आशीष ठाकूर

निसर्गनियमाप्रमाणे सूर्यास्तानंतर चंद्रोदय होतो. परस्परविरोधी भासेल पण, अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असते तेव्हा निर्देशांकावर तेजीचा सूर्य तळपत असतो. पण जेव्हा अर्थव्यवस्थेवर मळभ, साशंकता असते तेव्हा सोन्या-चांदीचे भाव झळाळून उठतात. कधी निर्देशांकावर तेजीचा तळपता सूर्य, तर कधी रात्रीच्या शीतल चांदण्यांची रुपेरी पखरण. मात्र गेल्या तीन महिन्यापासून सोने, चांदी आणि निर्देशांकावर जी एकत्रच तेजी चालू आहे त्याला ‘उन्हातलं चांदणं’ ही उपमाच तंतोतंत लागू पडते. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३८,०४०.५७

 निफ्टी : ११,२१४.०५

सरलेल्या सप्ताहात निर्देशांकाला सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५० चा स्तर पार करण्यास वारंवार अडथळा येत होता. येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,३५०चा स्तर ओलांडून या स्तरावर सातत्याने टिकल्यास सेन्सेक्सच वरचे लक्ष्य हे ३९,५००आणि निफ्टीवर ११,६०० असेल.

भविष्यात निर्देशांक जर सातत्याने सेन्सेक्सवर ३८,६००चा आणि निफ्टीवर ११,३५०चा स्तर पार करण्यास अपयशी ठरत असल्यास, एक घसरण अपेक्षित असून या घसरणीत निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,७०० आणि निफ्टीवर १०,८०० असे असेल. त्यानंतरचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,८५० आणि निफ्टीवर १०,५५० असे असेल.शकतो.

 

आगामी तिमाही निकालांचा वेध..

१) टायटन कंपनी लिमिटेड  (तिमाही निकाल – सोमवार, १० ऑगस्ट  ) 

* ७ ऑगस्टचा बंद भाव –  १,०९०.७० रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१७० रुपये. भविष्यात १,१०० रुपयांचा स्तर  राखल्यास १,२४० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १,१०० ते १,१७० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०३० रुपयांपर्यंत घसरण.

२) टाटा पॉवर कंपनी लिमिटेड  ( तिमाही निकाल – बुधवार, १२ ऑगस्ट )  

*  ७ ऑगस्टचा बंद भाव- ४९.६५ रुपये

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४८ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५३ रुपये. भविष्यात ४८ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५८ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४८ ते ५३ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४८ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४३ रुपयांपर्यंत घसरण.

३) गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड  ( तिमाही निकाल – गुरुवार, १३ ऑगस्ट )

* ७ ऑगस्टचा बंद भाव- ३६६.३० रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३५० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३७५ रुपये. भविष्यात ३५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३५० ते ३७५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३२५ रुपयांपर्यंत घसरण.

४) ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड  (तिमाही निकाल – गुरुवार, १३ ऑगस्ट)

* ७ ऑगस्टचा बंद भाव- ६३६.७० रुपये   ०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६६० रुपये. भविष्यात ६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ६९० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६०० ते ६६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर ६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५७० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com