News Flash

डॉक्टर तुम्हीसुद्धा..

डॉक्टरांना सुद्धा प्राप्तिकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. व्यवसाय विनासायास चालवायचा तर त्यांना या तरतुदींची माहिती गरजेचीच आहे.

| December 29, 2014 01:02 am

डॉक्टरांना सुद्धा प्राप्तिकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. व्यवसाय विनासायास चालवायचा तर त्यांना या तरतुदींची माहिती गरजेचीच आहे.
प्रश्न: मी ७२ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आहे. माझे आíथक वर्ष २०१४-१५ सालच्या उत्पन्नामध्ये निवृत्ती वेतन २,३१,६२३ रुपये, कै. पतीचे निवृत्तीवेतन ७८,०५९ रुपये, मुदत ठेवीवरील व्याज ९८,००० रुपये इतके आहे. मी वरील उत्पन्नाशिवाय कुठलीही गुंतवणूक केलेली नाही. या उत्पन्नावर मला किती कर भरावा लागेल? हा कर वाचविण्यासाठी मी किती आणि कशात गुंतवणूक आणि किती दिवसांत करू आणि हे केल्यानंतर मला किती कर भरावा लागेल?
– एक वाचक
उत्तर: वरील माहिती प्रमाणे आपले एकूण करपात्र उत्पन्न हे ४,०७,६८२ रुपये इतके आहे. यावर आपल्याला ९,०३१ रुपये इतका कर भरावा लागेल (यात कलम ८७ अ  नुसार मिळणाऱ्या २,००० रुपयांच्या सवलतीचा आणि शैक्षणिक कराचा समावेश केलेला आहे). आपण ९०,००० रुपयांपर्यंत कलम ८०सी मधील दिलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही. ही गुंतवणूक बँकेत किंवा पोस्टात मुदत ठेव रूपानेही करू शकता. ही गुंतवणूक आपल्याला ३१ मार्च २०१५ पूर्वी केली पाहिजे.

प्रश्न: मी एक राज्य शासकीय कर्मचारी असून माझे वित्तीय वर्ष २०१४-१५ चे वेतन खालील प्रमाणे : बेसिक १,१८,६०० रुपये, महागाई भत्ता १,५४,६८६ रुपये, घर भाडे भत्ता ३०,४४० रुपये, प्रवासी भत्ता ४,६०० रुपये आणि इतर भत्ते ३६,४८० रुपये इतके आहे. मी दरमहा ६,००० रुपये घरभाडे देतो. मला घर भाडे भत्त्याची किती वजावट मिळेल? यासाठी मला काय पुरावा प्राप्तिकर खात्याला सादर करावा लागतो?
– एक वाचक
उत्तर: जर आपण इतर तरतुदींची पूर्तता केली असेल जसे स्वतच्या घरात राहात असाल किंवा घर भाडे दिले नसेल तर या तरतुदीनुसार वजावट मिळू शकत नाही. घर भाडे भत्त्याची वजावट ही खालील प्रमाणे मिळते :
 १. प्रत्यक्ष मिळालेला घरभाडे भत्ता ३०,४४० रुपये
 २. वेतनाच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त भरलेले घरभाडे (भरलेले भाडे ७२,००० रुपये वजा २७,३२९ रुपये*) ४४,६७१ रुपये
* वेतन बेसिक १,१८,६०० रुपये अधिक महागाई भत्ता १,५४,६८६ रुपये एकूण २,७३,२८६च्या १०%
३. वेतनाच्या ४०% १,०९,३१४ रुपये (किंवा वेतनाच्या ५०% १,३६,६४३ रुपये)
या तीन रकमांपकी जी रक्कम कमी असेल ती वजावट मिळेल. म्हणजेच ३०,४४० रुपये इतकी वजावट मिळू शकेल.
या तरतुदीसाठी वेतन म्हणजे बेसिक वेतन, महागाई भत्ता (जर वेतनकरारा प्रमाणे असेल तर) यात इतर भत्त्यांचा समावेश होत नाही. जर का भाड्याने घेतलेले घर महानगरामध्ये (मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई मध्ये) असेल तर वेतनाच्या ५०% आणि जर घर इतर शहरात असेल तर वेतनाच्या ४०% रक्कम या तरतुदीत विचारात घेतल्या जातात. घरभाडे भत्त्याची वजावट घेण्यासाठी घरमालकाने सही केलेल्या घरभाडे पावत्या (ज्यात घराचा पत्ता, घरमालकाचा पत्ता, घर भाडे इत्यादींचा समावेश असेल) आपल्या कार्यालयाला सादर केल्या पाहिजेत. या पावत्या प्राप्तीकर खात्याला विवरणपत्रासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न: मी एक डॉक्टर आहे. माझा एका तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना आहे. मला प्राप्तिकर कायद्यातील कोणत्या तरतुदी लागू होतात या संबंधी माहिती द्यावी?
– एक वाचक
उत्तर: ज्या डॉक्टरांची उलाढाल मागील तीन वर्षांपकी कोणत्याही एका वर्षांत १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे गरजेचे आहे. जर नवीन व्यवसाय असेल तर या वर्षीची उलाढाल वरील रकमेपेक्षा जास्त होणार असेल तर लेखे ठेवणे गरजेचे आहे. या मध्ये कॅश बुक, जर्नल (जर व्यापारी पद्धतीने लेखे असतील तर), लेजर, बिलाच्या किंवा रिसिटच्या कार्बन कॉपी, खर्चाच्या मूळ पावत्या आणि बिले, औषधांच्या मालाचे रजिस्टर यांचा समावेश आहे. या शिवाय फॉर्म 3उ प्रमाणे माहिती ठेवणे गरजेचे आहे. यात दिनांक, अनुक्रमांक, रोग्याचे नाव, रुग्णाला दिलेली सेवा (सल्ला, शस्त्रक्रिया, इंजेक्शन इत्यादी), मिळालेली फी आणि फी मिळाल्याची तारीख ही माहिती ठेवावी लागते. हे लेखे आणि माहिती आपल्याला सहा वर्षांपर्यंत जपून ठेवावी लागते. हे लेखे जर ठेवले नाही तर त्याला २५,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर आपल्या व्यवसायाची वार्षकि उलाढाल २५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर या लेखांचे सनदी लेखाकाराकडून (चार्टर्ड अकाऊंटंट- सीए) परीक्षण करणे बंधनकारक आहे. ज्या डॉक्टरांची वार्षकि उलाढाल ही २५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना त्याच्या पुढील वर्षांमध्ये उद्गम कराच्या (टीडीएस) तरतुदी लागू होतात. उदा. त्यांना १,८०,००० रुपयांच्या वर जर वार्षकि भाडे (दवाखान्याचे) देय असेल तर त्यावर १०% उद्गम कर कापून तो महिना संपल्यानंतर सात दिवसांच्या आत भरावा लागतो. हा उद्गम कर कंत्राटदरांना जर पसे दिले तर १ टक्का किंवा दोन टक्के, व्यासायिक किंवा तांत्रिक व्यक्तींना १०% इत्यादी. या उद्गम कराचे विवरण पत्र (ळऊर फएळवफठ) त्रमासिक भरणे बंधनकारक आहे. जर का उद्गम कर वेळेवर भरला नाही किंवा उद्गम कराचे विवरण पत्र वेळेवर भरले नाही तर व्याज आणि दंड भरावा लागतो. डॉक्टरांना सुद्धा प्राप्तीकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. त्यामुळे त्यांना सुद्धा या तरतुदींची माहिती असणे गरजेचे आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2014 1:02 am

Web Title: tax solution 3
Next Stories
1 समभाग व स्थिर उत्पन्न गुंतवणुका यांचा समतोल आवश्यक!
2 तरुणाईची जिव्हातृप्ती!
3 अर्थवेध २०१५
Just Now!
X