portfolioटाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी असून तिचा देशातील वाणिज्य वाहनातील बाजारहिस्सा ६०% आहे. प्रवासी कारमध्ये उशीरा प्रवेश करूनही १०% बाजारपेठ काबीज करणाऱ्या या कंपनीचा विस्तार आता जगभरात पसरला आहे. बस उत्पादनात जगातील चौथ्या क्रमांकावर तर ट्रक उत्पादनात जगात पाचव्या क्रमांकावर असलेली टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक जुनी आणि नामांकित कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी जग्वार लॅण्ड रोव्हर ताब्यात घेतल्यानंतर टाटा मोटर्स खऱ्या अर्थाने बहुराष्ट्रीय av-04कंपनी झाली. सध्या १८२ देशांत कंपनीची कार्यालये असून भारतातही कंपनी प्रवासी वाहनांमध्ये आघाडी घेण्याच्या प्रयत्नांत आहे. कंपनीचे स्वनिर्मित एस, मॅजिक, क्सेनोन, अल्ट्रा, प्राइमा, िवगर, सिटी राइड, स्टार बस, दिवो, नॅनो, इंडिका, इंडिगो, विस्टा, बोल्ट, झेस्ट, मांझा, सफारी, आरिया वगैरे ब्रॅण्ड्स आहेत. या खेरीज- जग्वार लँड रोव्हर, फ्री लँडर, डिफेंडर, डिस्कव्हरी, रेंज रोव्हर, इवोक इ. जागतिक ब्रॅण्ड्सदेखील कंपनीकडे आहेत. नुकतीच बाजारात आणलेली जेएलआर एक्सई ही बाजाराच्या लक्झरी कार श्रेणीमध्ये कंपनीचा हिस्सा वाढवायला मदत करेल. तसेच डिसेंबर २०१४ मधील वाणिज्य वाहनांच्या विक्रीतील वाढ पाहता येती दोन वष्रे या वाहनांना चांगली मागणी राहील अशी आशा आहे. चीनमधील घसरलेल्या किमतीचा कंपनीला फायदाच होईल. एकंदरीत आता वाहन उद्योगाला पूरक असा काळ दिसू लागला आहे. गेल्या तिमाहीसाठी ६०,५६४ कोटी रूपयांच्या उलाढालीवर कंपनीने ३,२९०.८६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला असून आवाक्यातील इंधनांचे दर आणि नवीन सरकारची उद्योगपूरक धोरणे यामुळे येत्या आणि आगामी आíथक वर्षांसाठी कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे.
टाटा मोटर्स सारखी बलाढय़ कंपनी तुमचा पोर्टफोलियो समृद्ध करेल यात शंकाच नाही.
लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनी कडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.