19 February 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : अस्थिर बाजारात भागभांडाराचे स्थैर्य

सोनाटा सॉफ्टवेअर ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

सध्याच्या अस्थिर वातावरणात सोनाटासारख्या कंपन्यांचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलियोला स्थर्य देऊ शकतात. सध्या ३०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दोन वर्षांत ३० टक्के परतावा देऊ शकेल..

सोनाटा सॉफ्टवेअर ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. सोनाटा प्लॅटफॉर्म-आधारित डिजिटल रूपांतरण उपक्रमांना सक्षम, व्यवसाय, ओपन, इंटेलिजेंट आणि स्केलेबल व्यवसाय तयार करण्यास सक्षम करते. कंपनीची प्लॅटफॉम्रेशन कार्यपद्धती ग्राहकांना सातत्याने दीर्घकालीन मूल्य देण्यासाठी उद्योग कौशल्य, प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी, नावीन्यपूर्ण डिझाइन आणि रणनीतिक गुंतवणुकीचे मॉडेल एकत्र आणते. सोनाटा आज रिटेल, मॅन्युफॅक्चिरग आणि डिस्ट्रिब्युशन, ट्रॅव्हल अँड सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमधील एक विश्वासार्ह नाव आहे. कंपनीच्या सोल्यूशन पोर्टफोलिओमध्ये स्वत:चे डिजिटल प्लॅटफॉर्म समाविष्ट आहे यात ब्रिक आणि क्लिक रिटेल प्लॅटफॉर्म, मॉडर्न डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म, रेझोपिया डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म, रॅपिड डेव्हॉप्स प्लॅटफॉर्म, कर्तोपिया ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, हॅलोसिस मोबिलिटी प्लॅटफॉर्म, कमोडिटी सीटीआरएम प्लॅटफॉर्म, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, मायक्रोसॉफ्ट अझर, सॅप हायब्रिस, क्लाऊड अभियांत्रिकी आणि व्यवस्थापित सेवा यासारख्या आयएसव्ही डिजिटल तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवरील सेवांचा समावेश होतो. तसेच नवीन डिजिटल युगात कंपनी आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लìनग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, चॅटबॉट्स, ब्लॉक चेन आणि सायबर सिक्युरिटी इ. आधुनिक तंत्रज्ञानातदेखील प्रगती करीत आहे.

गेल्या पाच वर्षांत कंपनीने आपल्या कामगिरीत सातत्य राखून भागधारकांनाही खूश केले आहे. मागच्या आर्थिक वर्षांत कंपनीने ८२९.३३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७२.१९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. जून २०१९ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २०८.७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७.१७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १६ टक्क्यांनी कमी असला तरीही कंपनी यंदाच्या आर्थिक वर्षांतदेखील आपल्या कामगिरीत सातत्य राखेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने सात नवीन ग्राहक मिळविले आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणात सोनाटासारख्या कंपन्यांचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलियोला स्थर्य देऊ शकतात. सध्या ३०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दोन वर्षांत ३० टक्के परतावा देऊ शकेल.

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.१०

(बीएसई कोड – ५३२२२१)

पुस्तकी मूल्य :   रु. ५०.७

दर्शनी मूल्य :    रु. १/-

लाभांश :   १२७५%

प्रति समभाग उत्पन्न : रु. १५.८५

पी/ई गुणोत्तर :  १९.७

समग्र पी/ई गुणोत्तर :  १३.७३

डेट इक्विटी गुणोत्तर :  ०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ५६.४६

रिटर्न ऑन कॅपिटल :   ४६.५०

बीटा :     ०.७

मिड कॅप समभाग

प्रवर्तक : वीरेन रहेजा

उत्पादन : आयटी/ सॉफ्टवेअर

बाजारभांडवल:  रु. ३,२९४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु.  ४२९ / २६६

भागभांडवल:  रु. १०.५२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     २८.१७

परदेशी गुंतवणूकदार    १३.८९

बँक/ म्यु. फंड/ सरकार  ९.९५/

इतर/ जनता ४७.९९

First Published on September 9, 2019 12:47 am

Web Title: sonata software shareholder stock market abn 97
Next Stories
1 फेरउभारी अद्याप दूरच..
2 अपरिहार्य स्थित्यंतर
3 मंदी तर आहे.. पण, मग करावं काय?
Just Now!
X