|| आशीष ठाकूर

गेल्या लेखात निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५२,००० आणि निफ्टीवर १५,२८० असे असेल, असा उल्लेख होता. या लक्ष्यासमीप सरलेल्या सप्ताहातील ९ फेब्रुवारीचा उच्चांक सेन्सेक्सवर ५१,८३५ आणि निफ्टीवर १५,२५७ नोंदवला गेला.या पार्श्वभूमीवर आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स : ५१,५४४.३०

निफ्टी : १५,१६३.३०

गेल्या लेखात उल्लेख केलेली निर्देशांकाचे वरचे, खालचे लक्ष्यं, कशी निर्धारीत केली गेली ते जाणून घेऊया.

या निर्धारणासाठी आपण २१ जानेवारीचा उच्चांक आणि २९ जानेवारीचा नीचांक गृहीत धरूया, त्यानुसार २१ जानेवारीचा उच्चांक हा सेन्सेक्सवर ५०,१८४ आणि निफ्टी निर्देशांकावर १४,७५३ तर २९ जानेवारीचा नीचांक हा सेन्सेक्सवर ४६,१६० आणि निफ्टी निर्देशांकावर १३,५९६ असा होता. आता उच्चांक आणि नीचांकामधील फरक हा सेन्सेक्सवर ४,०२४ (५०,१८४ उणे ४६,१६०) अंश आला. निफ्टी निर्देशांकावर हाच फरक १,१५७ (१४,७५३ उणे १३,५९६) अंश आला. आता तेजी-मंदीच्या वाटचालीचा मध्यबिंदू काढण्यासाठी आपण उच्चांक-नीचांकामधील फरक हा सेन्सेक्सवर ४,०२४ अंश आणि निफ्टी निर्देशांकावर १,१५७ अंश आहे. आता सेन्सेक्सवर ४,०२४ अंशांचे अर्धे हे २,०१२ अंश येतात तर निफ्टी निर्देशांकावर १,१५७ चे अर्धे ५७८.५० अंश येतात.आता उच्चांक-नीचांक वाटचालीचा मध्यबिंदू काढण्यासाठी सेन्सेक्सच्या नीचांकात ४६,१६० मध्ये २,०१२ (उच्चांक-नीचांका मधील फरक ४,०२४ चे अर्धे) मिळवले असता ४८,१७२ हा मध्यबिंदू येतो. तर निफ्टी निर्देशांकाच्या १३,५९६ नीचांकात ५७८.५०(उच्चांक-नीचांका मधील फरक १,१५७ चे अर्धे) मिळवले असता १४,१७४.५० हा मध्यबिंदू येतो.

आता निर्देशांकाच वरचे लक्ष्य काढण्यासाठी सेन्सेक्सच्या मध्यबिंदूत ४८,१७२ मध्ये ४,०२४ (उच्चांक ५०,१८४ उणे ४६,१६० नीचांक) मिळवले असता ५२,१९६ हे सेन्सेक्सचे वरचे लक्ष्य येईल. तर निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काढण्यासाठी निफ्टीचा मध्यबिंदू १४,१७४.५० मध्ये १,१५७ (उच्चांक १४,७५३ उणे नीचांक १३,५९६) मिळवले असता निफ्टीचे वरचे लक्ष्य १५,३३१.५० येईल.

निर्देशांकाचे खालचे लक्ष्य काढण्यासाठी तेजी-मंदी वाटचालीमधील मध्यबिंदूचा आधार घेऊया.

सेन्सेक्सचा मध्यबिंदू ४८,१७२ मधून ४,०२४ (उच्चांक ५०,१८४ उणे ४६,१६० नीचांक) उणे केले असता ४४,१४८ हे सेन्सेक्सचे खालचे लक्ष्य असेल. निफ्टी निर्देशांकाच्या खालच्या लक्ष्यासाठी तेजी-मंदी वाटचालीचा मध्यबिंदू निफ्टीवर १४,१७४.५० आहे त्यातून १,१५७ (उच्चांक १४,७५३ उणे नीचांक १३,५९६) उणे केल्यास निफ्टीचे खालचे लक्ष्य १३,०१७.५० येईल.

आताच्या घडीला निर्देशांकांचा ‘महत्वाचा केंद्र बिंदू स्तर’ हा सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० असेल. हा स्तर निर्देशांकांनी सातत्याने राखल्यास सेन्सेक्सचे प्रथम वरचे लक्ष्य हे ५२,१९६ व द्वितीय लक्ष्य ५२,८९६ असेल. तर निफ्टीचे प्रथम वरचे लक्ष्य हे १५,३३१ व द्वितीय लक्ष्य हे १५,५३१ (जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीचे २०० अंश १५,३३१ मध्ये मिळवले असता १५,५३१ चा उच्चांक)

भविष्यात सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर राखण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास, निर्देशांकांचे प्रथम खालचे सेन्सेक्सवर ४८,१७२ (मध्यबिंदू)आणि द्वितीय लक्ष्य ४४,१३०आणि निफ्टीचे प्रथम खालचे लक्ष्य १४,१७४ (मध्यबिंदू) व द्वितीय लक्ष्य १३,०१७ असे असेल.

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांच निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊया.

 

अंबुजा सिमेंट लिमिटेड   

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, १८ फेब्रुवारी

१२ फेब्रुवारीचा बंद भाव : २७७.४५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २६५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २९५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : २६५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २४० रुपयांपर्यंत घसरण.

हुतामाकी (पेपर प्रॉडक्ट्स) इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल :

मंगळवार, २३ फेब्रुवारी

१२ फेब्रुवारीचा बंद भाव : ३२१.३५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३४० रुपये, द्वितीय लक्ष्य ३६० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७० रुपयांपर्यंत घसरण.