22 September 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : मन मनास उमगत नाही

अर्थचक्र पूर्वपदावर यायला किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज.

आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेचे काही बरं चाललेलं नाही. अतिशय चिंताजनक बातम्या येत आहेत. काही ठिकाणी नोकरकपात, तर कुठे वेतनकपात. याचा थेट परिणाम लोकांच्या क्रयशक्तीवर होऊन, याची पडछाया ही अगोदर घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरता येणे, यातून बँकांवरील कर्जे थकत जाण्याचा वाढता ताण आणि नवीन अनुत्पादित कर्जासाठी तरतूद करण्याची समस्या अशी ही गुंतागुंत आहे.

अर्थचक्र पूर्वपदावर यायला किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज. थोडक्यात श्रावणात अर्थव्यवस्थेवर वैशाखातील माध्यान्हीचा सूर्य तळपत आहे.

हे झाले एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला, याच्या बरोबर उलट निर्देशांकावर तेजीची चाल, सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे व भूमिती श्रेणीत वाढणारे सोन्या-चांदीचे भाव. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे तरी कशात?

गुंतवणूकदारांच्या भावनेला सुधीर मोघे यांच्या ‘मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा’ या काव्यपंक्ती अगदी चपखल बसतात. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३७,६०६.८९

निफ्टी : ११,०७३.४५

येणाऱ्या दिवसांत निर्देशांक हे सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५० च्या वर टिकण्यास यशस्वी ठरल्यास, सेन्सेक्सचे वरचे लक्ष्य हे ३९,५०० असेल आणि निफ्टी ११,६०० पर्यंत मजल मारू शकेल. ही नाण्याची एक बाजू झाली.

आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता जर निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स ३७,४०० आणि निफ्टी ११,००० च्या खाली सातत्याने टिकल्यास, सेन्सेक्स प्रथम ३६,७०० आणि निफ्टी १०,८०० पर्यंत खाली येईल. उपरोक्त स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,८५० आणि निफ्टीवर १०,५५० असे असेल.

आगामी तिमाही निकालांचा वेध.. १) कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड

० तिमाही निकाल – बुधवार, ५ ऑगस्ट

० ३१ जुलैचा बंद भाव – ३८८.४५ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४०० रुपये. भविष्यात ३५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३५० ते ४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३२० रुपयांपर्यंत घसरण.

२) ईआयडी पॅरी (इंडिया) लिमिटेड

० तिमाही निकाल – बुधवार, ५ ऑगस्ट

० ३१ जुलैचा बंद भाव – २९०.६० रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २७५ रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये. भविष्यात २७५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २७५ ते ३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत     २५० रुपयांपर्यंत घसरण.

३) गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड

० तिमाही निकाल – बुधवार, ५ ऑगस्ट

० ३१ जुलैचा बंद भाव – ९२६.४० रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ९५० रुपये. भविष्यात ९०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,०५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ९०० ते ९५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत    ७२० रुपयांपर्यंत घसरण.

४) ल्युपिन लिमिटेड

० तिमाही निकाल – गुरुवार, ६ ऑगस्ट

० ३१ जुलैचा बंद भाव – ९२६.७५ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ९५० रुपये. भविष्यात ९०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,१०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ९०० ते ९५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७७५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:06 am

Web Title: stock market technical analysis stock market analysis zws 70 2
Next Stories
1 अर्थ वल्लभ :  जोखीम व्यवस्थापनातील चाणक्य – शिवामूठ भाग- २
2 ‘करोना-टाळेबंदी बँक-ग्राहक नात्यांत नव्याने समीपता साधणारी!’
3 थेंबे थेंबे तळे साचे  : मुलांसाठी गुंतवणूक 
Just Now!
X