विम्यातील गुंतवणूक ही सरकारी रोख्यांमध्ये असल्याने, परतावा खात्रीचा पण अल्प असतो. विमा विक्रेते हे समजावून सांगत नाहीत. त्याऐवजी भावनिक फसवणूक करून विमा विक्रेते नको असलेल्या पॉलिसी विकून स्वत: मालामाल झालेले आहेत.
करण चव्हाण (वय ३२) हे तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे महसूल खात्यात तलाठी आहेत. त्याना मासिक २४ हजार रुपये वेतन मिळते. पत्नी व चार वर्षांचा मुलगा असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांनी मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी ‘जीवन किशोर’ ही योजना खरेदी केली आहे. स्वत:साठी व पत्नीसाठी प्रत्येकी एक पॉलिसी घेतली आहे. घरखर्च व आधीच खरेदी केलेल्या पॉलिसीचे हप्ते वजा जाता हे कुटुंब १२ हजाराची बचत करू शकते. या बचतीचा कसा विनियोग करावा, असा प्रश्न त्यांनी ई-मेल पाठवून विचारला आहे.
सर्वप्रथम आपले अभिनंदन. ‘इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर’ म्हणवून घेणाऱ्या व स्वहित जपणाऱ्या विमा विक्रेत्यापेक्षा ‘लोकसत्ता-  र्थवृत्तान्तकडे विचारणा केलीत त्याबद्दल. आपण खरेदी केलेल्या विमा योजना या विमाछत्राच्या जोडीला गुंतवणूक असलेल्या पारंपरिक प्रकारच्या योजना आहेत. तुमची पत्नी नोकरी करत नाही.
साहजिकच तुमच्या पत्नीला विम्याची आवश्यकता नाही. आणि आपण विमा पॉलिसी बचत म्हणून खरेदी केली असेल तर आपल्याला हे माहित असायला हवे की विमा प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे विमाधारकांचे पसे हे विमा कंपन्या सरकारी रोख्यात गुंतवित असतात.
साहजिकच रोख्यांवरील परताव्याचा दर हा वार्षिक आठ टक्के आहे. या पकी एक टक्का विमा छत्रासाठी, अडीच टक्के विमा विक्रेत्याचे कमिशन वो्रशासकीय खर्चापायी जातात उर्वरित चार साडेचार टक्के विमा योजनेच्या खरेदीदाराला मिळतात. विम्याचे हप्ते सरकारी रोख्यांमध्ये असल्याने अशा योजनांचा परतावा खात्रीचा, परंतु अल्प असतो. विमा विक्रेते हे समजावून सांगत नाहीत. समजावून न सांगता भावनिक फसवणूक करून विमा विक्रेते नको असलेल्या पॉलिसी विकून स्वत: मालामाल झालेले आहेत. म्हणून पत्नीच्या विम्याचा एखादाच हप्ता भरला असेल तर ही पॉलिसी परत करणे योग्य ठरेल.
जास्त हप्ते भरले असतील तर आपण याचा निर्णय स्वत: करावा. आपण घरातील कमवती व्यक्ती आहात. आपल्यासाठी विम्याचे पुरेसे छत्र असणे आवश्यक आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्यासाठी २५ लाखांचा २५ वष्रे मुदतीचा विमा अर्थात टर्म प्लॅन खरेदी करा यासाठी एलआयसीचा ई-टर्म, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलचा आय शिल्ड, एसबीआय लाईफचा ई शिल्ड, या पकी एकाची निवड करावी. (एचडीएफसी लाइफचा या यादीत समावेश नाही. या विषयी लवकरच या सदरातून वाचायला मिळेल.) यासाठी अंदाजे ५०० रुपये हप्ता भरावा लागेल.
गुंतवणुकीची सुरुवात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफने करावी. तिघांचे तीन पीपीएफ खाते उघडून दरमहा प्रत्येकी १,००० रुपये या खात्यात भरावे.
* सध्याच्या व्याज दराप्रमाणे तुम्ही १० वष्रे पीपीएफ खात्यात दरमहा १,००० रुपये जमा केले तर १० वर्षांनंतर प्रत्येक खात्यात १.२७ लाख जमतील. ]
* तुमच्या नियोजनाच्या निमित्ताने हे तमाम शासकीय कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की, गरज नसलेल्या विमा पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा पीपीएफ खात्यात गुंतविलेल्या रकमेवर अधिक परतावा निळेल.  विम्यासाठी टर्म प्लॅन खरेदी करावा.
* उर्वरित गुंतवणुकीसाठी १,००० च्या तीन एसआयपी ‘लोकसत्ता- कत्रे म्युच्युअल फंडा’च्या यादीतून निवडून सुरू करावी. २,००० रुपये आणीबाणीच्या प्रसंगाकरिता राखून ठेवावे.
shreeyachebaba@gmail.com