abhyas-vargमागील अभ्यास वर्गामध्ये आपण लॉंग बटरफ्लाय (Long Butterfly) हे डावपेच कसे वापरावेत हे शिकलो. आज आपण शॉर्ट बटरफ्लाय (Short Butterfly) डावपेच शिकणार आहोत.
दिशा : तटस्थ (Neutral)- मला बाजार वर जाईल किंवा खाली जाईल हे सांगता येत नाही. पण आपण अशी अपेक्षा करतो की, बाजार, सुदृढीकरणामध्ये (consolidation) किंवा एका ठरावीक पातळीवर खाली (rangebound) होत राहणार नसून मोठय़ा प्रमाणात बाजार एक तर वर जाईल किंवा खाली येईल असे वाटते.
अस्थिरता (Volatility) – तेजीची अवस्था व ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) सध्या कमी आहे. परंतु आता बाजार वाढायला सुरू होणार आहे. कारण महत्वाचे निर्णय म्हणजे तिमाही ताळेबंद येणार आहेत. ध्वनित अस्थिरता किती असेल म्हणजे ती कमी मध्यम किंवा जास्त आहे, हे मी मागील अभ्यास वर्गामध्ये समजून सांगितले आहे. आपण वाचून काढावेत.
काय करावे?
१) बाजार भावाजवळचे दोन कॉल विकत घ्यावे.
२) एक ओटीएम व एक आयटीएम कॉल विकावा (आयटीएम कॉल महागात विकणार आहात आणि त्याचवेळी ओटीएम कॉल जर स्वस्त विकणार आहात, तर त्यामुळे बऱ्यापकी मिळकत होईल व काळजीचे कारण नाही.) याला कॉलचा शॉर्ट बटरफ्लाय आपण म्हणू.    
किंवा
१) बाजार भावाजवळचे दोन पुट्स विकत घ्यावे.
२) एक ओटीएम व एक आयटीएम पुट्स विकावे. याला पुटचा शॉर्ट बटरफ्लाय म्हणू.
आपणास हे लक्षात आले असेल की, कॉलच्या शॉर्ट बटरफ्लायमध्ये आपण एकीकडे कॉलचा बुल स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे कॉलचा बेअर स्प्रेड घेतो. कोणत्या तरी एका स्प्रेड मध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
तसेच पुटच्या शॉर्ट बटरफ्लायमध्ये आपण एकीकडे पुटचा बुल स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे पुटचा बेअर स्प्रेड घेतो. कोणत्यातरी एका स्प्रेड मध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
केव्हा वापरावे?
– आपणास हे माहित आहे की, ‘मनिनेस’नुसार विकल्पावर डेल्टा, वेगा, थीटाचा वेगवेगळा परिणाम होत असतो. एटीएम कॉल्स किवा पुटमध्ये सर्वात जास्त वेगा   असतो. ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) वाढली की,  एटीएम कॉल्स किवा पुटचे भाव सर्वात जास्त वाढणार आहेत. त्या मानाने ओटीएम किंवा आयटीएम कॉल/पुटचे भाव वेगा या संकलपनेमुळे वाढणार नाहीत. नेमका याच गोष्टीचा उपयोग करून कमाई करता येऊ शकते.
जेव्हा महत्त्वाचे निर्णय काही दिवसांत लागणार असल्याने संभ्रमावस्था प्रचंड वाढणार आहे. ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) वाढणार असल्यामुळे एटीएम विकल्पांचे भाव वाढणार आहेत. परंतु बाजार / शेअर वर जाईल की, खाली जाईल हे समजत नाही. परंतु कोणत्या तरी एका दिशेने नक्की कल आहे एवढे नक्की.     
परंतु बाजार / शेअर जर मोठय़ा प्रमाणात वर किंवा खाली गेल्यास विकत घेतलेल्या कॉल किवा पुटचा नफा अमर्याद राहणार आहे. त्याचवेळी विकलेल्या कॉल किंवा पुट दूर असल्याने त्यामधील तोटा कमी असेल आणि एकुणात शेवटी अमर्याद तोटा होऊ शकणार नाही. व थोडी मिळकत करून एकंदर खर्च कमी करावा हा एक उद्देश या डावपेचामागे आहे.
कोणत्या स्ट्राईकचे पर्याय विकत घ्यावे व कोणत्या स्ट्राईकचे पर्याय विकावे यांचा अंदाज बाजार वर गेला तर जास्तीत जास्त किती वर जाऊ शकतो व बाजार खाली गेल्यास तो किती खाली जाऊ शकतो यावरून करावा. या अभ्यास वर्गाचा विषय मर्यादित असल्याने हे ताडण्याविषयी तंत्राचा अभ्यास याचा सदरात पुढे कधीतरी करू.
खर्च : नाही. यामध्ये मर्यादित नफा व मर्यादित तोटा अभिप्रेत आहे.  
तोटा : मर्यादित. जास्तीत तोटा हा विकल्प खरेदी स्ट्राईक व विक्री स्ट्राईक यामधील फरक वजा शॉर्ट बटरफ्लायच्या डावपेचातून झालेली निव्वळ मिळकत.
नफा: मर्यादित. शॉर्ट बटरफ्लाय डावपेचातून झालेली निव्वळ मिळकत. व सदर जास्तीत जास्त नफा जेव्हा मोठय़ा प्रमाणात कोणत्यातरी एका बाजूने बाजाराची हालचालीच्या प्रसंगीच होईल.
ना नफा तोटा िबदू (Break even Point ): जेव्हा बाजार ’अ’ वजा निव्वळ मिळकत किंवा ‘क’ अधिक निव्वळ मिळकत.
av-01

नफा-तोट्याचे गणित कसे राहील हे समजण्यासाठी अगोदर झालेले अभ्यासवर्ग वाचावेत.
बाहेर केव्हा पडावे?
– जेवढे दिवस बाजार सुदृढीकरणामध्ये (Consolidation) राहील तेवढा तोटा होईल, त्यामुळे अचानक तेजी वा मंदी आल्यास होणारा नफा घेऊन बाहेर पडावे. अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
या डावपेचाचे खालील फायदे आहेत-
खरेदी करताना द्यावा लागणारा प्रीमियम व विकलेल्या विकल्पच्या मिळालेल्या प्रीमियममुळे निव्वळ मिळकत होते किंवा स्ट्राईकनुसार एकंदरीत खर्च कमी होतो. खरेदी व विक्री केलेल्या विकल्पासाठी ग्रीक्स जसे डेल्टा, वेगा, थीटाचा परिणाम परस्पर विरोधी असल्याने एकंदरीत परिणाम नगण्य होतो. बाजारातल्या मोठय़ा लोकांना तुम्हाला व्यवहारामधून (ळ१ंीि) बाहेर पाडणे शक्य होत नाही.
उदाहरणार्थ :
दिनांक २२/५/२०१५ रोजी सनफार्मा लिमिटेडचा शेअर आपण अभ्यासायला घेऊ. कारण सनफार्मा लिमिटेडचा तिमाही ताळेबंद २९ मे २०१५ ला जाहीर होणार आहे. निकाल कसा राहील हे मला माहित नाही व निकालाच्या परिणामाला बाजार कसा प्रतिसाद देतो हे मला आज ठरविता येत नाही. त्यामुळे माझा अंदाज तटस्थ (Neutral) आहे. पण आजपासून दिनांक २९/५/२०१५ पर्यंत संभ्रमता वाढत जाणार आहे, हे नक्की. अंदाजे ५% म्हणजे कमीत कमी रुपये १०५० किंवा ९५० पर्यंत शेअर जाईल, असा अंदाज घेतला तसेच डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा इत्यादींचा अभ्यास केला.
 info@primetechnicals.com