18 September 2020

News Flash

निर्देशांकांची उद्दिष्टपूर्ती!

विशेषत: येणाऱ्या तेजीत सामान्य गुंतवणूकदाराकडे असलेले ‘ब’ वर्गातील (मिड कॅप) समभागात सुखद तेजी अवतरेल.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या लेखात नमूद केलेले निफ्टीवरील ११,३५० चे वरचे इच्छित उद्दिष्ट हे गेल्या बुधवारी निफ्टीवर दिवसांतर्गत ११,३९० चा उच्चांक नोंदवून साध्य झाले. निफ्टीने साप्ताहिक बंद या स्तराजवळच दिला आहे. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स  :  ३७,५५६.१६

*  निफ्टी     : ११,३६०.८०

या आठवडय़ात निर्देशांकावर – सेन्सेक्सवर ३७,३५० आणि निफ्टीवर ११,२०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी आहे. एखाद्या संक्षिप्त घसरणीत या स्तराचा आधार घेत निर्देशांक पुन्हा ताजातवाना होऊन, सेन्सेक्सवर ३८,३०० / निफ्टीवर ११,५०० ते ११,६००चा नवीन उच्चांक दृष्टीपथात येईल. विशेषत: येणाऱ्या तेजीत सामान्य गुंतवणूकदाराकडे असलेले ‘ब’ वर्गातील (मिड कॅप) समभागात सुखद तेजी अवतरेल.

सोन्याचा किंमत-वेध

‘तांत्रिक विश्लेषणा’तील महत्त्वाची कल निर्धारण पातळी (ट्रेंड डिसायडर लेव्हल) शाश्वत तेजी या संकल्पना सोन्यावर देखील तंतोतंत लागू पडतात. हे सोन्याच्या आलेखाने दाखवून दिले. गेले महिनाभर सोन्याच्या भावावर ३०,००० रुपये ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी म्हणून वारंवार उल्लेख केलेला या स्तराखाली सोने २९,४०० रुपयांपर्यंत खाली घसरू शकते.  या वाक्याचे प्रत्यंतर सोन्याने १ ऑगस्टला २९,३६९ रुपयांचा नीचांक नोंदवून दिला. भविष्यात एकदा सोन्याला २८,८०० ते २९,००० रुपयांच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर यावे लागेल. त्यानंतर मात्र सोने झळाळून उठेल. सोन्यावर शाश्वत तेजी ही ३०,२०० रुपयांच्या स्तरावरच सुरू होईल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग

ग्लेनमार्क फार्मा  लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२२९६)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ५९७.३५

ग्लेनमार्क ही श्वसनरोग, हृदयरोग या व्याधींवर औषधे बनविणारी कंपनी आहे. ग्लेनमार्क समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ५५० रू. ते ६१५ रू. असा आहे. ६१५ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे ६६० रुपये आणि त्यानंतर ८०० रुपयांचे द्वितीय उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे १,२०० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ४९० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2018 1:12 am

Web Title: share market gold market analysis stock market analysis 2
Next Stories
1 महसुली सुधारणेचे आवर्तन
2 उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी!
3 प्रश्नार्थक कापूस उत्पादन; शेतकऱ्यांना सुसंधी!
Just Now!
X