मागील एका महिन्याच्या कालावधीत अर्थसंकल्पाच्या दोन संभाव्य लाभार्थ्यांची शिफारस या सदरातून करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्प साधार झाला. या संभाव्य लाभार्थ्यांपकी पहिला एलआयसी नोमुरा बँकिंग सेक्टर फंड हा होता. बँकांच्या पुन्हा भांडवलासाठी २५ हजार कोटींची अल्प तरतूद होऊनसुद्धा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वाधिक कामगिरी करणारा बँकिंग निर्देशांक होता. दुसरा संभाव्य लाभार्थी म्हणून कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड होता. अर्थसंकल्पात सामान्यत: पायाभूत सुविधांसाठी व विशेषत: रस्ते विकासाठी भरघोस तरतूद केल्यामुळे ही शिफारस चुकीची नव्हती. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिफारसीसाठी सुंदरम रुरल इंडिया फंड या फंडाची निवड केली आहे.
दोन वष्रे सतत दुष्काळाला सामोरे गेल्यामुळे खंगलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने मोठी तरतूद ग्रामीण विकासाठी केली आहे. सुंदरम रुरल इंडिया फंड हा फंड ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित उद्योगातून गुंतवणूक करणारा फंड आहे. मागील एका वर्षांपासून केंद्र सरकारचे कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय दरमहा महागाईचा दर ग्रामीण व शहरी असा दोन प्रकारांत जाहीर करते. याचा अर्थ ग्रामीण व नागरी अर्थव्यवस्था हे वेगवेळ्या असून त्यांच्या वाढीचा दर हा शहरी अर्थव्यवस्थेहून कमी-अधिक असतो. अर्थसंकल्पाआधी सादर झालेला आíथक पाहणी अहवालात २०१७-२०२२ या कालावधीत ग्रामीण अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा ४-५ टक्क्य़ांनी अधिक वाढण्याची आशा व्यक्त केली होती. या व्यक्त केलेल्या मताशी साधम्र्य असणारी धोरणे अर्थसंकल्पात आखली गेल्याने सुदृढ होऊ घातलेल्या अर्थव्यवस्थेचा लाभार्थी म्हणून सुंदरम रुरल इंडिया फंडाकडे पहावे लागेल.
क्रिसिलने या फंडासाठी ‘क्रिसिल रॅकिंग-२’ निर्धारित केले असून ‘मॉìनगस्टार’ने या फंडास त्रितारांकित (थ्री स्टार) दर्जा दिला आहे. एस. कृष्णकुमार व अविनाश अग्रवाल हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या तीन वर्षांच्या चलत सरासरी परताव्याची बीएसई एस अ‍ॅण्ड पी १०० च्या वर्षांच्या चलत सरासरी परताव्याची तुलना केली असता हा फंड मागील सात वष्रे निर्देशांकापेक्षा ३.६ टक्के ते ८.२२ टक्के सरस कामगिरी करणारा फंड ठरला आहे. सातत्याने फंडाची संदर्भ निर्देशांकापेक्षा अव्वल कामगिरी असणे हे या फंडाच्या बाबतीत विशेष होय.
केंद्र सरकारचे धोरण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन ग्रामीण जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचे आहे. ग्रामीण जनतेचे दरडोई उत्पन्न वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेची क्रयशक्ती वाढेल. या वाढलेल्या क्रयशक्तीचा फायदा केवळ ग्राहक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनाच होणार नसून ग्रामीण भागात नवीन घरांची निर्मिती, ही घरे बांधण्यासाठी बँकेचे कर्ज, नवीन वाहन खरेदी, शेतीला ठिबक सिंचन या सारख्या रोजच्या जगण्यातील वस्तूंची खरेदी झाल्याचा फायदा कंपन्यांना मिळेल. फंडांच्या गुंतवणुकीचा ढाचा हा आíथक आवर्तानांशी निगडित उद्योग क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित आहे. ३१ जानेवारी २०१६ च्या गुंतवणूक विवरणानुसार सर्वाधिक २६.८१% गुंतवणूक बँका व गर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागात फंडाने केली आहे. त्या खालोखाल गुंतवणूक केलेल्या उद्योग क्षेत्रांचा माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, तेल व नसíगक वायू व रसायने असा क्रम लागतो. फंडाने सर्वाधिक गुंतवणूक ७.६९% एचडीएफसी बँकेच्या समभागात केली आहे.
साधारणपणे थीमँटिक फंड हे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा अधिक जोखीम असलेले फंड समजले जातात. कारण ते एखाद्या विशिष्ट उद्योगातील कंपन्यात गुंतवणूक करतात. परंतु ‘रुलर इंडिया’ ही थीम घेऊन गुंतवणूक केलेला हा फंड एखाद्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा अधिक परतावा देणारा व कमी जोखीम असलेला फंड आहे. कारण या फंडाच्या एनएव्हीत होणारे चढ-उतार (सरासरी वध-घटीचे प्रमाण) हे एखाद्या हे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा कमी आहेत.
रुरल इंडिया हा विषय ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ चा अविभाज्य घटक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून सर्वाधिक वाढ अनुभवत असणारा घटक आहे. तीन ते पाच वर्षांचा विचार करून या फंडात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदरांना मोठय़ा दोन आकडय़ातील परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवता येईल.

सुंदरम रुरल इंडिया फंड
आगामी पाच वर्षांत (२०१७-२०२२) ग्रामीण अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा ४-५ टक्क्य़ांनी अधिक वाढण्याची आशा यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालाने व्यक्त केली. अहवालाच्या या मताशी साधम्र्य असणारी धोरणे अर्थसंकल्पातूनही आखली गेल्याने सुदृढ होऊ घातलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा लाभार्थी म्हणून सुंदरम रुरल इंडिया फंडाकडे पाहावे लागेल..

 

3

4

8

 

shreeyachebaba@gmail.com
वसंत माधव कुलकर्णी