News Flash

असे झाले ‘स्मार्ट’प्राप्तीकर नियोजन!

मागच्या लेखामधे आपण पाहिले की वसंतरावांनी त्यांना स्वतला प्राप्तिकर भरावा लागू नये म्हणून अलका वहिनींना भेट (गिफ्ट) म्हणून काही रक्कम देऊन त्यांच्या नावावर करपात्र उत्पन्न

| July 27, 2015 01:06 am

kar-anvayमागच्या लेखामधे आपण पाहिले की वसंतरावांनी त्यांना स्वतला प्राप्तिकर भरावा लागू नये म्हणून अलका वहिनींना भेट (गिफ्ट) म्हणून काही रक्कम देऊन त्यांच्या नावावर करपात्र उत्पन्न असणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये पसे गुंतवले. त्यांना कलम ६४ नुसार ‘क्लिबग ऑफ इन्कम’ची तरतूद लागू झाल्यामुळे त्यामधून निर्माण झालेले उत्पन्न हे दडवलेले उत्पन्न (Concealment of Income) धरले जाऊन त्यावर व्याज, दंड भरावा लागला. कारण घरातील कुटुंबातील सदस्याच्या नावे उत्पन्न विभागले जाऊन प्राप्तिकर वाचावा म्हणून त्यांनी अनुसरलेला मार्ग (अजाणतेपणी का होईना) कायदेशीर नव्हता. या अनुभवानंतर मात्र वसंतराव जागे झाले आणि प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींची माहिती घेऊ लागले.
गुंतवणुकीवरील उत्पन्न त्यांच्या पत्नीच्या म्हणजे अलका वहिनींच्या नावेच राहावे, क्लिबग ऑफ इन्कमची तरतूदही लागू होऊ नये आणि आणि तेही प्राप्तिकर कायद्याच्या चौकटीत राहून असे काही करता येईल का? असा विचार ते करायला लागले. आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी माहिती जमा केली आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी केलेले प्राप्तिकर नियोजन असे होते:
सर्वप्रथम त्यांनी ही माहिती मिळवली की क्लिबग ऑफ इन्कम होऊ नये म्हणून पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला भेटीच्या (गिफ्टच्या) स्वरूपात रक्कम देऊन ती रक्कम गुंतवण्यापेक्षा थोडे-फार व्याज आकारून कर्ज म्हणून रक्कम द्यावी. अशी कर्जाऊ रक्कम ज्याला कर्ज दिले आहे त्याने गुंतवली असता ‘क्लिबग ऑफ इन्कम’ची तरतूद लागू होत नाही. या माहितीच्या आधारे त्यांनी प्राप्तिकर नियोजन केले. वसंतरावांच्या बचत खात्यामध्ये जमलेले ५,००,००० रुपये त्यांनी गुंतवणुकीच्या उत्पन्नाचे विभाजन व्हावे या उद्देशाने त्यांच्या पत्नीला किरकोळ व्याज आकारून कर्ज म्हणून दिले. ही रक्कम अलका वहिनींनी विविध गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवली आणि त्यामधून मिळणारे उत्पन्न अलका वहिनींच्या नावे केले आणि प्राप्तिकर वाचवला.
प्राप्तिकर वाचवण्यासाठी वसंतरावांनी अजून एक मार्ग अवलंबिला. त्यांना आपल्या मुलाच्या नावे भांडवल तयार करायचे होते जे त्याच्या उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसाय उभारायला उपयोगी होईल. त्यासाठी त्यांनी जे नियोजन केले ते असे:
त्यांच्या स्वतच्या नावे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते नव्हते. त्यांनी आपल्या आपल्या अज्ञान अपत्याच्या नावे पीपीएफ खाते उघडले. या खात्याची मुदत १५ वर्ष असते. या खात्यावर सध्या ८.७०% इतके करमुक्त व्याज मिळते. वसंतरावांनी या खात्यामध्ये दरवर्षी आपल्या मुलाला १,५०,००० रुपये भेट म्हणून जमा करायचे ठरवले. या नियोजनाचे त्यांना खालील फायदे मिळतील:
१. दरवर्षी जमा केलेल्या १,५०,००० रुपयांवर त्यांना कलम ८० सी अंतर्गत १००% वजावट मिळेल. वसंतराव ३०% कराच्या दरात येत असल्याने दरवर्षी त्यांचा ४५,००० रु. एवढा प्राप्तिकर वाचेल. हा झाला पहिला फायदा!

२. दुसरा फायदा म्हणजे त्यांच्या अज्ञान अपत्याच्या नावे (दरवर्षी गुंतवलेल्या १,५०,००० रुपयांवर प्रति वर्षी ८.७०% व्याज गृहीत धरून) १५ वर्षांनंतर एकूण ३,७४,२४५ रुपये व्याज जमेस धरून त्याच्या नावे ४६,७५,९१४ रुपयांचे मोठे भांडवल तयार होईल. जे त्याला शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी उपयोगी येईल.
३. तिसरा फायदा म्हणजे या खात्यावर मिळणारे (आताच्या घडीला ८.७०% प्रति वर्ष) व्याज कलम १०(११) अंतर्गत संपूर्णपणे करमुक्त आहे. त्यामुळे हे व्याज त्यांच्या स्वतच्या नावावर क्लब होण्याचा आणि कलम ६४ नुसार क्लिबग ऑफ इन्कमची तरतूद लागू होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
४. चौथा फायदा म्हणजे वसंतरावांना ८० सी अंतर्गत दर वर्षी ४५,००० रुपये करवजावट मिळेल. ही करबचत लक्षात घेता प्रत्यक्ष करमुक्त उत्पन्न ८.७०% पेक्षा जास्तच असेल. कारण त्यांच्या अज्ञान अपत्याच्या खात्यावर जे व्याज जमा होईल ते त्यांनी दर वर्षी गुंतवलेल्या १,५०,००० रुपयांवर. पण प्रत्यक्षात गुंतवलेले पसे असतील १,०५,००० रुपये! (१,५०,००० वजा कर बचतीचे ४५,०००) त्यामुळे प्रत्यक्षात व्याज मिळेल १२.४२% आणि तेही करमुक्त!!
असे नियोजन केल्यामुळे गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या रकमेवरील  उत्पन्न घरातल्या व्यक्तीमध्येच राहिले, व्याजच मुळी कलम १०(११) अंतर्गत करमुक्त असल्याने वसंतरावांच्या उत्पन्नात धरण्याचा प्रश्नच आला नाही. आणि त्यामुळे क्लिबग ऑफ इन्कमच्या तरतुदीपासून  ते कायदेशीरपणे दूर राहिले. त्यांचा प्राप्तिकरही वाचला आणि करमुक्त व्याज तेही १२.४२% दराने मिळाले!
आता वसंतराव यांच्या बरोबर अलका वाहिनी सुद्धा प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीविषयी माहिती घेऊ लागल्या. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पण ‘स्मार्ट’ नियोजन करून क्लिबग ऑफ इन्कम होऊ न देता कायद्याच्या चौकटीत राहून प्राप्तिकर वाचवला. अलका वहिनींनी क्लिबग ऑफ इन्कम होऊ नये यासाठी  ‘स्मार्ट’ नियोजन काय केले ते पुढच्या लेखात वाचायला विसरू नका!
लेखक, प्राप्तिकर नियोजन सल्लागार
dattatrayakale9@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:06 am

Web Title: smart tax planning
टॅग : Kar Anvay,Tax
Next Stories
1 आर्थिक नियोजन यशवंताचे
2 कंपनी मुदत ठेवी गुंतवणूकदारांसाठी कानमंत्र
3 विरामभंग आणि तेजी-मंदीवाल्यांचे सापळे!
Just Now!
X