‘बीपीएल’ ग्राहकांपासून ते लक्ष्मीपुत्रांच्या स्वच्छतेच्या गरजांची पूर्ती करणारी ही कंपनी. आपल्या व्यवसायात ‘ट्रेन्ड सेटर’ ठरलेल्या या कंपनीने केलेले बदल जाणून घेण्यासाठी गुंतवणूकदार, ग्राहक, स्पर्धक  अशा साऱ्यांचेच लक्ष लागलेले असते.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते
म्हणुनी जनी मागित जन्म घेते ।।१६।।
– मनाचे श्लोक
साधारणत: महिन्यापूर्वी बर्नान्केंच्या वक्तव्यानंतर मंदीचा माहोल उठला असताना तथाकथित बाजार पंडित हे रुपयाचा डॉलरशी विनिमय दर साठीच्या खाली गेल्यामुळे निफ्टीच्या ‘पाच हजाराचे’ भाकीत दूरचित्रवाणीवरून सांगत होते. त्यावेळी या स्तंभातून ‘साठीतला रुपया’ या लेखाने वाचकांना दिलासा देण्याचा व त्याच वेळी बर्नान्केंच्या भाषणाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात बर्नान्के रोख्यांची प्रोत्साहनपर खरेदी थांबविणार असल्याचे कोठेही नमूद केलेले नाही व माध्यमांचा हा विपर्यास होता हे ठासून सांगितले होते. मागील आठवडय़ातील वाढीला बर्नान्केंचे प्रोत्साहनपर खरेदी चालू राहणार असल्याचे ताजे वक्तव्य कारण ठरले. बाजारात मंदी आली म्हणून दु:ख करण्यापेक्षा पडेल त्या किमतीत खरेदी करावी असा विचार त्या लेखातून व्यक्त केला होता.
आप्तांच्या मृत्यूने दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु त्यातून बाहेर पडून जगरहाटीला सामोरे जायचे असते हाच आशय वरील श्लोकात व्यक्त केला आहे. आजपासून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रारंभ होतो आहे. म्हणूनच आजची सुरवात ‘गुरुवाल्मिकी सारखा मान्य ऐसा’ असे वर्णन केलेल्या समर्थाच्या मनाच्या श्लोकाने केली आहे.
*  सेरा सॅनिटरीवेअर
सेरा सॅनिटरीवेअर ही गृह सजावटीत िभतीवरच्या व जमिनीवरील टाईल्स, स्नानगृहात वापरावयाची पूरक उत्पादने या व्यतिरिक्त आलिशान स्नानगृहात आंघोळीसाठी वापरावयाच्या संकल्पना आधारित उत्पादनांची (शॉवर टेम्पल) विक्री व उत्पादन करते. गेल्या गुरुवारी जाहीर झालेल्या तिमाही वित्तीय निकालांनुसार विक्रीत ४०% तर निव्वळ नफ्यात २१% वाढ दर्शविली आहे. या व्यवसायातील सर्वात वेगाने विक्री व नफा वाढणारी ही कंपनी आहे. िहदुस्थान सॅनिटरीवेअर (बाजार हिस्सा ४०%) व पॅरीवेअर (बाजार हिस्सा २८%) या दोन कंपन्या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या असल्या तरी अनेक गोष्टी पहिल्यांदा करण्याचा मान या कंपनीकडे जातो. उत्पादने भाजण्यासाठी भट्टीत नसíगक वायूचा इंधन म्हणून वापर करणे, पाण्याची बचत करणारे (पाण्याच्या गरजेप्रमाणे कमी अधिक वापर करणारे) फ्लशटँक एकाच साच्यात तयार केलेले पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय, एकच पाईप असलेले पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय अशा एक ना अनेक गोष्टी या कंपनीने केल्यामुळे ही कंपनी या व्यवसायात ‘ट्रेन्ड सेटर’ असल्याचे मानली जाते. गुंतवणूकदार, ग्राहक, स्पर्धक  अशा साऱ्यांचेच लक्ष या कंपनीकडे नवीन उत्पादने, दर्जा टिकविण्यासाठी किंवा किफायतशीर बचत करण्यासाठी केलेले बदल जाणून घेण्यासाठी लागलेले असते. उत्पादन क्षमतेवर आधारित ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असून भारतातील बाजारपेठेतील तिचा हिस्सा २२% हिस्सा या कंपनीने व्यापला आहे. एकूण विक्रीच्या वजनाच्या आधारे ५५% उत्पादने स्वत:ची क्षमता वापरून तर उर्वरित ४५% उत्पादने कंत्राटी पद्धतीवर दुसऱ्या उत्पादकांकडून तयार करून घेते. यातील ३५% उत्पादने चीन व ओमानमधील उत्पादकांकडून आयात होतात. यामध्ये १००% टाईल्स कंत्राटी तत्त्वावर बाहेरून तयार करून घेतात. कंपनीने नुकतेच पीव्हीसी वस्तू निर्मितीत पदार्पण केले असून यात पाश्चिमात्य शौचालयावर वापरावयाची बठक, सांडपाणी वहन पाईप, नळाचे अदर्शनी भाग, फ्लशटँक आदी उत्पादने ग्राहकांना विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत.
सेरा सॅनिटरीवेअरची मूल्यवíधत उत्पादन शृंखला एक कळ असलेले फिटींग :    
कंपनीने नुकताच उत्पादन क्षमतेचा विस्तार पूर्ण केला आहे. वार्षकि क्षमता २० लक्ष नगांवरून २७ लक्ष नगांवर नेली आहे. हा विस्तार पूर्ण झाल्यामुळे वर उल्लेखलेली विक्रीतील व नफ्यातील वाढ पहिल्या तिमाहीत दिसली. पूर्ण आर्थिक वर्षांचे परिणाम येत्या निकालात दिसून येतील. या विस्तारीकरणासाठी ३३% रक्कम गंगाजळीतून तर बाकीची रक्कम कर्ज उभारून खर्च करण्यात आली. त्यामुळे विस्तार योजना पूर्ण झाल्यानंतर भांडवली रचनेत कर्जाचे प्रमाण २३% इतकेच आहे. या व्यवसायात वाढते नागरीकरण, बदलती जीवनशैली, घरांची वाढती मागणी यामुळे संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ – साधारण २००० पूर्वीच्या दोन शयनकक्ष असलेल्या एका घरात एक न्हाणीघर व एक शौचालय असे. यानंतर ‘मास्टर बेडरूम’ ही संकल्पना अस्तित्वात येऊन दोन न्हाणीघर आणि त्यालाच जोडून दोन शौचालय असलेली घरे बांधली जाऊ लागली. त्यामुळे मागणीत वाढ झाली. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या २०११ च्या जनगणना अहवालानुसार एकूण जनसंख्येच्या केवळ ४७% नागरिकांच्या मलमूत्र विसर्जन करण्याच्या प्राथमिक गरजांची पूर्ती होते. अगदी मुंबईसारख्या शहरातील सार्वजनिक मलमूत्र विसर्जन व्यवस्था बिलकुल समाधानकारक नाही. चार महानगरात १९% तर पहिल्या १० शहरात केवळ १२% जनतेला मलमूत्र विसर्जन करण्याची सुविधा आहे. मुंबईसारख्या शहरात ‘फ्रॠँ३ ळ ढ ऋ१ हेील्ल’ सारख्या चळवळी गेल्या महिन्यात उभ्या राहतात हे शहरातील मलमूत्र विसर्जन व्यवस्था किती दयनीय आहे, याची कल्पना येते. रस्त्यावरच नव्हे तर रेल्वेच्या हद्दीत चर्चगेट व सीएसटी सोडल्यास अनेक रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक मलमूत्र विसर्जन समाधानकारक नाही अनेक प्रवासी केवळ पर्याय नाही म्हणून या व्यवस्थेचा वापर करताना दिसतात. ग्रामीण विकास मंत्रालयाची हागणदारीमुक्त गाव अशी योजना आहे. या योजनेची अभिनेत्री विद्या बालन ही सदिच्छा दूत असून ही योजना घेऊन ती लोकांपर्यंत जात असताना प्रसारमाध्यमातून दिसते. ज्या घरात उघडय़ावर मलमूत्र विसर्जनाला जावे लागते त्या घरात विवाहास मुलींनी नकार द्यावा अशा आशयाच्या या जाहिराती आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या ‘निर्मल ग्राम योजने’ अंतर्गत घराबरोबर शौचालय बांधण्यासाठी अनुदाने व मालमत्ता करात काही कालावधीसाठी सूट दिली जाते. २०१५ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
वाढत्या शैक्षणिक पात्रतेमुळे आरोग्यविषयक हक्काची जाणीव वाढल्यामुळे एकूण जनतेचा दृष्टीकोन बदलत आहे. या व अशा अनेक योजनांमुळे व मध्यमवर्गाच्या वाढत्या उत्पन्नामुळे व्यवसाय विस्ताराच्या संधी या कंपनीला उपलब्ध झाल्या आहेत. त्या संधींची पूर्तता करण्यासाठी कंपनीच्या उत्पादन मालिकेत रु. १,८०० प्रती नग पासून रु. १,२२,००० प्रती नगपर्यंत ग्राहकांच्या विविध गटांची उत्पादने उपलब्ध आहेत. थोडक्यात ‘बीपीएल’ ग्राहकांपासून ते लक्ष्मीपुत्रांच्या स्वच्छतेच्या गरजांची पूर्ती करणारी ही कंपनी आहे.

दृष्टीक्षेपात सेरा सॅनिटरीवेअर
ताजा भाव (१२ जुलै २०१३)    ५०३.७०        
दर्शनी मूल्य     १०/-        
एका वर्षांतील उच्चांक    १५८०.४०
एका वर्षांतील नीचांक     १११८.००
भरणा झालेले भागभांडवल    ६ कोटी *
एकूण कर्ज    ५५ कोटी *
*३१ मार्च २०१३ अखेर स्थिती