|| आशीष ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होतं – ‘येणाऱ्या दिवसात गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० या स्तरावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. हा स्तर राखण्यास निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे ५३,००० आणि निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १६,००० असे असेल.’

हे वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, सरलेल्या सप्ताहात निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० चा स्तर राखत निर्देशांकांनी आपला साप्ताहिक बंद सेन्सेक्सवर ५२,९७५ आणि निफ्टीवर १५,८५० वर देत या वाक्याची प्रचीती दिली. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५२,९७५.८०

निफ्टी : १५,८५६.०५

सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकांनी मंगळवार, २० जुलैचा अपवाद वगळता (निफ्टी निर्देशांकांचा नीचांक १५,५७८) निफ्टी निर्देशांक सातत्याने १५,७०० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरला आहे.

त्यामुळे भविष्यात सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टीवर १५,७०० या स्तराला अनन्यसाधारण महत्त्व असेल. गेल्या लेखात सूतोवाच केलेले हे वाक्य, काळाच्या कसोटीवर उतरले. आता भविष्यातील निर्देशांकाच्या वाटचालीच्या आलेखनासाठी निफ्टी निर्देशांकावर १५,७०० हा केंद्रबिंदू स्तर मानत व त्यात ३०० अंशांच्या तेजी-अथवा मंदीचा चढ-उतार गृहीत धरल्यास…

तेजीचे भविष्यकालीन आलेखन : १५,७००+ ३०० = १६,०००, १६,००० + ३०० = १६,३००, १६,३०० + ३०० = १६,६०० मंदीचे आलेखन : १५,७०० – ३०० = १५,४००, १५,४०० – ३०० = १५,१००

आता निर्देशांक म्हणजेच, सेन्सेक्स ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांक १५,७०० चा स्तर राखत असल्याने निर्देशांकांचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५३,५०० आणि निफ्टीवर १६,००० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) डीएलएफ लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल  – सोमवार, २६ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – ३३३.९५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – ३१७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३१७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३५५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३१७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २८० रुपयांपर्यंत घसरण.

२) कोटक महिंद्र बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल  – सोमवार, २६ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – १,७२३.१० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर     – १,७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६५० रुपयांपर्यंत घसरण.

३) एसबीआय लाइफ इन्शुरन्स

तिमाही वित्तीय निकाल  – सोमवार, २६ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – १,०५०.५५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर      – १,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२०० रुपये

ब) निराशादायक निकाल : १,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९०० रुपयांपर्यंत घसरण.

४) वेदान्त लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल  – सोमवार, २६ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – २६७.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – २६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३३० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २४० रुपयांपर्यंत घसरण

५) मारुती सुझुकी इंडिया लि.

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २८ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – ७,२९०.२० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,१०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६,८०० रुपयांपर्यंत घसरण

यूटीआय एएमसी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल  – बुधवार, २८ जुलै

२३ जुलैचा बंद भाव – ९१७.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – ९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,००० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१०० रुपये

ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८२० रुपयांपर्यंत घसरण  लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.