळू शकते? गृहकर्ज हा व्यक्तिगत कर्जप्रकार आहे हे तितकेसे खरे नाही. ते व्यक्ती (पगारदार व स्वयंरोजगार असलेल्या) याशिवाय सहकारी संस्था, सहकारी संघटना व व्यक्तींची सहयोगी संस्था यांना गृहकर्ज घेता येते. साधारणत: गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना मालमत्तेच्या किमतीच्या ८० टक्क्यांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते.
तीन मुख्य स्तंभ
आपल्याला साजेसे अशा घराची निवड जशी आपण सर्वागाने पारखून करतो, तसेच नवे घर घेण्यासाठी कर्जसाहाय्य मिळविताना, गृहकर्जासाठी पात्र रक्कम किती, परतफेडीबाबत स्पर्धात्मक व्याजदर व करविषयक सवलती हे गृहकर्जाचे तीन मुख्य स्तंभ आहेत. या तीन स्तंभांशी संबंधित पैलूंमुळेच आपल्या (वेतनमानाच्या तुलनेत) पात्र असलेल्या रकमेपेक्षा महागडे ठरेल अशा परिसरात घराच्या खरेदीचा मध्यमवर्गीय कुटुंबांचा कल वाढत चालला आहे. यामुळे कुटुंबांना आधीपेक्षा मोठय़ा घरामध्ये जाण्यास, आधी त्यांनी ज्या परिसरात राहण्याचे केवळ स्वप्न पाहिले होते त्या परिसरात घर घेण्यास सक्षम केले गेले आहे. गृहकर्जामुळे निवासी मालमत्ता क्षेत्रामध्ये बरेच बदल झाले आहेत आणि कुटुंबांना अधिक चांगली जीवनशैली स्वीकारण्यास मदत करणारा हा विधायक बदल निश्चितच आहे.
कर्जाची प्रत्यक्षातील रक्कम
कर्जाची प्रत्यक्षातील रक्कम कशी ठरवली जाते? परतफेडीची क्षमता, वय, शैक्षणिक पात्रता, उत्पन्नातील स्थिरता व सातत्य, अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या, मालमत्ता, जबाबदाऱ्या, बचतीच्या सवयी इ. घटक विचारात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. व्यक्तीचे लग्न झाले असेल आणि ती कुटुंबातील कमावती व्यक्ती असेल तर तिला सह-अर्जदार बनता येईल. यामुळे कर्ज मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते आणि घेतलेल्या कर्जाची रक्कमही वाढते.
कर्ज कालावधी
कर्जाचा कालावधी १ ते २० वष्रे असा असू शकतो. काही केसेसच्या बाबतीत, २५ वष्रे कालावधीचेही कर्ज घेतले जाते; परंतु कर्जाचा कालावधी निवृत्तीचे वय किंवा ६० वष्रे यापेक्षा जे आधी असेल त्यापेक्षा अधिक असू शकत नाही (स्वयंरोजगार असलेल्यांसाठी ६५ वष्रे).
कर्ज परतफेडीचा कालावधी ठरवताना निवृत्तीची योजना व आवश्यक रक्कमही विचारात घ्यायला हवी.
आवश्यक कागदपत्रे
गृहकर्जासाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्राथमिक कागदपत्रांची आवश्यकता असते; परंतु ग्राहकांचा प्रोफाइल, घराचे ठिकाण, कर्जाची गरज व अन्य अनेक घटकांनुसार आवश्यक कागदपत्रे विविध असू शकतात.
१. पगारदारांसाठी उत्पन्न व ओळखीचा पुरावा याच्याशी संबंधित कगदपत्रे, जसे की, पगार पत्रक, फॉर्म-१६ व ओळखपत्र.
२. व्यावसायिकांसाठी बॅलन्स शीट, पीअँडएल अकाऊंट, बँक स्टेटमेंट
३. मालमत्ता ठरवली असेल तर मालमत्ताविषयक कागदपत्रांची प्रत
गृहकर्जाचे प्रकार
गृहकर्जाचे काही लोकप्रिय प्रकार म्हणजे, सर्वसाधारण गृहकर्ज, होम एक्स्टेन्शन लोन, घर सुधारण्यासाठी कर्ज, होम मॉग्रेज लोन, महिलांसाठी गृहकर्ज, अनिवासी मालमत्ता कर्जे, लीज रेंटल फायनान्स, स्टेप अप ईएमआय वगैरे. आजकाल ‘घ्या किंवा सोडून द्या’ अशा प्रकारची गृहकर्जे आता दिसत नाहीत. गृहकर्ज घेणार असलेल्यांना विशिष्ट ठिकाणांसाठी तयार केलेली खास उत्पादनेही उपलब्ध आहेत. अ‍ॅड-ऑनमुळे ते अर्जदारांसाठी नक्कीच आकर्षक वाटतात. उदा. ही मालमत्तेसाठी किंवा कर्ज घेणाऱ्यासाठी अ‍ॅड-ऑन विमा योजना असू शकते. आज ग्राहकांची सरासरी आíथक जागृती लक्षणीय वाढली असल्याने, ग्राहकांना मूल्यमापन करण्यासाठी इच्छित अ‍ॅड-ऑनची यादी करता येईल.
ईएमआयचे प्रमाण कर्जाची रक्कम, लागू असलेला व्याजदर व कर्जाचा कालावधी यावर अवलंबून असते. काही हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या कालावधीत निवृत्त होणार असलेल्या अर्जदारांसाठी व पात्र ऋण सह-अर्जदारासोबत संयुक्त अर्ज केलेल्यांसाठी कडक पेमेंट योजना आहे.
परतफेडीची क्षमता
वरील सर्व घटक विचारात घेऊन स्वत:ची परतफेडीची क्षमता जोखावी आणि त्यानंतर कर्जाच्या योग्य रकमेसाठी अर्ज करावा. तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्हाला कुटुंबाला हातभार लावावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नापकी ४० टक्क्यांपर्यंत रक्कम ईएमआयसाठी (इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट) बाजूला ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही अविवाहित असाल आणि कर्ज वितरणाच्या पहिल्या पाच वर्षांनंतर स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जीवनशैलीनुसार व खर्च करण्याच्या सवयीनुसार तुमच्या निव्वळ उत्पन्नापकी ६० टक्के रक्कम ईएमआयसाठी बाजूला ठेवू शकता. हे सर्वसाधारण नियम आहेत. कर्जाची रक्कम ठरवण्यापूर्वी तुमची आíथक बांधीलकी – अल्पकालीन व दीर्घकालीन – ठरवण्यासाठी याची तुम्हाला मदत होऊ शकते.
गृहवित्त कंपन्या कर्जाच्या अर्जाकडे कसे पाहतात?
कोणत्याही कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया करताना एचएफसी कमीत कमी जोखीम घेतात. गृहकर्जामध्ये दोन विशिष्ट प्रक्रिया असतात. पहिली प्रक्रिया, तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांनुसार तुमच्या आíथक दर्जानुसार अर्जदाराची कर्जाची पात्रता ठरवते. पात्रता निश्चित होणे म्हणजे त्या रकमेसाठी तुम्ही योग्य क्रेडिट रिस्क ठरता आणि त्या रकमेचे गृहकर्ज तुम्हाला मंजूर होते, मात्र त्यासाठी कागदपत्रांच्या बाबतीत मालमत्ता योग्य ठरायला हवी. ही दुसरी प्रक्रिया असते : मालमत्तेच्या टायटलची तपासणी व्हायला हवी. यानंतरच कर्ज मंजूर झाल्याचे मानले जाते व त्याचे वितरण केले जाते.
करविषयक लाभ
घर खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी नसलेले लोकच केवळ आकर्षक गृहकर्ज शोधतात असे नाही. परिपूर्ण व स्वनिवासी (ऑक्युपाइड) घरांसाठी कलम ८०सी अंतर्गत गृहकर्जावर करविषयक फायदे मिळवता येतात. त्यामुळे, गृहकर्जाची गरज नसलेल्या अनेक जणांना करविषयी फायदे मिळवण्यासाठी हे कर्ज फायदेशीर वाटते. झपाटय़ाने वाढ होत असलेल्या निवासी परिसरांत तर अपवादापेक्षा हा नियमच आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर गृहकर्ज श्रेणीची वाढ व निवासी रिअ‍ॅल्टी मार्केटची वाढ या ट्रेंडला अनुसरून असल्याचे दिसते; परंतु बांधकाम सुरू असलेल्या वा केवळ गुंतवणूक म्हणून घेतलेल्या मालमत्तांसाठीच्या गृहकर्जावर करविषयक फायदे मिळत नाहीत.
(लेखक ‘डीएचएफएल’चे धोरणात्मक  उपक्रम विभागाचे अध्यक्ष आहेत.)

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या