अजय वाळिंबे

अनिश्चित बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय निवडणे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसे कठीण असले तरीही दीर्घकालीन गुंतवणूक करणे तसे सोपे आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत काही उत्तम कंपन्यातील गुंतवणूक कायम फायद्याची ठरू शकते. आज सुचविलेली सुप्रीम पेट्रोकेम ही अशीच एक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे.

land, industrial development, Kolhapur,
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

सुप्रीम इंडस्ट्रीज आणि राजन रहेजा समूह यांच्या संयुक्त भागीदारीतील ही कंपनी प्रामुख्याने स्टायरेनिक्सच्या व्यवसायात आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनात पॉलिस्टीरिन (पीएस), एक्स्पांडेबल पॉलिस्टीरिन (ईपीएस), मास्टरबॅच आणि इतर पॉलिमरच्या संयुगाचा समावेश होतो. याखेरीज कंपनीच्या नावीन्यपूर्ण उत्पादनांत एक्स्टड्रेड पॉलिस्टीरिन इन्सुलेशन बोर्ड (एक्सपीएस) आणि स्टायरिन मेथिल मेथाक्रिलेट (एसएमएमए) यांचाही उल्लेख करावा लागेल. कंपनीचे दोन अद्ययावत उत्पादन प्रकल्प असून ते महाराष्ट्रातील रोहा आणि तमिळनाडूतील मनाली न्यू टाऊन येथे आहेत. या दोन्ही उत्पादन प्रकल्पासाठी कंपनीने एसएच एनर्जी अ‍ॅण्ड केमिकल या कोरियन कंपनीचे तांत्रिक साहाय्य घेतलेले आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनी स्टायरेनिक्सच्या व्यवसायात भारतातील एक अग्रगण्य कंपनी असून जगभरातील १००हून देशांत आपली उत्पादने निर्यात करते.

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने उत्तम निकाल जाहीर केले असून, उलाढालीत १७.१ टक्के वाढ दाखवून ती ३,१७८.४९ कोटी रुपयांवर नेली आहे. तर नक्त नफ्यात ३६५.२ टक्के वाढून तो ४७७.४९ कोटींवर गेला आहे. उत्तम प्रवर्तक, विस्तृत उत्पादन श्रेणी आणि वायुगळतीमुळे बंद पडलेली स्पर्धक कंपनी एल जी पॉलीमर्स यामुळे आगामी काळात कंपनीचे भविष्य उज्ज्वल वाटते. आपल्या उत्पादनाच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी स्टायरेनिक्सची उत्पादन क्षमता ८०,००० मेट्रिक टनाने तर एक्स्पांडेबल पॉलिस्टीरिन (ईपीएस)ची उत्पादन क्षमता ३०,००० मेट्रिक टनाने वाढवत आहे.

पोर्टफोलियोसाठी एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेल्या आणि उज्ज्वल भवितव्य असलेल्या रसायन आणि पॉलिमर क्षेत्रातील सुप्रीम पेट्रोकेम्समधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

सुप्रीम पेट्रोकेम लि.

(बीएसई कोड – ५००४०५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ७१०.८०

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ८२०/१७५

बाजार भांडवल :

रु. ६,७०५ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ९४.०२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ६३.९६

परदेशी गुंतवणूकदार      १.२४

बँक/ म्यु. फंड/ सरकार   २.१०

इतर/ जनता     ३२.७०

संक्षिप्त विवरण

*  शेअर गट   : मिड-कॅप

*  प्रवर्तक      : सुप्रीम इंडस्ट्रीज

*  व्यवसाय क्षेत्र : स्टायरेनिक्स

*  पुस्तकी मूल्य       : रु. ११३.३

*  दर्शनी मूल्य : रु. १०/-

*  लाभांश     : १५०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ५०.७

*  पी/ई गुणोत्तर :      १४.६

*  समग्र पी/ई गुणोत्तर : ९.७३

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०४

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ८९.४

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :       ७१.९

*  बीटा :      ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.