मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

दोन दशकांपूर्वीची गोष्ट. अभावग्रस्त बुलढाण्याचा एक तरुण सोबतीला एक सायकल घेऊन उपराजधानीत आला. येथे येण्यामागचे एकच कारण आणि ते म्हणजे साहसी क्रीडा प्रकारावरील त्याचे प्रेम. घरी त्याने साहसाची चुणूक अनेकदा दाखवली आणि त्यासाठी त्याला आईकडून चांगला ‘प्रसाद’ही मिळालेला. मात्र, साहसाने झपाटलेल्या या तरुणाला आवर घालणे कठीण होते. उपराजधानीत पाय ठेवल्यानंतर ना ओळख, ना पाळख. अशाही स्थितीत हळूहळू त्याने आपली वाट शोधायला सुरुवात के ली. सुरुवातीला काही वर्षे आवड म्हणून ‘बनो ऑलराउंडर’ हा छोटासा क्लब सुरू के ला. सुखासीन आयुष्य जगणाऱ्या शहरी मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवावर आधारित शिक्षण देणे, त्यांच्यातील अविकसित कौशल्याला विकसित करणे हा त्यामागचा उद्देश. तो नेमका यशस्वी ठरला आणि त्यातून ‘सीएसी ऑलराउंडर’ या साहसी क्रीडा उपक्र म राबवणाऱ्या संस्थेचा जन्म झाला. मध्य भारताला खऱ्या अर्थाने साहसी क्रीडा व्यवसायाची ओळख करून दिली ती या संस्थेने. अमोल खंते असे या ध्येयवेडय़ा युवकाचे नाव. अमोल खंते संचालक असलेल्या सीएसी ऑलराउंडरने राज्याची उपराजधानी नागपुरातून आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.

आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा स्थितीत खंते यांनी साहसी शिबिरे, त्या ठिकाणी क्लायम्बिंग वॉल, झिपलाइन आदीची उभारणी आणि मग प्रशिक्षण देणे सुरू केले. मुलांना अंभोरा, रामटेक, गोरेवाडा, सेमिनरी हिल्स अशा ठिकाणी ट्रेकिं गला घेऊन जाण्यापासून साहसी क्रीडा व्यवसायाची प्रारंभिक वाटचाल सुरू झाली होती. पण, हे पुरेसे नव्हते. मग विचार केला की कायमस्वरूपी जागा मिळाली तर! जास्तीतजास्त मुलांना ‘ओव्हर प्रोटेक्टेड’ आयुष्यातून बाहेर काढून त्यांना घडवायचा ध्यासच होता. नागपूरपासून २५ किलोमीटर अंतरावर मोहगाव झिल्पी हे ठिकाण त्यांना सापडले. २००५-०६ हे वर्ष खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या ठिकाणी ज्येष्ठांचे निवासस्थान आहे आणि मुलांची येथे रेलचेल असल्याने त्यांना मिळणारा आनंद वेगळाच होता. या ठिकाणी चांगला तलाव असल्याने ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरू केले. त्यानंतर रामटेक परिसरात संधी चालून आली. कर्पूरबावडीचा हा परिसर म्हणजे निसर्गदत्त देणगी! आमदार विकास निधी आणि आमदार आशीष जयस्वाल यांची मिळालेली साथ यातून या परिसरात साहसी क्रीडा उपक्रम उभारण्याची संधी मिळाली. खिंडसी तलाव आणि गडमंदिरापर्यंतचा हा परिसर ‘अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज’ म्हणून ओळखला जाऊ लागला. २०१० चा तो काळ होता. मुरूम काढल्यानंतर खराब झालेल्या जमिनीवर ‘कॅम्प चेरी फार्म’ सुरू झाला. या ठिकाणी सिंगापूर चेरीची रोपटी लावली. तलावाला लागून एक मोठी जागा होती, तिथे ट्रेकिंग सुरू झाले. अनेक स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येऊ लागले. नागपूर आणि परिसरातील लोकांचे लक्ष या उपक्रमाने वेधून घ्यायला सुरुवात झाली. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, एटीव्ही मोटरबाइक यांची नावेही कधी मध्य भारतातील लोकांनी ऐकलेली नव्हती. त्याची ओळख सीएसी ऑलराउंडरने करून दिली. हे सर्व उपक्र म इतक्या सहजासहजी शक्य नव्हते. त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक होती. कारण सुरक्षेला पाहिले प्राधान्य होते. त्यासाठी चमू प्रशिक्षित असणे आवश्यक होते. या साहसी क्रीडा प्रकारासाठी लागणारे साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवे होते. अर्थात यासाठी लागणार होते मोठे आर्थिक पाठबळ. एकुणात साहसी उपक्रम हा छंद राहिलेला नव्हता, तर त्याची जागा व्यवसायाने घेतली होती. खंते सांगतात, संकटकाळात मित्र मदतीला धावून आले. आईने थोडी मदत केली आणि बायकोने आजवर केलेली बचत या व्यवसायात लावली. चालला तर ठीक, पण नाही चालला तर हे सगळं गंगेला मिळणार होते. मात्र, सुरक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन आलेल्या प्रशिक्षकांच्या बळावर पर्यटकांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पुरेपूर पालन होत होते. अनेक शाळांनी ‘ओव्हरनाईट’ शिबीर के लेले नव्हते, पण त्यांना येथे ते सुरक्षित कवच मिळाले आणि सीएसी ऑलराउंडरच्या ओव्हरनाईट शिबिरात ते सहभागी होत गेले. खंते सांगतात, ‘सैन्य दलासाठी आम्ही पॅरासीलिंगचा अभ्यासक्र म सुरू के ला. हवाई दलाकरितादेखील प्रशिक्षण सुरू के ले. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सीएसी ऑलराउंडरमध्ये सैन्य दल आणि हवाई दलाचे अधिकारी, कर्मचारी येथून पॅरासीलिंग आणि इतर साहसी उपक्र मांचे प्रशिक्षण घेत आहेत. एनएडीटी या आयकर संस्थेशी आम्ही जुळलेले आहोत.  मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, नेपाळपर्यंत जाऊन पोहोचलो. मध्य प्रदेशसाठी आम्ही अधिकृ त साहसी पर्यटन उपक्र मांचे भागीदार आहोत. हिमाचलचे पर्यटन हिवाळ्यात बंद राहते. अशा वेळी तेथील प्रशिक्षक मध्य भारतात येऊन काम करतात. उन्हाळ्यात मध्य भारतातील आमचे प्रशिक्षक हिमाचलला जाऊन काम करतात.’

मनाली येथेही सीएसीने एक मोठे ‘अ‍ॅपल फार्म’ घेतले आहे. ‘वन ऑफ द बेस्ट कॅ म्पिंग साईट’ अशी तिची ओळख तयार झाली आहे. या ठिकाणी दरवर्षी अडीच ते तीन हजार पर्यटकांची नोंदणी होते. तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कंपनीकडे असणारे प्रशिक्षक हे काही शहरी पार्श्वभूमी असणारे नाहीत, पण त्यांचा आत्मविश्वास आता प्रचंड वाढलेला आहे. नेपाळ, दार्जिलिंगपर्यंतचा ते प्रवास करतात. विविध ठिकाणी ‘कॅ म्पिंग साइट’ उभारल्या गेल्या आहेत. ‘आतापर्यंत भारतातल्या पर्यटकांची साहसी उपक्र मासाठी आम्ही पसंती होतो, पण आता विदेशातील पर्यटक आमच्याकडे येत आहेत. हीच आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे,’ असे ते आवर्जून सांगतात. अनेक रिसॉर्टवाल्यांना साहसी सेटअप तयार करून देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक शिबीरस्थळावर शेती प्रशिक्षणदेखील सुरू के ले आहे. यामागील उद्देश एकच आणि तो म्हणजे शिबिरात येणाऱ्या मुलांना त्यांच्या स्वयंपाकघरात तयार होणारे अन्न कु ठून मिळते हे माहिती व्हायला हवे. गाई-म्हशींपासून मिळणारे दूध आणि त्यापासून मिळणारे पदार्थ येथे तयार होतात. त्यातूनही अनेकांना रोजगार मिळाला आहे. विशेषकरून गावातील महिलांना.

सुरुवातीच्या कठीण काळात गजानन रिंढे, अजय गायकवाड, मनीष मख, प्रणव बांडबुचे यासारख्या सहकाऱ्यांनी दिलेली साथ आजही कायम आहे. सुमारे ५२ प्रशिक्षकांचे कु टुंब या व्यवसायाच्या बळावर चालत आहे. अप्रत्यक्षपणे सुमारे १०० कु टुंबांच्या उदरनिर्वाहाला आमचा हातभार लागतो, असे खंते अभिमानाने सांगतात. खंते यांचा साहसी क्रीडा व्यवसाय दिवसेंदिवस झेप घेत असतानाच त्यांची शैक्षणिक झेपदेखील तेवढीच वाढत आहे. बीपीएड, एमपीएड कायद्याची पदवी संपादनके ल्यानंतर आता मानसशास्त्र विषयात त्यांचे संशोधन सुरू आहे.

वार्षिक उलाढाल दहा कोटींवर

अर्थातच सगळा खेळ पैशांवर अवलंबून आहे आणि आमच्या प्रामाणिकतेच्या बळावर आम्ही बँकांचाही विश्वास संपादन के ला आहे. मित्र, कु टुंबीय, बँकांनी दिलेले कर्ज या बळावर साहसी क्रीडा व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे अमोल खंते सांगतात. अवघ्या काही हजारांपासून सुरू झालेल्या या स्वप्नाची वार्षिक उलाढाल गेल्या तीन वर्षांत दहा कोटींवर जाऊन पोहोचली आहे.

अमोल खंते

सीएसी ऑलराउंडर

’ व्यवसाय – साहसी                 क्रीडा उपक्रम

’ कार्यान्वयन : सन २००१

’ मूळ गुंतवणूक  :  साधारण एक लाख रुपये

’ सध्याची उलाढाल : सुमारे १० कोटी रुपये

’ डिजिटल अस्तित्व : http://www.cacallrounder.com