portfolioखरं तर शेरॉनचा शेअर मी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुचवला होता. काही गुंतवणूकदारांनी हा शेअर त्या वेळी खरेदी करून नंतर ९० ला विकून फायदाही पदरात टाकला असेल. मात्र ज्या वाचकांनी ही संधी सोडली होती, त्यांना आता हा शेअर खरेदी करायची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. गेले काही दिवस ५० च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर जरूरखरेदी करा. कंपनीबद्दल थोडक्यात माहिती अद्ययावत रूपात पुन्हा खाली दिली आहे.
av-03१९८९ मध्ये सविता गौडा यांनी स्थापन केलेली ही कंपनी ‘एपीआय’ म्हणजेच अॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिएंट्सच्या उत्पादनात आणि वितरणात आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने देहराडूनखेरीज महाराष्ट्रातील तळोजा येथेही उत्पादन सुरू केले आहे. शेरॉन बायोच्या उत्पादनांना भारताखेरीज लॅटिन अमेरिका, दक्षिणपूर्व आशिया, आखाती देश तसेच सार्क देशांतूनही मागणी आहे. याशिवाय येत्या दोन वर्षांत जपान, युरोप आणि अमेरिका येथेही वितरण करण्याचा कंपनीचा मानस असल्याने कंपनीने नुकताच विस्तारीकरणाचा कार्यक्रमही राबवला आहे. सुमारे १२५ कोटी रुपयांच्या या विस्तारीकरणामुळे देहराडून येथील उत्पादन क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढली असून तळोजा येथील उत्पादनातही सुमारे ५०% वाढ होईल. शेरॉन बायो  सध्या अॅण्टि-अल्सर्स, हृदयरोग तसेच कॅन्सर अशा आजारांसाठी ‘एपीआय’मध्ये संशोधन करीत आहे. गेल्या आíथक वर्षांत आपल्या भागधारकांना बक्षीस समभाग देणाऱ्या या कंपनीने आपल्या समभागांचेही विभाजन करून दर्शनी मूल्य २ रुपये केले. परिणामी शेअर बाजारातील समभागांची द्रवणीयता वाढली आहे. सप्टेंबर २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत ३% किरकोळ वाढ दाखवली असली तरीही नक्त नफ्यातही १७ टक्के वाढ होऊन तो १९.२९ कोटींवर गेला आहे. उत्पादनाची वाढती मागणी आणि त्याला पूरक अशी उत्पादन क्षमता वाढविल्यामुळे येत्या आíथक वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. डेट/इक्विटी अर्थात कर्ज/भांडवल गुणोत्तर थोडे जास्त असले तरीही येत्या वर्षांत कंपनी परतफेड करून थोडे कर्ज कमी करेल, अशी आशा आहे.