आशीष ठाकूर
गेल्या लेखातील वाक्य होते : ‘‘गुंतवणूकदार राजा, तेजीच्या चांदण्यात फिरताना सावध राहा. राजा, रात्र वैऱ्याची आहे.’’ हे वाक्य आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर अनुभवायला मिळाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानचे परागंदा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी हे वाक्य प्रत्यक्षात अनुभवले, तर एक राष्ट्र तालिबानच्या आधिपत्याखाली आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व भांडवली बाजारात घसरण होऊन, त्याचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले. इथल्या गुंतवणूक राजांनी या वाक्याची दाहकता अनुभवली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५५,३२९.३२

निफ्टी : १६,४५०.५०

या स्तंभातील ९ ऑगस्टच्या लेखातील वाक्य होते- ‘‘आताच्या घडीला अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणुकीचा कालावधी तीन महिन्यांहून कमी) आता नवीन समभागांची खरेदी थांबवून, समभागांच्या नफारूपी विक्रीवर लक्ष केंद्रित करावे. नफ्यातील विक्रीयोग्य समभागांचे २० टक्क्यांच्या पाच तुकडय़ांत विभागणी करून, निफ्टी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यांवर समभागांची नफारूपी विक्री करून नफा पदरात पाडून घ्यावा..’’

हा समयोचित सल्ला बाजार उच्चांकावर असताना दिलेला होता, कारण उच्चांकावरून बाजार घसरण्याची जी भीती वाटत होती ती आता प्रत्यक्षात येत आहे. आता चालू असलेल्या निर्देशांकावरील घसरणीला कुठल्या स्तरावर भरभक्कम आधार असेल, सुधारणा होत असताना संभाव्य अडथळा काय असेल आणि आता चालू झालेल्या घसरणीची व्याप्ती किती असेल त्याचा आज विस्तृत आढावा घेऊ या.

निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटण्यासाठी आपण साधी, सोपी, लक्षात राहणारी पद्धत विकसित करू या.

निफ्टी निर्देशांकाची वाटचाल ही आताच्या घडीला २०० अंशांच्या परिघात असेल. यासाठी निफ्टी निर्देशांकावर १६,४००चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर मानून १६,४०० अधिक २०० अंश, पुढे १६,६०० अधिक २०० अंश असे १६,८०० हे निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य असेल. मात्र नजीकच्या भविष्यात निफ्टी निर्देशांक १६,४०० भरभक्कम आधार राखण्यास अपयशी ठरल्यास २०० अंशांच्या पटीत घसरण गृहीत धरावी.

म्हणजेच निफ्टी निर्देशांकाची खालची लक्ष्ये ही १६,४०० उणे २०० अंश १६,२००.. १६,२०० उणे २०० अंश १६,०००.. १५,८०० अशी असतील.

या स्तंभाच्या माध्यमातून पूर्वी विकसित केलेले व नंतर काळाच्या कसोटीवर उतरलेले १,००० ते १,२०० अंशांच्या मंदीचे सूत्र लक्षात घेता, आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक हा १६,७०० आहे त्यातून १,००० ते १,२०० अंश वजा करता निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १५,७०० येते, जे निफ्टी निर्देशांकाच्या २०० अंशांच्या पटीतील घसरणीशी साधर्म्य दाखवत आहे.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची

ज्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात सोनेरी इतिहास, मैलाचा दगड प्रस्थापित करतात त्या कंपन्यांकडे दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद, गृहकर्ज फेडण्यासाठी, निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद म्हणून बघतात. अशीच एक कंपनी – मारुती सुझुकी लिमिटेडचे तिमाही वित्तीय निकाल सर्वसामान्य आले. त्यात भर म्हणजे कंपनीच्या माणेसरमधील कारखान्यात सेमी कंडक्टरमधील संगणकीय प्रणालीतील चिपच्या तुटवडय़ामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. तर या परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांची मारुती सुझुकी लिमिटेडच्या समभागात दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे त्यांनी काळजीत पडणे क्रमप्राप्त आहे. गुंतवणूकदारांची मानसिक निश्चिंती असणे काळाची गरज आहे. या दृष्टीने मारुती सुझुकीच्या तिमाही निकालाचा अभ्यास करू या.

या स्तंभातील २६ जुलैच्या लेखात मारुती सुझुकी लिमिटेड या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केले होते. त्यासमयी मारुती सुझुकी लिमिटेडचा बाजारभाव ७,२९० रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ७,२०० रुपये होता. निकालापश्चात कंपनी महत्त्वाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखण्यास अपयशी ठरली आणि १७ ऑगस्टला ६,८०० रुपयांचे (लेखात नमूद केल्याप्रमाणे) खालचे लक्ष्य तिने गाठले.

मारुती सुझुकी लिमिटेडच्या ६,८०० रुपयांपर्यंतच्या घसरणीने, आता हा समभाग मंदीत असून, दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी ६,८०० स्तरावर बारीक नजर ठेवावी. हा स्तर राखल्यास मारुतीचे प्रथम वरचे लक्ष्य ७,२०० व त्यानंतर ७,५०० रुपयांचे असेल. त्या उलट समभाग ६,८०० रुपयांच्या खाली सातत्याने टिकल्यास प्रथम ६,६०० रुपये व त्यानंतर ६,४०० रुपयांची मानसिक तयारी ठेवावी.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.