मार्च २०१३ रोजी या फंडाचा निधी ३७२ कोटी रुपये होता. फंडाच्या परताव्यासाठी ‘क्रिसिल बॅलन्स फंड’ हा निर्देशांक ठेवण्यात आला आहे. या फंडाचे उद्दिष्ठ मर्यादित जोखीम पत्करून दीर्घकालीन भांडवली नफा मिळविणे हे आहे.

बाजार सध्या ऐतिहासिक पातळीवरून जाऊन आला आहे. १० जानेवारी २००८ चा निफ्टीचा वरचा भाव ६३४७ व बाजारबंद भाव ६१५७ होता. २० मे २०१३ रोजी निफ्टीचा वरचा भाव ६२२९ व बाजारबंद भाव ६१५७ होता हे फारच कमी जणांच्या लक्षात आले असेल. सांगण्याचे तात्पर्य असे – बाजार सध्या ‘करेक्शन मोड’वर आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी बॅलन्स फंड निवडावा.
बॅलन्स फंडाला ‘हायब्रीड फंड’ किवा ‘मिक्स्ड फंड फंड’ही म्हटले जाते. बाजाराची दोलायमान स्थिती, वाढती महागाई, व्याजदरांमध्ये चढ उतार, प्राप्तीकर तसेच बाजाराचा अंदाज चुकल्यामुळे मालमत्ता प्रकारामध्ये (Asset Class) चुकीची गुंतवणूक होऊ शकते. या गुंतवणूक समस्यांवर मात करण्यासाठी गुंतवणूकदारांनी बॅलन्स फंडाची निवड करावी जो ‘मध्यम जोखीम, मध्यम परतावा’ देऊ शकतो. बॅलन्स फंडाचे निधी व्यवस्थापक शेअर व रोखे यांच्यात ७०:३० किवा ६५:३५ या गुणोत्तर प्रमाणात फंडाचा निधी गुंतवितात.
निधी व्यवस्थापक, कंपनी ताळेबंद, बाजारातील तेजी मंदीचा व व्याजदरांच्या चढ उतारांचा, जगातील प्रमुख देशांच्या व आपल्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा अंदाज घेऊन गुंतवणूक गुणोत्तर प्रमाण कमी जास्त करून त्यात समन्वय (Balance) साधतात आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Return) देण्यासाठी प्रयत्नशील असतात. जेव्हा एक मालमत्ता प्रकार (Asset Class) इक्विटी म्हणून तेजीवर स्वार असतो तेव्हा निधी व्यवस्थापक फंडातील शेअरमधील गुंतवणूक योग्य तेव्हा विकून नफा कमवितात) तेव्हा दुसरा मालमत्ता प्रकार (Asset Class) डेट किवा रोखे बाजार कमी अधिक प्रमाणात मंदीमध्ये असू शकतो. त्यावेळी निधी व्यवस्थापक खालच्या भावामध्ये असलेल्या रोख्यांमध्ये आपला निधी गुंतवितात.
बॅलन्स फंडाचा सगळ्यात महत्वाचा फायदा २००८ च्या मंदीमध्ये झाला (इक्विटी फंड नकारात्मक परतावा देत असताना) कारण अशा फंडाची रोखे बाजारात ही गुंतवणूक असल्याने फंडांना मंदीची झळ कमी प्रमाणात बसली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना बॅलन्स फंडांचे महत्त्व कळले. एसबीआय मॅग्नम बॅलन्स फंडाचे निधी व्यवस्थापक आर. श्रीनिवासन व दिनेश आहुजा हे आहेत. ३० मार्च २०१३ रोजी या फंडाचा निधी ३७२ कोटी रुपये होता. फंडाच्या परताव्यासाठी ‘क्रिसिल बॅलन्स फंड’ हा निर्देशांक ठेवण्यात आला आहे. कायम गुंतवणुकीसाठी खुला असणारा (Open Ended)ि फंड असून या फंडाचे उद्दिष्ठ मर्यादित जोखीम पत्करून दीर्घकालीन भांडवली नफा मिळविणे हे आहे.  बॅलन्स फंडाचे निधी व्यवस्थापक शेअर व रोखे यांच्यात ७०:३० किवा ६५:३५ या गुणोत्तर प्रमाणात फंडाचा निधी गुंतवितात. बाजारातील तेजी मंदीचा अंदाज घेऊन हे प्रमाण बदलत असते. ४०-७५% गुंतवणूक शेअरमध्ये व २५-६०% गुंतवणूक रोख्यांमध्ये करता येते. ३० मार्च २०१३ रोजीच्या पोर्टफोलिओनुसार ७४.७२% रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवली आहे तर १३.८% रक्कम भारत सरकारच्या रोख्यात तर ८% रक्कम अपरिवर्तनीय रोख्यांमध्ये गुंतविली आहे व इतर रोख सदृश ठेवली आहे. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत फंडातून बाहेर पडल्यास १% शुल्क (Exit Load) आकारले जाते. एका वर्षांच्या नंतरच्या निर्गुतवणुकीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. किमान रु. १,००० भरून या योजनेत गुंतवणुकीस सुरवात करता येते. नंतर रु. १,००० किंवा रु. १,००० च्या पटीत या योजनेचे युनिट विकत घेता येतात. जे गुंतवणूकदार बाजारात नवखे असतात किवा ज्यांना फंडाकडून ‘मर्यादित जोखीम, मर्यादित परतावा’ची अपेक्षा आहे त्यांनी या फंडाची अवश्य निवड करावी.