News Flash

बाजाराचा तंत्र-कल :  लक्ष्यपूर्तीचा पुन:प्रत्यय

निफ्टीवर १५,००० चे आपले पहिले लक्ष्य साध्य करत, आपल्या द्वितीय लक्ष्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शीष ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘तेजीच्या दृष्टिकोनातून सेन्सेक्स ४८,९०० आणि निफ्टी निर्देशांक १४,७०० च्या स्तरावर टिकल्यास, निर्देशांकांचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० असे असेल.’ सरलेल्या सप्ताहात निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० चे आपले पहिले लक्ष्य साध्य करत, आपल्या द्वितीय लक्ष्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५०,५४०.४८

निफ्टी: १५,१७५.३०

निफ्टी निर्देशांकाची भविष्यातील वाटचाल कशी असू शकेल यासाठी निफ्टी निर्देशांकाची ३०० अंशांची ‘जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली’ आपण विकसित केली आहे आणि मागे अनेकदा या स्तंभात त्या संदर्भात उल्लेख आला आहे. यात निफ्टी निर्देशांकाचा १४,७०० चा स्तर केंद्रबिंदू मानत त्यात ३०० अंश मिळवले असता १५,००० चे वरचे लक्ष्य दृष्टिपथात येते. सद्य:स्थितीत निर्देशांकाने – सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर राखला असल्याने, आता वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५२,००० ते ५२,५०० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,३०० ते १५,४५० असे असेल. निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असणार आहे. भविष्यात हा स्तर निर्देशांकांने सातत्याने राखल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५२,००० ते ५३,५०० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,३०० ते १५,६०० असे असेल.

या तेजी-मंदीच्या चक्रात ज्या दिवशी सेन्सेक्स ५०,००० आणि निफ्टी निर्देशांक १५,००० च्या स्तराखाली येऊन, तेथे सातत्याने टिकल्यास गुंतवणूकदारांनी मंदीची आर्थिक, मानसिक तयारी ठेवावी. अशा वेळी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४८,००० आणि निफ्टी निर्देशांकावर १४,४०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) एमजीएल / महानगर गॅस लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल –  सोमवार, २४ मे

’ २१ मेचा बंद भाव – १,१३४.९० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – १,०८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१८० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,०८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०२० रुपयांपर्यंत घसरण.

२) किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २५ मे

’ २१ मेचा बंद भाव – २९०.७५ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३३५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : २६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२० रुपयांपर्यंत घसरण.

३) थरमॅक्स लिमिटेड    

’ तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २५ मे

’ २१ मेचा बंद भाव – १,४१८.३० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – १,३८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,३८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२७० रुपयांपर्यंत घसरण.

४) फायझर लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २६ मे

’ २१ मेचा बंद भाव – ५,२३८ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५,१०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,६५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,८५० रुपयांपर्यंत घसरण.

५) नोसील लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २७ मे

’ २१ मेचा बंद भाव – २१४.०५ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २४० रुपये, द्वितीय लक्ष्य २७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १६० रुपयांपर्यंत घसरण.

) ३ एम इंडिया लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २८ मे

’ २१ मेचा बंद भाव – २६,०२२ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २४,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २८,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ३०,००० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २४,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२,००० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966 @gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2021 1:04 am

Web Title: stock market technical analysis stock market information zws 70
Next Stories
1 करोनाकाळात बचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग
2 फंडाचा ‘फंडा’.. :  अद्ययावत तंत्रजगताच्या संधींचा वेध
3 विमा.. सहज, सुलभ : नामांकन महत्त्वाचेच!
Just Now!
X