News Flash

कर मात्रा : ग्रॅच्युइटीवरील करसवलती

वित्तीय कंपन्यांमधून नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्ती ज्यावेळी सेवानिवृत्त होतात त्यावेळी त्यांना जी रक्कम मिळते ती सर्वसाधारणपणे खालील प्रकारांमध्ये मिळते. पहिला प्रॉव्हिडंट फंड, १/३ कम्युटेड पेन्शन

| February 25, 2013 01:54 am

वित्तीय कंपन्यांमधून नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्ती ज्यावेळी सेवानिवृत्त होतात त्यावेळी त्यांना जी रक्कम मिळते ती सर्वसाधारणपणे खालील प्रकारांमध्ये मिळते. पहिला प्रॉव्हिडंट फंड, १/३ कम्युटेड पेन्शन दुसरी आणि तिसरी ग्रॅच्युइटी.
यापैकी प्रॉव्हिडंट फंड आणि १/३ कम्युटेड पेन्शन प्राप्तीकर कायद्यामधील तरतुदीनुसार करमुक्त मिळतात. ग्रॅच्युइटीबाबत प्राप्तीकर कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत ते आजच्या लेखात पाहूया.
इंग्रजी शब्दकोशानुसार ‘ग्रॅच्युइटी’ या शब्दाचा अर्थ ‘नोकरीतून निवृत्त होताना त्या व्यक्तीला देण्यात येणारी बक्षिसी.’ एखाद्या व्यक्तीने त्या विशिष्ट कंपनीला काही वर्षे सेवा दिली त्याबद्दल कंपनीने त्याला दिलेली ही ग्रॅच्युइटीची रक्कम म्हणजे एक प्रकारे त्या दीर्घ काळ सेवेबद्दलचा कृतज्ञताभाव असे म्हणता येईल.
हा कृतज्ञताभाव, बक्षिसी किंवा ग्रॅच्युइटी करमुक्त मिळविण्याबाबतच्या तरतुदी प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० (१०) मध्ये नमूद केल्या आहेत.
केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या नोकरदार व्यक्तींना मिळणारी डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युइटीची रक्कम ही निवृत्तीपश्चात संपूर्णपणे करमुक्त मिळते. या मिळणाऱ्या रकमेवर कमाल मर्यादेचे कोणतेही बंधन लागू होत नाही.
या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकारच्या नोकरदार व्यक्तींना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीविषयी कशाप्रकारे करसवलत मिळते ते पाहू.
१) ज्या नोकरदार व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नाहीत आणि ज्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अ‍ॅक्ट १९७२ लागू होतो अशा व्यक्तींना ग्रॅच्युइटी मिळणार असेल तर खालील तीन रकमांपैकी सर्वात कमी रक्कम करमुक्त मिळते.
अ) प्रत्यक्षात मिळालेली ग्रॅच्युइटीची रक्कम किंवा
ब) त्या व्यक्तीने जितकी वर्ष नोकरी केली असेल त्या प्रत्येक वर्षांसाठी १५ दिवसांच्या पगाराच्या रकमेने गुणले असता होणारी रक्कम किंवा
क) रु. १०,००,००० (दहा लाख रुपये)
एक उदाहरण घेऊ :
’  एकूण सेवा केल्याचा कालावधी : ३६ वषे
’  ग्रॅच्युइटीची रक्कम : रु. ११,८०,०००
’  सेवानिवृत्ती वेळचे वेतन : रु. ४९,४००
वरील माहितीच्या आधारे खालील तीन रकमांपैकी कमीत कमी रक्कम करमुक्त ग्रॅच्युइटी म्हणून मिळेल.
अ) प्रत्यक्षात मिळालेली ग्रॅच्युइटी : रु. ११,८०,०००
ब) सेवा केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी १५ दिवसांच्या पगाराची रक्कम =
४९४०० ७ १५
 ७ ३६ : रु. १०,२६,०००
        २७
क) कमाल रक्कम : रु. १०,००,००० वरील तीन पैकी रु. १०,००,००० ही सर्वात कमी रक्कम असल्याने ती करमुक्त मिळेल आणि राहिलेल्या रु. १८०,००० (रु. ११,८०,००० – रु. १०,००,०००) या रकमेवर प्राप्तिकर आकारला जाईल.
टीप १:    १५ दिवसाच्या पगाराची मोजणी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अ‍ॅक्ट १९७२ मधील कलम ४ (२) नुसार करण्याची तरतूद आहे.
टीप २:    २४ मे २०१० नंतर कलम ४ (३) नुसार करमुक्त ग्रॅच्युइटीची कमाल रक्कम रु. १०,००,००० झाली आहे. यापूर्वी ही रक्कम रु. ३५०,००० एवढी होती.

(२) आता ज्या नोकरदार व्यक्ती सरकारी सेवेत नाहीत आणि ज्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अ‍ॅक्ट १९७२ लागू होत नाही अशा व्यक्तींसाठी करमुक्त ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ते पाहू.
अशा व्यक्तीला मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम खालील घटनांमुळे मिळाली असली पाहिजे.
अ) ती व्यक्ती सेवानिवृत्त होताना किंवा
ब) त्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा
क) ती व्यक्ती सेवानिवृत्तीच्या आधी काम करण्यास असमर्थ ठरली असल्यास किंवा
ड) त्या व्यक्तीने राजीनामा दिल्यास अथवा अन्य कारणास्तव तिला निष्कासित केले ग्ी ोल्यास
अशा व्यक्तीला ग्रॅच्युइटी मिळाल्यास खालील तीन रकमांपैकी जी सर्वात कमी आहे ती रक्कम करमुक्त मिळते.
अ) प्रत्यक्षात मिळालेली ग्रॅच्युइटीची रक्कम किंवा
ब) सेवा केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी अध्र्या महिन्याच्या पगाराने गुणले असता होणारी रक्कम किंवा
क) रु. १०,००,०००
टीप:    वरीलपैकी (ब) ची मोजणी करताना मागच्या दहा ै    महिन्यांचा सरासरी पगार लक्षात घेतला जातो.
एक उदाहरण घेऊ.
’ एकूण सेवा केल्याचा कालावधी : ३६ वर्षे
’ ग्रॅच्युइटीची रक्कम : रु. ९००,०००
’ मागील १० महिन्यांचा सरासरी पगार : रु. ४८,०००
वरील माहितीच्या आधारे खालील तीन रकमांपैकी कमीत कमी रक्कम करमुक्त ग्रॅच्युइटी म्हणून मिळेल.
अ) प्रत्यक्षात मिळालेली ग्रॅच्युइटी : रु. ९००,०००
ब) सेवा केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी अध्र्या महिन्याच्या पगाराची रक्कम
४८,०००/२ = २४,००० ७ ३५ = रु. ८४०,०००
क) कमाल ग्रॅच्युइटीची रक्कम : रु. १०,००,०००
वरीलपैकी रु. ८४०,००० ही रक्कम सर्वात कमी असल्याने ती करमुक्त राहील आणि उर्वरित रु. ६०,००० (रु. ९००,००० – रु. ८४०,०००) या रकमेवर प्राप्तिकर आकारण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 1:54 am

Web Title: tax unit tax benefit on gratuity
टॅग : Arthvrutant
Next Stories
1 वित्त- वेध : ‘नो गेन, ओन्ली पेन’?
2 विश्लेषण : साखरेची चव कडूच..
3 गुंतवणूकभान : भारत निर्माण!
Just Now!
X