या स्तंभातून मागे आपण लाँग आयर्न काँडर्स (Condors) हे डावपेच कसे वापरावेत हे शिकलो. त्याप्रमाणे लाँग आयर्न बटरफ्लाय, शॉर्ट बटरफ्लाय कसे वापरावेत हेही शिकलोत आयर्न बटरफ्लाय प्रमाणेच या डावपेंचामध्ये सुद्धा आपण विकल्पांचे दोन प्रकार म्हणजे कॉल व पूट आणि क्रियेचे दोन प्रकार म्हणजे खरेदी किंवा विक्री या दोन्ही क्रिया एकाच वेळी या डावपेंचामध्ये वापरणार आहोत.
आपण वारंवार हा मुद्दा मांडला की बाजारात जी मंडळी दिग्गज आहेत त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोक दिशात्मक दृष्टीकोन ठेऊन कधीही सातत्याने अर्थार्जन करू शकत नाही. त्यामुळे तटस्थ राहून कसे डावपेच वापरावेत व नफा कसा करावा हे आपण शिकत आलो आहोत. यासाठी जे समजणे सहज शक्य आहे ते म्हणजे ध्वनित अस्थिरतेचा (Implied Volatility) वापर कसा करावा हे आपण शिकलो.
आज आपण शॉर्ट आयर्न काँडर्स बाबत शिकू या.
बाजाराबाबतचा दृष्टीकोन तटस्थ व अस्थिरतेबाबतचा दृष्टीकोन मंदीचा असता शॉर्ट आयर्न काँडर्स घ्यावा. या डावपेचात आपण दोन्ही प्रकार म्हणजे कॉल आणि पूट व दोन्ही क्रिया म्हणजे खरेदी आणि विक्री या गोष्टींचा वापर करणार आहोत. त्यामुळे मनीनेसनुसार खर्च कमी जास्त असेल व नफा तोटा सुद्धा कमी जास्त असेल. मनीनेस म्हणजे आताच्या बाजार भावाच्या किंवा अत्यंत जवळचा कॉल किंवा पूट यांना एटीएम म्हणतो व बाजारभावापेक्षा कमी असलेल्या स्ट्राईकच्या कॉल्सना ओटीएम तर पूट्सना आयटीएम म्हणतो. मागील अनेक अभ्यास वर्गामध्ये आपण समजून घेतले की विकल्पांचे अधिमूल्य मनीनेसनुसार कमी जास्त असते. त्याचवेळी त्यांचे डेल्टा, तिथी ऱ्हास, वेगा, गॅमा इत्यादी कमी जास्त असतात. त्यामुळे मनीनेसमुळे खर्च व नफा तोटा कमी जास्त असेल डावपेच घेताना योग्य स्ट्राईक निवडावे. (संकल्पना नीट समजण्यासाठी मागील लेख वाचावेत.)
शॉर्ट आयर्न काँडर्स (Short iron Condors)
दिशा – तटस्थ (Neutral )- मला बाजार वर जाईल किंवा खाली जाईल हे सांगता येत नाही. पण आपण अशी अपेक्षा करतो की बाजार, सुदृढीकरण (consolidation) मध्ये किंवा एका विशिष्ट श्रेणीमध्ये राहणार आहे. व बाजार मोठय़ा प्रमाणात वर जाणार नाही किंवा खाली जाणार नाही असे वाटते.
अस्थिरता (Volatility)- मंदीची, व ध्वनित अस्थिरता सध्या जास्त आहे. परंतु ती आता कमी व्हायला सुरू होणार आहे. कारण महत्त्वाचे निर्णय होऊन गेले आहेत.
av-02
काय करावे ?
१. बाजार भावाच्या थोडय़ा दूरचा म्हणजेच एक ओटीएम कॉल (ब) व एक थोडय़ा दूरचा ओटीएम पूट (क) दोन्ही विकावे.
२. वरील विकलेल्या स्ट्राईकच्या बाहेरचा म्हणजे त्या स्ट्राईकच्या दूरच्या स्ट्राईकचा म्हणजे एक डीप ओटीएम कॉल (अ) विकत घ्यावा व आणखी एक डीप ओटीएम पूट (ड) विकत घ्यावा.
हे करताना आपण काळजी घ्यावी की हे सर्व पर्याय प्रवाही (liquid) आहेत म्हणजे त्यात चांगला व्यवहार होत आहे. हे नसेल तर केवळ डावपेचासाठी म्हणून डावपेच घेऊ नये, व्यवहार बंद करताना खरेदीदार किंवा विक्रेते न सापडल्याने व्यवहार तोटय़ाचा होऊ शकतो. कोणते पर्याय प्रभावी आहेत हे मागील सांगितलेल्या कसोटीनुसार ठरवावेत आपणास हे लक्षात आले असेल. वरील प्रकारामध्ये आपण एकीकडे कॉलचा बेअर स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे पूटचा बुल स्प्रेड घेतो. किंवा चाणाक्ष ट्रेडर्स यांच्या असेही लक्षात येईल की, एक लाँग strangle घेतला (अ व ड) व २३१ंल्लॠ’ी च्या बाहेरच्या स्ट्राईकचा एक (strangle) विकला (ब व क). कोणत्यातरी एका स्प्रेडमध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
या डावपेचाचा मुख्य हेतू खर्च कमी करणे आहे. जो कॉल (ब) व जो पूट (क) आपण विकणार आहोत ते अशा स्ट्राईकचे आहेत की ज्या स्ट्राईकच्या दरम्यान बाजार राहणार आहे असे आपणास वाटते. व याचीच शक्यता जास्त आहे. ते महाग असल्याने आपणास जास्त रक्कम मिळेल. यदा कदाचित त्यापुढे बाजार गेला तरीही तोटा होणार नाही. कारण आपण ओटीएम कॉल व पूट विकत घेतला आहे. म्हणजे शॉर्ट काँडर्समध्ये असलेल्या अमर्याद तोटय़ाची शक्यता आपण दूर केली आहे व अमर्याद तोटा आता होऊ शकणार नाही.
महत्वाचे: जेव्हा आपण ट्रेडमध्ये असतो व तेव्हा आपणास जर का दिशा कळू शकली तर तेव्हा डावपेचाच्या एका अंगातून बाहेर पडून आपला नफा वाढवू शकता याला तडजोड (Adjustment) म्हणतात.
केव्हा वापरावे?
जेव्हा महत्त्वाचे निर्णय जसे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण, कंपन्यांचे तिमाही निकाल आताच लागून गेले आहेत. संभ्रमावस्था प्रचंड वाढलेली आहे व ध्वनित अस्थिरताही वाढलेली असल्यामुळे विकल्पांचे भाव फुगलेले आहेत. परंतु बाजार / शेअर्स वर जाईल की खाली जाईल हे समजत नाही पण ध्वनित अस्थिरता कमी होणार आहे हे नक्की आहे व बाजार कोणत्यातरी एका दिशेने थोडा फार जरी गेला तरी मी अमर्याद तोटय़ापासून स्वत:ला सुरक्षित केल्याने मला भीतीची चिंता नाही. तेव्हा सदर डावपेच वापरावेत.
आपणास हे लक्षात आले असेल की, वरील दोन्ही प्रकारामध्ये आपण एकीकडे बुल स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे बेअर स्प्रेड घेतो. कोणत्या तरी एका स्प्रेडमध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
तोटा : मर्यादित
नफा: मर्यादित – सर्वाधिक नफा जर बाजार (ब) व (क) च्या मध्ये राहिल्यास
बाहेर केव्हा पडावे:  अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
उदाहरणार्थ:
मी दिनांक १८ सप्टेंबर रोजी बँक निफ्टी या निर्देशांकाचा अभ्यास करतो. मला असे वाटते की, बँक निफ्टी आणखी काही दिवस तरी एका विशिष्ट पातळीमध्ये राहील. कारण अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हचे धोरण जाहीर होऊन गेले आहे. बँक निफ्टीचा बंद बाजार भाव १८ सप्टेंबरला १७,४०९ आहे. मी ऑक्टोबर महिन्याच्या विकल्प साखळीचा अभ्यास करतो.
खालील तक्त्यातील जास्तीत जास्त संभाव्य तोटा फक्त ३२५ आहे. दिनांक २९ सप्टेंबपर्यंत बँक निफ्टी १७,८०० ते १७,००० या दरम्यानच राहिल्यास नफा होईल. वरील ग्रीक्सचा निव्वळ परिणाम हा विकल्प करार चालू असतानाच असतो करार समाप्तीच्या वेळी हे सगळे परिणाम शून्य होतात. त्यामुळे विकल्प कराराच्या कालावधीमध्ये योग्य व समाधानकारक नफा झाल्यास करार समाप्तीची वाट न पाहता बाहेर पडावे.
info@primetechnicals.com