एआयए इंजिनीअिरगची उत्पादने प्रामुख्याने खाणकाम, सिमेंट आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती या उद्योगांत वापरली जातात. २००३ मध्ये वेगा ही ब्रिटिश कंपनी ताब्यात घेतल्यानंतर गेल्या १० वर्षांत कंपनीने अनेक कंपन्यांचे संपादन आणि विलिनीकरणे केली आहेत. भारताखेरीज कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांत कार्यरत असणाऱ्या या कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. नुकतेच जाहीर झालेले आíथक निष्कर्ष तितकेसे चांगले वाटत नसले तरीही एसीसी, गुजरात अम्बुजा सिमेंट, िहदुस्थान िझक, बाल्को वगैरे दिग्गज ग्राहक असणारी ही कंपनी आगामी काळात नि:संशय चांगली कामगिरी करेल. गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नक्त नफ्यात २३% घट होऊन तो ५२.७१ कोटींवर खालावला आहे. सिमेंट आणि खाण उद्योग हे ‘सायक्लिकल’ प्रकारात मोडणारी उद्योगक्षेत्रे असल्याने त्याचा निकालांवर थोडाफार विपरीत परिणाम अपेक्षित होता. येत्या दोन वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता २ लाख मेट्रिक टनांवरून ४.४० लाख मेट्रिक टनांवर जाईल. कुठलेही कर्ज नसलेली आणि गेल्या आíथक वर्षांत १,७२० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३०६.३६ कोटी नफा कामावणारी ही कंपनी यंदादेखील उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे.