मागील अभ्यास वर्गामध्ये आपण शॉर्ट बटरफ्लाय (Short Butterfly) हे डावपेच कसे वापरावेत हे शिकलो. खरेतर आजपर्यंत आपण दिशात्मक दृष्टीकोन ठेऊन तसेच तटस्थ राहून कसे डावपेच वापरावेत हे शिकलो यामध्ये लॉंग कॉल, लॉंग पुट, शॉर्ट कॉल, शॉर्ट पुट, स्प्रेड्स, बटरफ्लाय, इत्यादीचा अभ्यास केला. यामध्ये वाचकांना हे लक्ष्यात आले असेल की बाजाराच्या दिशांबद्दल शंका असल्यास ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) चा वापर करावा. आज आपण काँडर्सबाबत शिकून घेणार आहोत.

स्ट्रॅडल व स्ट्रॅन्गलमध्ये जो फरक आहे तोच फरक बटरफ्लाय व काँडरमध्ये आहे. बाजाराबाबतचा दृष्टीकोन व अस्थिरतेबाबतचा दृष्टीकोन दोन्ही प्रकारामध्ये सारखाच आहे. केवळ ‘मनीनेस’नुसार वेगवेगळ्या स्ट्राईकचा वापर या दोन्ही प्रकारामध्ये करावा लागतो, त्यामुळे दोन्ही प्रकारामध्ये खर्च कमी जास्त असेल व नफा तोटा सुद्धा कमी जास्त असेल. आजच्या अभ्यास वर्गामध्ये लॉंग काँडर व शॉर्ट काँडर दोन्ही ओझरते शिकूया. कारण आपण यापूर्वी लॉंग बटरफ्लाय व शॉर्ट बटरफ्लाय सविस्तरपणे शिकलो आहोत.

लॉंग काँडर (Long Condor)

दिशा – तटस्थ (Neutral) मला बाजार वर जाईल किंवा खाली जाईल हे सांगता येत नाही.
अस्थिरता (Volatility) – मंदीची, आपण अशी अपेक्षा करतो की बाजार, दृढीकरणाच्या (consolidation) अवस्थेत किंवा एका विशिष्ट टप्प्यांत रेंगाळता (consolidation) राहणार आहे व ध्वनित अस्थिरता ही बटरफ्लाय खरेदी करताना जास्त आहे, पण ती आता कमी होणार आहे व तिथीऱ्हासाचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे.
काय करावे?
१) बाजार भावाच्या दूरचा म्हणजेच एक ओटीएम कॉल व एक आयटीएम कॉल दोन्हीही विकावे
२) वरील विकलेल्या स्ट्राईकच्या बाहेरचा म्हणजे त्या स्ट्राईकपासून दूर स्ट्राईकच्या म्हणजे एक डीप आयटीएम कॉल विकत घ्यावा व आणखी एक डीप ओटीएम कॉल विकत घ्यावा.
किंवा
१) बाजारभावाच्या दूरचा म्हणजेच एक ओटीएम पुट व एक आयटीएम पुट दोन्हीही विकावे
२) वरील विकलेल्या स्ट्राईकच्या बाहेरचा म्हणजे त्या स्ट्राईकपासून दूर स्ट्राईकच्या म्हणजे एक डीप आयटीएम पुट विकत घ्यावा व आणखी एक डीप ओटीएम पुट विकत घ्यावा.
केव्हा वापरावे?
ध्वनित अस्थिरता कमी होऊन विकल्पांचे भाव कमी होणार आहेत. परंतु बाजार / शेअरचा भाव वर जाईल की खाली जाईल हे समजत नाही, अशावेळी सदर डावपेच वापरावेत. किंवा बाजार / शेअर एका विशिष्ट श्रेणीमध्ये (१ंल्लॠीु४ल्ल)ि रेंगाळला असेल, दृढीकरणांत (उल्ल२’्रिं३्रल्ल) जाणार असे वाटल्यास सदर डावपेच वापरावेत.
शॉर्ट काँडर (Short Condor)
दिशा – तटस्थ (Neutral) मला बाजार वर जाईल किंवा खाली जाईल हे सांगता येत नाही. पण आपण अशी अपेक्षा करतो की बाजार दृढीकरणांत (ूल्ल२’्रिं३्रल्ल) किंवा एका विशिष्ट टप्प्यात रेंगाळत राहणार नसून मोठय़ा प्रमाणात बाजार वर जाईल किंवा खाली जाईल असे वाटते.
अस्थिरता (Volatility) – तेजीची अवस्था तसेच ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) सध्या कमी आहे, परंतु आता बाजार वाढायला सुरूहोणार आहे. कारण महत्वाचे निर्णय येणार आहेत.
काय करावे?
१) बाजारभावाच्या दूरचा म्हणजेच एक ओटीएम कॉल व एक आयटीएम कॉल दोन्ही विकत घ्यावे
२) वरील खरेदी केलेल्या स्ट्राईकच्या बाहेरचा म्हणजे त्या स्ट्राईकच्या दूरच्या स्ट्राईकवर एक डीप आयटीएम कॉल विकावा व आणखी एक डीप ओटीएम कॉल विकावा.
किंवा
२) बाजार भावाच्या दूरचा म्हणजेच एक ओटीएम पुट व एक आयटीएम पुट दोन्ही विकत घ्यावे.
३) वरील खरेदी केलेल्या स्ट्राईकच्या बाहेरचा म्हणजे त्या स्ट्राईकच्या दूरच्या स्ट्राईकवर एक डीप आयटीएम पुट विकावा व आणखी एक डीप ओटीएम पुट विकावा.
केव्हा वापरावे?
जेव्हा महत्त्वाचे निर्णय काही दिवसात लागणार असल्याने संभ्रमावस्था व ध्वनित अस्थिरता प्रचंड वाढणार आहे. परिणामी विकल्पांचे चे भाव वाढणार आहेत. बाजार / शेअर वर जाईल की खाली जाईल हे समजत नाही, पण कोणत्यातरी एका दिशेने नक्की जाणार, असा ठाम वाटत असते, तेव्हा सदर डावपेच वापरावेत.
आपणास हे लक्षात आले असेल वरील दोन्ही प्रकारामध्ये आपण एकीकडे बुल स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे बेअर स्प्रेड घेतो. कोणत्यातरी एका स्प्रेडमध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
15 16

तोटा : मर्यादित
नफा: मर्यादित
बाहेर केव्हा पडावे?
अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
उदाहरणार्थ :
मी दिनांक ५ जून रोजी ‘बँक निफ्टी’ निर्देशांकाचा अभ्यास करतो. माझा अंदाज तटस्थ आहे. तसेच मी तद्नुरूप डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा परिणाम कसा निष्प्रभ (ठी४३१ं’्र२ी) करावा किंवा अंशत: तरी निष्प्रभ कसा करावे हे मागील अनेक लेखांमधून समजावलेले आहे त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्याच्या हेतूने त्यांचे आकडे आज देत नाही.
‘बँक निफ्टी’ निर्देशांकाचा ५ जून २०१५ रोजी स्तर १७,५५० आहे. (आलेख व तक्ता पाहा.)
सोबतच्या तक्त्यात दर्शविला तोटा २५ जून २०१५ पर्यंत, ‘बँक निफ्टी’ निर्देशांक १७,४०० ते १७,६००च्या दरम्यान म्हणजे १०० च्या फरकात आहे त्या स्तरावर राहिला तरच होईल. परंतु हे अशक्य आहे. कारण ‘बँक निफ्टी’ची हालचाल मोठी असते. त्यामुळे ६,८५० रुपयांचा तोटा होण्याची भीती निराधार आहे.
info@primetechnicals.com