20 September 2020

News Flash

सोनेरी गुंतवणूक… आता नाही तर कधी?

आजच्या स्तरावरून सोन्याचा भाव फार तर २,००० रुपयांनी घसरेल. परंतु तेजी सुरू होईल तेव्हा जुना भाव उच्चांक नक्कीच मोडला जाईल.

| June 16, 2014 01:06 am

आजच्या स्तरावरून सोन्याचा भाव फार तर २,००० रुपयांनी घसरेल. परंतु तेजी सुरू होईल तेव्हा जुना भाव उच्चांक नक्कीच मोडला जाईल. सोन्यातील मंदी फार काळ राहणार नाही आणि मंदी सरून येणारी तेजी सोन्याला पडत्या काळात स्वीकारणाऱ्यांना रग्गड फायदा देणारी असेल.
‘ तेजीमां मंदी करे अने मंदीमां तेजी,’असा वित्त बाजाराचा एक अलिखित नियम आहे. त्याही पुढे जाऊन म्हणता येईल की, तेजीमध्ये निवडक आणि विचारपूर्वक खरेदी करावी आणि मंदीमध्ये बिनधास्त खरेदी करावी. शेअर बाजाराला लागू पडणारा हा नियम, विशेषत: अनेक तज्ज्ञ सोन्यामधील मंदीबाबतचे भाष्य करीत असताना सोन्याच्या खरेदीलाही लागू पडतो. ही गुंतवणूक आज नाही केली तर संधी गमाविण्याची शक्यता जास्त आहे.
पंतप्रधानपदासाठी सप्टेंबर २०१३ मध्ये भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली आणि शेअर बाजाराने १७,९०० वरून २५,००० ची सीमा पार केली. २००९ पासून या बाजाराकडे पाठ फिरविलेले सामान्य गुंतवणूकदारही आता बाजाराकडे आकर्षति होऊ लागले आहेत. ‘अर्थ वृत्तान्त’मधील मागील एका लेखामध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०२५ पर्यंत १,००,००० ची पातळी गाठणार, असे मी म्हटले आहे. तर गेल्या पंधरवडय़ात एका विख्यात आíथक संस्थेने २०२० मध्येच सेन्सेक्स एक लाखाची सीमा पार करेल, असे भाकीत केले आहे. सगळीकडे शेअरमय वातावरण झालेले आहे आणि याच कालावधीमध्ये भारतीय बाजारामध्ये सर्वप्रथम नोंदणी झालेल्या ‘गोल्डबीज’ या गोल्ड ईटीएफ (Exchange Trade Fund) चा भाव ३,००० रुपयांवरून २,४०० रुपयांवर आला आहे. अनेक तज्ज्ञांनी आता सोन्यामधील मंदीबाबतचे भाष्य करायला सुरुवात केली आहे.
वित्त बाजाराचा एक अलिखित नियम आहे -‘ तेजीमां मंदी करे अने मंदीमां तेजी.’ त्याच्याही पुढे जाऊन मी तर म्हणतो की तेजीमध्ये खरेदी करायची असेल तर विचारपूर्वक आणि निवडक खरेदी करावी आणि मंदीमध्ये बिनधास्त खरेदी करावी. आíथक बाजाराचा हा नियम कमोडिटीसाठीही लागू पडतो.
आज अनेक प्रकारच्या अत्याधुनिक साधनांमुळे जग फार जवळ आलेले आहे. देशांतर्गत व्यापारही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जगात कुठेही खुट्ट झाले तर त्याचे पडसाद इतर देशांमध्ये दिसून येतात. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबाबत विचार करताना जागतिक स्तरावरील घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
प्रगत राष्ट्रांची आíथक व्यवस्था सुधारते आहे, असे वाटत असेल तर त्यावर पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. अमेरिकेमध्ये ‘क्वान्टिटेटिव्ह इझिंग’ (क्यूई) या बिनबुडाच्या कार्यक्रमानुसार गेली अनेक वष्रे नोटा छापायचे काम सुरू आहे. आता त्यावर बंधन आले आहे. हे धोरण आणणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, त्या देशाची आíथक परिस्थिती त्यांच्या अपेक्षेनुसार सुधारत आहे. आणि या क्यूई नावाच्या ‘व्हिटॅमिन’ची गरज राहिलेली नाही. परंतु घोषित केलेल्या संबंधित आकडेवारीवर नजर टाकली तर त्यामधील फोलपणा लक्षात येतो. अमेरिकेबरोबर जपानमध्येही गेल्या वर्षांपासून रोकडसुलभतेचे ध्येय ठेवून ‘क्यूई’चा कार्यक्रम सुरू झाला आहे.
युरोपियन युनियनमध्ये तर वेगळाच कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या मध्यवर्ती बँकेने ११ जून २०१४ पासून व्याजाचा दर शून्याहूनही कमी (-०.०१ टक्के) केला आहे.
गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या प्रकारच्या कारवाईमुळे बचतीला आळा बसणार आहे. बचतीचे पसे बँकेत जमा केले तर बँक त्यावर व्याज देण्याऐवजी उलट ठेवीदारालाच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज घेणाऱ्याला फायदा आहे. त्याला अतिशय कमी दराने रक्कम मिळणार आहे. त्यामुळे रोकडसुलभता वाढणार आहे आणि ते पसे वेगवेगळय़ा ‘अ‍ॅसेटस्’मध्ये गेल्यामुळे मालमत्तेचा बुडबुडा (अ२२ी३ इ४ु’ी) तयार व्हायला सुरुवात होणार आहे. काही काळानंतर एका ठरावीक पातळीवर पोहोचल्यावर हा बुडबुडा फुटला की २००८ सारखी आíथक आणीबाणी सुरू होईल. या संकटाची व्याप्ती २००८ पेक्षाही जास्त मोठी असणार आहे. अशा आíथक आणीबाणीमध्ये होणाऱ्या भाववाढीचा सामना करण्यासाठी सर्वात उपयुक्त पर्याय म्हणजे सोन्यामधील गुंतवणूक.
बिकट आíथक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तज्ज्ञांनी योजलेल्या वेगवेगळ्या उपायांमुळे प्रगत देशांमधील जनतेचा कागदी चलनावरील विश्वास ढळत चालला आहे. अमेरिकेमधील एका राज्याने  २०११ मध्ये सोने आणि चांदीच्या नाण्यांचा अधिकृत चलन म्हणून वापरण्याचा कायदा आणला. त्यानंतर अनेक राज्यांनी तशाच प्रकारचा कायदा पारित करण्याची कारवाई सुरू केली आहे. कारण एकच. त्या देशातील जनतेला आता डॉलरपेक्षा सोनेच जास्त सुरक्षित वाटते.
या प्रगत देशांपेक्षा अगदी विरुद्ध प्रकार चीनमध्ये सध्या सुरू आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात सोने उत्पादन करणारा हा देश सोन्याच्या आयातीमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षांपासून सोन्याची किंमत कमी व्हायला लागल्यावर त्या देशातील आयात वाढली आहे. त्यामधील बराच भाग त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होतो. अमेरिकेचे ‘ट्रेझरी बॉण्ड’ घेण्यापेक्षा सोन्याचा साठा करणे त्यांना फायदेशीर वाटते. २००९ च्या आकडेवारीनुसार, त्या बँकेजवळील सोन्याचा साठा आहे १,०५४ टन. परंतु विश्लेषकांच्या अंदाजानुसार, त्यांच्याकडे ३,००० ते ५,००० टन साठा आहे. २०१३ मध्ये जेव्हा अनेक बँकांनी सोन्याची विक्री केली. त्याच वेळी चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. आयातीवरील र्निबधामुळे आपल्या देशातील अधिकृत मागणी कमी झाली. परंतु मोठय़ा प्रमाणातील तस्करीने ती उणीव भरून काढली.
आपल्या देशातील नवीन सरकारच्या प्रगतिशील धोरणामुळे देशाची आíथक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. जनतेच्या हातामध्ये जास्त प्रमाणात पसा खेळणार आहे. त्यामुळे नवश्रीमंतांची संख्या वाढणार आहे. त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा पशाचे प्रदर्शन (show off) करण्यात खर्च होणार आहे. आजही भारतामधील लग्नांमध्ये दागिन्यांसाठी जो खर्च होतो तो जगात इतरत्र कोठेही होत नाही. श्रीमंतांच्या बाबतीत लग्नाच्या बजेटमधील सुमारे अर्धा खर्च दागिन्यांसाठी केला जातो. दागिन्यांच्या व्यवसायामधील ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’चे भारतामधील संचालक बिपिन वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी सुमारे ४०० टन सोन्याचे दागिने भारतात बनविले जातात. नवश्रीमंतांमुळे या आकडेवारीत भर पडणार आहे.
सोन्याची मागणी वाढण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे भारतातील देवस्थानांमध्ये अर्पण केलेले सोने. दक्षिण भारतामधील देवळे, महाराष्ट्रातील शिर्डी संस्थान यांच्याजवळ किती सोने आहे याचा सर्वसामान्यांना अंदाज नसतो. दाखलाच द्यायचा झाला तर मद्रासमधील एनएसी ज्वेलर्सकडे ४,००० हिरे आणि सात किलो सोन्यामध्ये बनविलेला एक मुकुटाचा फोटो ठेवला आहे. किंमत सुमारे ३.८५ कोटी रुपये. एका भाविकाने बनवून घेतलेला हा मुकुट सध्या तिरुचनूर येथील पद्मावती देवीच्या शिरावर आहे.
हे लग्नांमधील आणि देवस्थानामधील सोने शक्यतो ‘लॉकर’मध्येच पडून असते. ते धंदा-व्यवसायांना भांडवल म्हणून उपलब्ध होत नाही. खाणींमधून सोन्याचे उत्पादन दिवसेंदिवस खर्चीक होत चाललेले आहे आणि त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामधील दरी वाढतच जाणार आहे. ‘कमोडिटी मार्केट’मध्ये मागणी आणि पुरवठा ही एकच गोष्ट दरांमधील फेरफारांना कारणीभूत असते. त्यामुळे आज जरी सोन्याचा भाव खाली येताना दिसत असला तरी ही मंदी फार काळ राहणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट – कोणत्याही बाजारात जेव्हा तेजी सुरू होते तेव्हा दराचा जुना उच्चांक मोडला जातो. आजच्या स्तरावरून सोन्याचा भाव फार तर २,००० रुपयांनी घसरेल. परंतु तेजी सुरू होईल तेव्हा जुना उच्चांक नक्कीच मोडला जाईल.
गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलियोमध्ये १० टक्के ते १५ टक्के सोन्यामधील गुंतवणूक आवश्यक आहे. ही गुंतवणूक आज नाही केली तर संधी गमाविण्याची शक्यता जास्त आहे.
लेखक गुंतवणूक व विमा सल्लागार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:06 am

Web Title: techniques for gold buying
Next Stories
1 वर्षांत ३० टक्के परतावा
2 स्वावलंबी संरक्षण धोरण खुणावतेय!
3 गुंतवणूक रत्न
Just Now!
X