29 November 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : आता वाजले की बारा!

जेव्हा आपण विस्तृत आढावा घेतो तेव्हा त्यातील खाचखळग्यांचा विचार होणेदेखील क्रमप्राप्त आहे.

आशीष ठाकूर

‘निफ्टीला जाऊ द्या ना बारा हजारांच्या वरी, नाहीतर वाजतील तेजीचे बारा’.. सरलेल्या दोन सप्ताहात निफ्टी निर्देशांकाला वारंवार १२,०००चा टप्पा ओलांडण्यास अपयश येत असल्याने, गुंतवणूकदारांना आपसूकच वरील प्रश्न पडायला लागला आहे. वरील प्रश्नाचा विस्तृत आढावा घेण्याअगोदर, सरलेल्या साप्ताहातील बाजाराचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४०,६८५.५०

निफ्टी : ११,९३०.३५

या स्तंभातील गेल्या लेखात सर्वात प्रथम, तेजीच्या वाटचालीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करून गुंतवणूकदारांच्या मानसिक व आर्थिक तयारीला सुरुवात केली, हे किती गरजेचे होते, त्याचे सरलेल्या आठवडय़ाने प्रत्यंतर देखील दिलं. निर्देशांकांनी तेजीचा  पहिला टप्पाच म्हणजे सेन्सेक्सची ४१,१०० आणि निफ्टीची १२,०५० ओलांडताना दमछाक होत असल्याने, या टप्प्यांचा विस्तृत आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.

येणाऱ्या दिवसांत, सेन्सेक्स ४१,१०० आणि निफ्टी १२,०५० च्या पल्याड झेपावण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांकावर एक घसरण संभवते. घसरणीचे टोक सेन्सेक्सवर ३९,६५० आणि निफ्टीवर ११,६०० असेल. या स्तरावर पायाभरणी होऊन, भविष्यातील तेजीच्या चढाईत निर्देशांक सेन्सेक्सवर ४१,१०० आणि निफ्टीवर १२,०५० च्या पल्याड झेपावून दुसरा टप्पा सेन्सेक्सवर ४१,७०० आणि निफ्टीवर १२,२५० गाठू शकेल. जेव्हा आपण विस्तृत आढावा घेतो तेव्हा त्यातील खाचखळग्यांचा विचार होणेदेखील क्रमप्राप्त आहे. तो म्हणजे, येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स-निफ्टीला अनुक्रमे ४१,१०० आणि १२,०५० पार करण्यास, आणि त्यानंतर अनुक्रमे ३९,६५० आणि ११,६००चा स्तर राखण्यास, अशा दोन्ही स्तरावर निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास त्यांनी अगोदरच ४१,१०० आणि १२,०५० चा उच्चांक नोंदवला आहे असे गृहीत धरावे. अर्थात वाजले की बारा!

वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या निकालपूर्व तिमाही विश्लेषणाकडे वळू या.

१) अ‍ॅक्सिस बँक

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २८ ऑक्टोबर

> २३ ऑक्टोबरचा बंद भाव – ५०७.१५ रु.

>  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५५०, द्वितीय लक्ष्य ६००.

ब) निराशादायक निकाल : ४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा : डी.सी.पाटील यांच्याकडून)

२) फर्स्टसोर्स सोल्यूशन्स

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २८ ऑक्टोबर

> २३ ऑक्टोबरचा बंद भाव –  ७३.३५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७५, द्वितीय लक्ष्य ९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५८ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- श्रीधर वैद्य यांच्याकडून)

३) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लि.

> तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २८ ऑक्टोबर

> २३ ऑक्टोबरचा बंद भाव – ९४१.२० रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९९०, द्वितीय लक्ष्य १,०२०

ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८४० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा – मंगेश कुलकर्णी, साहिल जाधव यांच्याकडून)

४) आयसीआयसीआय बँक

> तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, ३१ ऑक्टोबर

> २३ ऑक्टोबरचा बंद भाव- ४१६.८५ रु.

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४३०, द्वितीय लक्ष्य ४६०

ब) निराशादायक निकाल : ३७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३४० रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा-  गणेश दांडगे यांच्याकडून)

५) आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

> तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, ३१ ऑक्टोबर

> २३ ऑक्टोबरचा बंद भाव- ३१.४० रु .

> निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३४, द्वितीय लक्ष्य ३८

ब) निराशादायक निकाल : ३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७ रुपयांपर्यंत घसरण.

(समभागासंदर्भातील विचारणा- संजय बर्वे, अजिंक्य ताकसांडे, मिलिंद नेर्लेकर, विजय सोनार यांच्याकडून)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 12:06 am

Web Title: stock market analysis weekly share market report zws 70
Next Stories
1 कर बोध : शिक्षण आणि प्राप्तिकर कायदा
2 अर्थ वल्लभ : परिघाबाहेरचा फंड
3 थेंबे थेंबे तळे साचे : दीपोत्सवानिमित्त दहा मंत्र!