आशीष ठाकूर

सौंदर्यवान स्त्रीच्या सौंदर्यात तीचं सामर्थ्य असतं आणि सामर्थ्यवान पुरुषाच्या सामर्थ्यांत त्याचं सौदर्य असत. या अलंकारिक वाक्याची आठवण होण्याचे कारण गेल्या तीन महिन्यातील घटनाक्रम बघता सामर्थ्यवान अशा येस बँक, टेम्पल्टन यांनी हात वर केल्यावर, विद्युलतेच्या वेगाहून अधिक जलद वेगाने या बुडणाऱ्या लोकांना हात देऊन सावरणारी सामर्थ्यवान रिझव्‍‌र्ह बँकेच्या कृतीतील सौंदर्याला जवाब आहे.

गुरुवारचा बंद भाव

सेन्सेक्स : ३३,७१७.६२

निफ्टी : ९,८५९.९०

गेल्या लेखात नमूद केल्या प्रमाणे बाजाराची वाटचाल ही दिव्याची ज्योत ही विझण्या अगोदर मोठी होते अशाच धाटणीच आहे हे वाक्य सरलेल्या सप्ताहातील बाजारातील वर्तनावरून दिसलं व हीच संधी साधत ६ एप्रिलला सुचवलेल्या समभाग संच बांधणीतल्या (पोर्टफोलिओमधल्या) समभागांचा आढावा घेता अवघ्या एक महिन्याच्या आत अथवा अगोदरच बहुतांश समभागातून जवळपास ३० टक्कय़ांहून अधिक परतावा मिळत आहे.

जसे की आय.आर.सी.टी.सी. लिमिटेड रुपये १,०८३ वरून १,५०० रुपये, नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड रुपये १,२६७ वरून १,६९३ रुपये, आय.ओ.एल. केमिकल्स लिमिटेड रुपये१९३ वरून ३०० रुपये, वेदांता लिमिटेड रुपये ६३ वरून ८४ रुपये, सिप्ला लिमिटेड रुपये ४४९ वरून ६३० रुपये, टाटा केमिकल्स लिमिटेड रुपये २१८ वरून २९६ रुपये. एफ.डी.सी.लिमिटेड रुपये २०० वरून २७० रुपये.

वरील सर्व समभाग मंदीच्या काळात,‘तेजीची ज्योत आता विझेल की नंतर’ अशावेळी सुचवलेले व आता तेजीच्या वातावरणात, अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळत असल्याने, त्यांनी अर्धे समभाग विकून फायदा पदरात पाडून घेणे श्रेम्यस्कर.

समभाग संच बांधणीचे निकष :

डिसेंबरमध्ये बाल्यावस्थेत असलेला करोनानी अल्पावधीत अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने औषध उद्योगाला चालना मिळणं अपेक्षितच होतं. यात उच्च प्रतीच्या रसायन निर्मिती – जिचा उपयोग औषधांसाठी केला जातो त्या नवीन फ्लोरिनचा विचार होणे क्रमप्राप्त होतं.

१९६७ साली पद्म्नाभ मफतलाल यांनी स्थापन केलेली देश विदेशात शाखा असलेली, उच्च प्रतीची रसायन बनवण्याचा ध्यास असलेली, जिची उत्पादन विविध रसायन कंपन्या आपला मुख्य कच्चा माल म्हणून वापरतात. अशा नवीन फ्लोरिनची १,२६७ रुपयांवर असताना निवड केली व अल्पावधीत १,६९३ चा उच्चांक नोंदवत अल्पावधीत ३० टक्कय़ांचा परतावा दिला. काळाच्या कसोटीवर या कंपनीची निवड समभाग संच बांधणीसाठी योग्य होती हे सिध्द झालं.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड

तिमाही निकाल – मंगळवार, ५ मे

३० एप्रिलचा बंद भाव – रु. ४७२.१०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४५० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४८० रुपये. भविष्यात ४५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५४०रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४५० ते ४८० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.

नेस्टले इंडिया लिमिटेड

तिमाही निकाल – मंगळवार, १२ मे

३० एप्रिलचा बंद भाव – रु. १७,९०६.१०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर –  १६,८०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १६,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १८,३०० रुपये. भविष्यात १६,८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २१,००० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १६,८०० ते १८,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर १६,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १४,६०० रुपयांपर्यंत घसरण.

ए.बी.बी.लिमिटेड

तिमाही निकाल – बुधवार, १३ मे

३० एप्रिलचा बंद भाव – रु. ९००.८५

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८२५ रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९३० रुपये. भविष्यात ८२५ रुपयांचा

स्तर सातत्याने राखल्यास १,०५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ८२५ ते ९३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ८२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७२५ रुपयांपर्यंत घसरण.

डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज लिमिटेड

तिमाही निकाल – बुधवार, २० मे

३० एप्रिलचा बंद भाव – रु. ३,९३७.२०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,६५० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,६५० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ४,१००रुपये.भविष्यात ३,६५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४,३००रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३,६५० ते ४,१०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर ३,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,३५० रुपयांपर्यंत घसरण.