विमा इच्छुकांमध्ये मोठया प्रमाणात जागृती झाल्याने आता त्यांना कमी पशांमध्ये जास्त विमाछत्र देणाऱ्या प्युअर टर्म पॉलिसींमध्ये रस वाटू लागला आहे. परंतु त्याचबरोबर पॉलिसीची पूर्ण टर्म मी तरून जाणार आहे याबद्दलही त्यांना खात्री असते. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीमध्ये असतात. या मानसिकतेचा फायदा घेऊन विमा कंपन्या ‘जरा हटके’ अशा वेगळया प्रकारच्या प्युअर टर्म पॉलिसी बाजारात आणतात. ‘टाटा एआयए आयरक्षा ट्रॉप’ ही अशाच प्रकारातील, धड प्युअर टर्मही नाही आणि पूर्णपणे एन्डोमेंटही नाही अशी पॉलिसी.
वरकरणी विचार केला तर (आणि विमा इच्छुकाला खोलात जाऊन विचार करायला वेळ (?) नसतो) ही पॉलिसी विमाइच्छुकाला दोन गोष्टी साध्य करण्यास मदत करते. माफक रकमेमध्ये त्याला मोठया प्रमाणात विमाछत्र मिळते. त्यामुळे तो ‘आपल्या पश्चात कुटुंबाचे काय?’ या विवंचनेतून मुक्त होतो आणि आपण पॉलिसीची टर्म तरुन जाणारच या खात्रीलायक संभावनेमध्ये किमान प्रिमियमचे पसे तरी परत मिळावे ही त्याची सुप्त इच्छाही पुरी होते.
ही पॉलिसी विमाइच्छुकाला दोन गोष्टी साध्य करण्यास मदत करते. माफक रकमेमध्ये त्याला मोठया प्रमाणात विमाछत्र मिळते. त्यामुळे तो ‘आपल्या पश्चात कुटुंबाचे काय?’ या विवंचनेतून मुक्त होतो आणि आपण पॉलिसीची टर्म तरुन जाणारच या खात्रीलायक संभावनेमध्ये किमान प्रिमियमचे पसे तरी परत मिळावे ही त्याची सुप्त इच्छाही पुरी होते.

या पॉलिसीमधील आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे पाच किंवा १० वष्रे प्रिमियमचा भरणा करून मोठय़ा कालावधीसाठी विमाछत्र घेता येते. तरुण विमाइच्छुकांसाठी ही एक जमेची बाजू आहे. तरुण वयात कमी जबाबदाऱ्या असताना प्रिमियम भरायचे आणि नंतर मुले मोठी झाल्यावर आíथक जबाबदाऱ्या वाढल्या की प्रिमियमची रक्कम इतर खर्चासाठी वापरून विमाछत्र मात्र कायम ठेवायचे.
आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आíथक तरतुदींबाबत जागृत असणाऱ्या कुटुंबवत्सल अशा अमितला ही पॉलिसी एकदम पसंत पडली.
पॉलिसीचा तपशील:
अमितचे वय     : ३३ वष्रे
विमाछत्र     : १.५ कोटी रु.
वार्षकि प्रिमियम     : ७६,०८० रु.
पॉलिसीची टर्म     : ३० वष्रे
प्रिमियम भरायची टर्म : १० वष्रे
पॉलिसीचे लाभ :
ही प्युअर टर्म पॉलिसी असल्याने या ठिकाणी गुंतवणुकीचा संबंध नाही. अमितच्या दृष्टीने एकच लाभ आहे आणि तो म्हणजे पॉलिसीची ३० वर्षांची टर्म पूर्ण झाली की अमितने पहिली १० वष्रे भरलेल्या एकूण प्रिमियमची रक्कम (७,६०,८००/- रुपये) त्याला परत मिळणार.
या पॉलिसीची एक आकर्षक गोष्ट म्हणजे पाच किंवा १० वष्रे प्रिमियमचा भरणा करून मोठय़ा कालावधीसाठी विमाछत्र घेता येते. तरुण विमाइच्छुकांसाठी ही एक जमेची बाजू आहे. तरुण वयात कमी जबाबदाऱ्या असताना प्रिमियम भरायचे आणि नंतर आíथक जबाबदाऱ्या वाढल्या की प्रिमियमची रक्कम इतर खर्चासाठी वापरून विमाछत्र मात्र कायम ठेवायचे.
विश्लेषण:
अमितने पॉलिसीची निवड करताना अपले पसे परत मिळतील हया एकाच दृष्टीकोनातून विचार केला. त्याच्या हे लक्षात आले नाही की ते पसे पहिली १० वष्रे पूर्ण भरणा झाल्यानंतर आणखी २० वर्षांनंतर मिळणार आहेत. त्या २० वर्षांच्या परताव्याचा त्याने विचारच केला नाही. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावयास पाहिजे की प्रत्येक कंपनी ही बाजारात व्यवसाय करण्यासाठी उतरलेली आहे, खिरापत वाटण्यासाठी नव्हे. कंपन्या जेव्हा चार हातांनी पसे घेतात तेव्हा एक किंवा दोन हातांनी परत देतात. अमितने थोडा खोलात जाऊन विचार केला असता तर त्याच पशांमध्ये, तेवढयाच विमाछत्राची पॉलिसी घेऊन त्याला जास्तीची गंगाजळी तयार करता आली असती. आणि हे सर्व करण्यासाठी टाटा एआयएच्या पॉलिसीसाठी पहिली १० वष्रे त्याला स्वतच्या खिशातून जे पसे द्यावे लागतात तितक्याच कालावधीमध्ये.
अमित दरवर्षी प्रिमियमपोटी ७६,०८० रु. खर्च करणार आहे. दहा वर्षांमधील एकूण रक्कम ७,६०,८०० रु. त्याने टाटा एआयएच्या पॉलिसीऐवजी प्रिमियम परत मिळणार नाही अशी ९६% पेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशिओ असलेल्या दुसऱ्या कंपनीची प्युअर टर्म पॉलिसी घेतली असती तर वार्षकि प्रिमियमची रक्कम होते सुमारे २०,००० रु. त्याचे दरवर्षी ५६,०८० रु. वाचले असते. आपण सोयीसाठी ५६,००० रु. गृहित धरू. यापकी ३०,००० रु.त्याने बँकाच्या प्राप्तिकर बचत योजनेमध्ये १० वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतविले असते तर निव्वळ व्याजाचा दर ६.५ टक्के गृहीत धरूनही त्याची गंगाजळी झाली असती ५६,३१४ रुपये.  प्रिमियममधील बचतीच्या ५६,००० मधील उर्वरित २६,००० रु. त्याने दरवर्षी आयकर बचतीच्या दुस-या ठोस पर्यायामध्ये गुंतविले असते तर त्याला निव्वळ ८.७७ टक्के व्याजाचा दर प्राप्त झाला असता. पहिली दहा वष्रे त्याने बचतीच्या रकमेची अशा प्रकारे गुंतवणुक केल्यावर १० वर्षांच्या आयकर बचतीच्या बँक मुदत ठेवी पासून त्याला ११ ते २० वर्षांपर्यंत दरवर्षी ५६,००० रुपयांची प्राप्ती होणार आहे. या रकमेमधून त्याने दरवर्षी अशाच प्रकारची गुंतवणूक केली तर २१ ते ३० वर्षांच्या कालावधीमध्येही त्याला दरवर्षी ५६,००० रुपये प्राप्त होणार आहेत. त्यापकी त्याने २०,००० रु. प्रिमियमपोटी खर्च केल्यावर त्याच्याकडे दरवर्षी ३६,००० रु. बाकी राहाणार आहेत. ते त्याने २१ ते ३० वर्षांच्या कालावधीमध्ये दरवर्षी प्राप्तिकर बचतीच्या दुसऱ्या ठोस पर्यायामध्ये गुंतविले तर ३० वर्षांनंतर त्याची खात्रीलायक आणि करमुक्त अशी गंगाजळी होणार आहे – ३८,०५,९३३ रुपये.
तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर अमित स्वत:च्या खिशातून दरवर्षी ७६,०८०/- रुपये खर्च करणार आहे आणि तेही पहिली दहा वष्रेच. परंतु टाटा एआयए पॉलिसीच्या ३० वर्षांच्या टर्मनंतर कंपनी त्याला ७,६०,८०० रु. परत देणार आहे. पर्यायी प्युअर टर्म पॉलिसी त्याला १.५० कोटी रुपयांचे विमाछत्र देणार आहे आणि बचतीच्या पशांच्या इतर गुंतवणुकीपासून तो ३० वर्षांनतर ३८.०५ लाख रुपये (सुमारे पाच पट) प्राप्त करणार आहे.
अमितला आणखी दोन वर्षांनी आपली चूक ध्यानात आली आणि ती सुधारण्यासाठी त्याने सदर टाटा एआयएची पॉलिसी बंद केली तर त्याचे नुकसान आहे १,५२,१६० रु. (दोन वर्षांचे प्रिमियम) आणि त्याने १.५० कोटी रुपयांच्या विमाछत्राची २५ वर्षांच्या टर्मची वरील पर्यायी पॉलिसी घेतली तर त्याचे वार्षकि प्रिमियम असेल सुमारे २३,००० रु. बचतीच्या रकमेची (सुमारे ५३,००० रु.) त्याने वरील दोन पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर त्याच्या वयाच्या ६०व्या वर्षी  त्याची खात्रीलायक गंगाजळी असेल २५.२० लाख रु. आणि पुढील दोन वष्रे बँक मुदत ठेवीचे प्रतिवर्षी ५६,००० रुपयेही प्राप्त होतील. अशी एकूण २७.३२ लाख रुपयांची रक्कम अमित तयार करू शकेल. थोडक्यात थोडे फार नुकसान भोगूनही तो बरेच काही मिळवू शकेल.
(सदर लेखाचा उद्देश चुकलेल्या विमाधारकांना योग्य मार्ग दाखविण्यापुरता मर्यादित आहे आणि माहिती कंपनीच्या वेबस्थळावरुन घेतली आहे.)