पगारदार व्यक्ती ज्यावेळी निवृत्त होतात त्यावेळी अनेक कंपन्या त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतात. या पुष्पगुच्छाबरोबर त्यांना प्राप्तीकर कायद्याकडून सुद्धा करमुक्त रक्कमांचा पुष्पगुच्छ मिळण्याची तरतूद आहे. पगारदार व्यक्ती ज्यावेळी निवृत्त होतात त्यावेळी त्यांना जी रक्कम मिळते ती साधारणपणे खालील प्रकारात मिळते:
’ प्रॉव्हिडंट फंड  ’ १/३ कम्युटेड पेन्शन
’ लीव्ह एन्कॅशमेंट  ’  ग्रॅच्युइटी
यापकी प्रॉव्हिडंट फंड आणि १/३ कम्युटेड पेन्शन संपूर्णपणे करमुक्त मिळतात. ग्रॅच्युइटी करमुक्त मिळण्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत ते आजच्या लेखात पाहूया.
इंगजी शब्द कोशानुसार ‘ग्रॅच्युइटी’ या शब्दाचा अर्थ नोकरीतून निवृत्त होताना त्या व्यक्तीला देण्यात येणारी बक्षिसी. एखाद्या व्यक्तीने त्या विशिष्ठ कंपनीला काही वष्रे जी सेवा दिली त्याबद्दल त्या कंपनीने व्यक्त केलेला कृतज्ञताभाव! हा कृतज्ञताभाव करमुक्त मिळण्याबाबत कलम १०(१०) मधे तरतूद आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीच्या वेळी मिळणारी ग्रॅच्युइटी संपूर्णपणे करमुक्त मिळते. या रकमेवर कमाल मर्यादा नाही.
या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकारच्या नोकरदार व्यक्तींना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीवर करसवलत कशी मिळते ते खालील चौकटीतून पाहू.
av-05
प्राप्तीकर नियोजन सल्लागार, मुंबई
dattatrayakale9@yahoo.in