आशीष ठाकूर

या महिन्याच्या पूर्वार्धात नितांत सुंदर अशी तेजीची मैफल चालू होती. पण का कुणास ठाऊक तेजीचे सूर क्षणार्धात बदलून सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टीने ११,६००चा भरभक्कम आधार दिवसांतर्गत वाटचालीत तोडला. या घटनेने तेजीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांची मैफल मात्र एकदम सुनी सुनी झाली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३९,६१४.०७

निफ्टी: ११,६४२.४०

या महिन्यातील सर्वात महत्त्वाची घटना ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल. यात डोनाल्ड ट्रम्पपुन्हा विजयी झाल्यास तेजीच्या मैफलीत पुन्हा रंग भरून निर्देशांक आपल्या प्रलंबित अशा तेजीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरू होईल. निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४१,७०० ते ४३,००० आणि निफ्टीवर १२,२५० ते १२,६०० असेल.

या सर्व भविष्यकालीन उत्साहवर्धक घटना घडत असताना सेन्सेक्स ४१,००० आणि निफ्टी १२,००० च्यावर सातत्याने टिकणे नितांत गरजेचे आहे. पण हाच टप्पा ओलांडण्यास निर्देशांक अपयशी ठरून या स्तराखाली निर्देशांक सातत्याने टिकल्यास गुंतवणूकदारांनी सावध होण्याची गरज असून, ही भविष्यातील घातक उतारांची नांदी ठरू शकेल.

वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या निकालपूर्व तिमाही विश्लेषणाकडे वळूया.

१) एचडीएफसी लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २ नोव्हेंबर

> ३० ऑक्टोबरचा बंद भाव – १,९२२.७५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,९५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,०८०, द्वितीय लक्ष्य २,२००

ब) निराशादायक निकाल : १,९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८३० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा-गुरुनाथ तेंडुलकर, जाधव, सुरेश चिंचापुरे यांच्याकडून)

२) स्टेट बँक ऑफ इंडिया

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ४ नोव्हेंबर

> ३० ऑक्टोबरचा बंद भाव – १८९,२५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २०७, द्वितीय लक्ष्य २२५

ब) निराशादायक निकाल : १९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १७५ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- दिनेश खरात, जयंत सावंत, साहिल जाधव, राजेंद्रनाथ गडकरी,अजिंक्य ताकसांडे यांच्याकडून)

३) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल)

तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ६ नोव्हेंबर

> ३० ऑक्टोबरचा बंद भाव – २८ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०, द्वितीय लक्ष्य ३४

ब) निराशादायक निकाल : २८ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २६ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- श्रीकांत देशपांडे, गिरीश जोशी यांच्याकडून)

४) आयटीसी लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ६ नोव्हेंबर

> ३० ऑक्टोबरचा बंद भाव – १६५.२५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७५, द्वितीय लक्ष्य १९०

ब) निराशादायक निकाल : १६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १५० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- गणेश दांडगे, अनुजा नेसरीकर, चंद्रशेखर कुळकर्णी, प्रशांत जगदाळे, जयंत सावंत, मंगेश कुळकर्णी)

५) डिव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, ७ नोव्हेंबर

> ३० ऑक्टोबरचा बंद भाव – ३,१४०.३५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,१५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,३००, द्वितीय लक्ष्य ३,४५०

ब) निराशादायक निकाल : ३,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,००० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- संजय ठाकूरदेसाई यांच्याकडून)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक