portfolio4साधारण तीन वर्षांपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबर २०१२ रोजी ९१३ रुपयांना मी हा शेअर याच स्तंभातून सुचवलेला होता. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे शेअरचा भाव तिपटीपेक्षा जास्त झाला आणि कंपनीने १:१ बोनस दिला आणि हल्लीच प्रत्येक १० रुपयांच्या शेअरचे विभाजन पाच रुपयांच्या दोन शेअरमध्ये करण्यात आले. म्हणजेच ज्या गुंतवणुकदारांनी हा शेअर अजूनही ठेवला असेल त्यांना दुपटी पेक्षा जास्त फायदा झालेला आहे तसेच काहींनी २,९०० रुपयांच्या आसपास विकला असेल त्यांनाही फायदा झालाच आहे. मात्र ज्या गुंतवणूकदारांनी ही संधी गमावली होती त्यांना हा शेअर खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी आलेली आहे. खरं तर कंपंनीच्या व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या आíथक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल तितकेसे चांगले नसतील. त्यातून कंपनीचे बहुतांशी ग्राहक युरोपातील असल्याने ग्रीसच्या आíथक संकटाचे विपरीत परिणाम देखील कंपंनीच्या कामगिरीवर परिणाम करतील. गेल्या वर्षी कंपनीने ताब्यात घेतलेल्या एलसीसी आणि सोंफजेन या दोन मोठय़ा परदेशी कंपन्या, नुकतीच केलेली पगारवाढ तसेच एकूणच माहिती तंत्रज्ञान कंपन्यातील मंदीचे वातावरण यामुळे यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीची उलाढाल मर्यादीत राहून त्यामूळे नफ्यातही वाढ अपेक्षित नाही. या सर्व शक्यतांचा परिणाम म्हणून की काय सध्या टेक मिहद्र ४७५ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. परंतु दिवस बदलत असतात आणि वाईट दिवसांनंतर चांगले दिवस येतातच. सूज्ञ गुंतवणूकदार अशाच संधीची वाट पहात असतो. सध्या ही संधी आपसूकच आली आहे. ज्या गुंतवणूकदारांची दोन वष्रे थांबायची तयारी असेल त्यांनी टेक मिहद्र जरूर खरेदी करावा.
av-07
stocksandwealth@gmail.com