सेन्सेक्सने अखेर नव्या ऐतिहासिक उच्चांकाचा ‘मुहूर्त’ गेल्या आठवडय़ात गाठलाच. पाठोपाठ आता अनेक त्तसंस्थांचा आशावाद उंचावताना त्यांनी मुंबई निर्देशांकाला मार्च २०१४ पर्यंत २२ हजाराच्या पुढे तर निफ्टीडा ७,००० पर्यंत नेऊन ठेवण्याचा अंदाज बांधला आहे. भांडवली बाजाराच्या वाटचालीबाबत बिर्ला सन लाईफ एएमसीचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील यांच्याशी साधलेला संवाद –
* डिसेंबरपासून अमेरिकेतील रोखे खरेदी मागे घेण्यात येणार आहे. तुम्हाला भारतीय भांडवली बाजारातील नकारात्मक प्रभाव दिसतो येतो का? अमेरिकेच्या आर्थिक उपाययोजना अर्थात ‘क्युई’अकाली स्थगित करण्यासाठी फंड उतावीळ नाही आहे. क्युई आकसून घेण्याच्या फेडच्या निर्णयाचा जागतिक स्तरांवरील सर्व मालमत्तेवर परिणाम होईल. विकसनशील बाजारपेठांमध्ये हे प्रकर्षांने जाणवेल आणि भारत यामध्ये सहीसलामत राहणार नाही. या उपक्रमांची एकमात्र अपेक्षा ही जून २०१३ मध्ये कर्ज आणि शेअर बाजाराच्या बाहेर पसा काढणे आहे. भारतासारख्या भांडवलाचा अभाव असणा-या देशामध्ये दुहेरी तूट पाहता कोणतेही भांडवल उत्प्रवाह चलन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करेल. आकसत चाललेला
क्युई व्यापारी मालाच्या किमती सौम्य होताना पाहील. ज्या व्यापार मालाचे आपण निव्वळ आयातदार नसल्यामुळे चलनवाढीमध्ये अनुकूलत्व येईल. एकूणच, निमुळता होत गेलेल्या क्युईचा अल्प मुदतीसाठी भारतीय बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल. आरबीआयद्वारे तत्कालीन
प्रतिसादामध्ये अलीकडेच चलनीय अस्थिरता हाताळण्यासाठी नवीन गव्हर्नर अंतर्गत आम्हाला विश्वास आहे की धोरणकत्रे आम्ही सामना करत असलेल्या आíथक परिस्थिती समजतात आणि गरजेच्या वेळी ते योग्य ती भूमिका घेतील. मधल्या काळामध्ये, आपली अर्थव्यवस्था सुरळीत सुरू झाली तर आम्ही दीर्घकालीन मालमत्तेला आकर्षति करण्यात सक्षम होऊ शकतो, जी आपल्या बाजारपेठांना सहकार्य करेल.
* सद्यस्थितीत कोणती क्षेत्रे आहेत, ज्या बाबतीत तुम्ही सध्या सकारात्मक आहात?
आम्हाला वाटते की सध्याच्या परिस्थितीमध्ये दीर्घ आíथक अनिश्चिततांकडे पाहता, कोणत्याही विशिष्ट गुंतवणूक योजनेकडे लक्ष देण्याऐवजी आम्ही बॉटम-अप स्टॉक निवडीकडे अधिक लक्ष केंद्रित करावे. सामोरे जावे लागणा-या इतर आव्हानांपकी सेक्टर्समधील मूल्यांकन विषमता हे एक आहे. चक्रीय क्षेत्रांमध्ये लक्षणीय सूट कायम राहिली आहे, पण कमाई दृश्यमानता आणि विकासासोबतचे (उदा. एफएमसीजी) सेक्टर्स बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर व्यापार करत आहेत. म्हणूनच मागील दोन वर्षांपासून मूल्यांकनामध्ये ही विषमता राहिली आहे आणि फक्त अलीकडेच अर्थव्यवस्थेतील चक्रीय पुनप्र्राप्तीच्या अपेक्षांमागे आम्ही यामध्ये सुधारणा पाहिली आहे. आमचे क्षेत्रीय विभाजन याला मूल्यांकन विषमतेमध्ये घेऊन जाते. महाग सेक्टर्सचा पाठलाग किंवा चक्रीय स्टॉक्समध्ये काही विपरीत करण्याऐवजी आमचे ध्येय हे रास्त दरामध्ये वृद्धीप्रदान करणा-या सेक्टर्सना धरून राहण्याचे आहे. सध्या आमचा आयटी, फार्मा, ऑटो आणि मीडियाकडे सकारात्मक दृष्टीकोन आहे. आम्ही काही वेळेसाठी आरोग्य देखभालीकडे जास्त लक्ष दिले. या सेक्टरने मागील काही वर्षांत उत्कृष्ट कमाई वृद्धी दाखवून दिली आहे आणि भविष्यकालीन कमाई संभाव्यता कमजोर रुपयाद्वारे समानरीत्या आशादायी सहाय्यक आहे. ऑटोवर, निवडणूक संबंधित खर्चासह चांगल्या मान्सूनमुळे मागणी पुनरुज्जीवित होईल अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊन आमचा सकारात्मक दृष्टिकोन अर्थव्यवस्थेतील चक्रीय पुनरुज्जीवनावर बाजी मारत बँकिंग व भांडवली मालमत्तेच्या दिशेने वळेल.
* मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून, सध्या भारतीय बाजारपेठा कशा रीतीने आकर्षक दिसत आहेत?
सेन्सेक्स त्याच्या जवळजवळ दीर्घकालीन सरासरी एक-वर्षीय भावी प्राईस-टू-अìनग्स (पीई) १४.५७ च्या आसपास मूल्यांकन व्यापार करत आहे. मूल्यांकन दृष्टिकोनातून आम्हाला असे वाटते की दीर्घकालीन जोखीम- रिवॉर्ड डायनॅमिक फेवर्स इक्विटीज नुसार कमाई वृद्धी १३ टक्के दीर्घकालीन सरासरीवर परतण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षांमध्ये गती प्राप्त करून ही पुनप्र्राप्ती अधिक वाढू शकते, पुढील वर्षी आमच्याकडे सर्वसाधारण
निवडणुका आहेत, ज्या अधिक चांगल्या धोरणी परिस्थितीसाठी निर्णायक वळण देणा-या ठरतील. या गुंतवणूक चक्रामध्ये एक पिक-अप आणला जाऊ शकतो, ज्यायोगे अर्थव्यवस्थेची स्थायी पुनप्र्राप्ती अग्रेसर राहील.
* भारतीय कॉर्पोरेटमधील कमाई खाली घसरली आहे का?  यानंतर आम्हाला सुधारणा पाहता येईल याची शक्यता आहे का?
दीर्घकाळपर्यंत, कॉर्पोरेट कमाईचा कल अर्थव्यवस्थेच्या नाममात्र जीडीपी वृद्धी (१२ टक्के ते १४ टक्के) गाठण्याकडे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमाई वृद्धी एकल डिजिटनेदेखील वाढत नाही आहे. अर्थव्यवस्थेच्या धीम्या गतीमुळे आणि वाढत्या व्याज दरांमुळे – बीएसई ५०० कंपन्यांसाठी आíथक वर्ष २०१२ मध्ये ९.५ टक्के आणि आíथक वर्ष २०१३ मध्ये ६.३ टक्के इतका होता. यातल्या काही विषयांवर सुधारणा पाहिली आहे. जीडीपी वाढ जी गेल्या तिमाहीमध्ये ४.४ टक्क्यांनी घसरली होती, ती चांगल्या मान्सूनमुळे किंचित वसूली करेल अशी अपेक्षा आहे. आíथक वर्ष २०१४ मध्ये अर्थव्यवस्था सुधारेल आणि आíथक वर्ष २०१५ मध्ये चक्रीय वसुली अपेक्षित आहे. मार्जनि आघाडीवर देखील थंड व्यापारी मालामुळे इनपूट मूल्य दबाव कमतरता म्हणून काही प्रमाणात सुधारणा करेल. व्याजदर व्यवस्था अधिक आल्हाददायी होईल म्हणून या वर्षांच्या सुरूवातीला माफक अपेक्षा व वाढ आणि मार्जनिमधील चक्रीय वसुलीचा संयोग आíथक वर्ष २०१४ मध्ये कमाई वाढीमध्ये अग्रेसर असेल. कमाई श्रेणी सुधारित चक्राची सुरूवात आहे, जो बाजारपेठीय दृष्टीकोनातून सकारात्मक संकेत आहे.