वित्तीय ध्येये ठरविताना, सेवानिवृत्तीसमयी दोन कोटी रुपयांचा निधी असावा हे मुख्य ध्येय ठरले. या पकी साठ-सत्त्तर लाख रुपये भविष्य निर्वाह निधी, ग्रँच्युइटीतून मिळणाऱ्या रकमेतून येतील. या व्यतिरिक्त दीड कोटीचा निधी तयार करायचा आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांच्या असलेल्या समिधा यांना हा कोष येत्या दहा वर्षांत निर्माण करणे कसे शक्य आहे..
वित्तीय ध्येये ठरविताना, सेवानिवृत्तीसमयी दोन कोटी रुपयांचा निधी असावा हे मुख्य ध्येय ठरले. या पकी साठ-सत्त्तर लाख रुपये भविष्य निर्वाह निधी, ग्रँच्युइटीतून मिळणाऱ्या रकमेतून येतील. या व्यतिरिक्त दीड कोटीचा निधी तयार करायचा आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांच्या असलेल्या समिधा यांना हा कोष येत्या दहा वर्षांत निर्माण करणे कसे शक्य आहे..
आजच्या या स्तंभाच्या मानकरी आहेत समिधा मंगेश रेगे. समिधा या मुंबईत एका औषध निर्मिती कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट (रेग्युलेटरी अफेअर्स) या हुद्दय़ावर आहेत. त्यांच्या कंपनीच्या भारतातील सहा कारखान्यातून तयार होत असलेल्या विविध औषधांच्या परदेशातील विक्रीसाठी त्या त्या देशातील अन्न व औषध प्राधिकरणाच्या (एफडीए) अटींची पूर्तता करून विक्रीसाठीचा त्या देशात परवाना मिळविणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.
नाशिकच्या विद्या प्रबोधिनी शाळेच्या त्या शालान्त परीक्षेपर्यंत विद्याíथनी होत्या. त्यांनी नाशिक येथूनच बारावी झाल्यावर मुंबईच्या कालिना येथील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमधून औषध निर्माण शास्त्रातील पदवी घेतली. नंतर लगेचच त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. दोन वष्रे नोकरी केल्यावर त्यांनी एमबीए करावेसे वाटल्याने त्यांनी नोकरी सोडून व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. एमबीएनंतर त्यांना बंगळुरूच्या एका औषध निर्माण कंपनीत नोकरी मिळाली. तिथे चार वष्रे काम केल्यावर त्या २००२ मध्ये अमेरिकेत गेल्या. त्यांच्या कंपनीने अमेरिकेत व्यवसाय विकास अधिकारी म्हणून जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. अमेरिकेत एक ऑफिस व दोन विक्री प्रतिनिधी इथपासून सुरुवात करून आठ कार्यालये व ३६७ कर्मचारी इथपर्यंत मजल मारून त्या २००८ मध्ये भारतात परत आल्या.
त्या त्यांच्या आईवडीलांसोबत मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्त्यावरील एका गृहसंकुलात स्वत:च्या सदनिकेत राहातात. या सदनिकेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण झाली आहे. त्यांना एक लहान भाऊ असून तो बोटीवर मरीन इंजिनीअर आहे. भावाचे कुटुंब पुण्यात एनआयबीएम रस्त्यावरील एका गृहसंकुलात राहते. समिधा यांनी आपल्या भावाच्याच गृहसंकुलात आपल्यासाठी आणखी एक सदनिका घेतली आहे. सेवा निवृतीपश्चात या सदनिकेत राहण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी ही सदनिका सध्या ११ महिन्याच्या भाडेकराराने दिली असून त्याचे दरमहा पंधरा हजार रुपये भाडे त्यांना मिळते.
समिधा यांची वित्तीय लक्ष्ये व सल्ला
* डिसेंबर २०१५ पर्यंत कर्जमुक्त होणे.  
* त्यासाठी देत असलेला कर्जाचा हप्ता ५० टक्क्य़ांनी वाढविणे  
* सेवा निवृत्तीचे वय ५५ वर्षे निर्धारित करून पुढील दहा वर्षांत वर्षांत दीड कोटीचा सेवा निवृती कोष निर्माण करणे  
* त्यासाठी प्रत्येकी पंधरा हजाराच्या तीन एसआयपी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु केल्या.
* एप्रिल २०१५ मध्ये या एसआयपीचा आढावा घेण्याचे ठरले.
* पाच लाखाची ‘क्रिटिकल हेल्थ इन्श्युरन्स’ पॉलिसी घेण्याचा सल्ला
* कर्ज फेड झाल्यामुळे जानेवारी २०१६ पासून दरमहा दीड लाख रुपये गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतील.
समिधा यांना सल्ला
समिधा यांनी भाडेकरूकडून त्यांनी घेतलेली दोन लाख रुपये अनामत रक्कम त्यांच्या बचत खात्यात दोन महिने पडून होती. ती रक्कम पाईनब्रिज इंडिया शॉर्टटर्म इन्कम फंडात लगेचच गुंतविली व भाडय़ाच्या रकमेची एका वर्षांसाठी एसआयपी केली. समिधा यांनी तीन विमा योजनांतून १४ लाखाचे विमाछत्र घेतले आहे. त्या तीन क्रेडिट कार्डे वापरतात. तीनही कार्डे मिळून त्यांना अधिकचे सहा लाखाचे अतिरिक्त विमाछत्र लाभले आहे. त्यांच्यावर कुटुंबाची आíथक जबाबदारी नाही व त्या डिसेंबर २०१५ मध्ये कर्ज मुक्त होण्याचा त्याचा संकल्प आहे.
त्यांच्याकडे ‘एगॉन रेलिगेअर’ची २५ लाखाची मुदत योजना आहे. क्लेम सेटलमेंट रेशोच्या तुलनेत ‘एगॉन रेलिगेअर’चा खालून तिसरा क्रमांक लागतो. म्हणून डोळस दृष्टीकोन म्हणून एक कोटीचा दहा वष्रे मुदतीचे विमाछत्र असलेली एचडीएफसी लाईफची ‘क्लिक टू प्रोटेक्ट’ ही योजना त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करण्याचा सल्ला त्यांना पटला. त्यांच्या कार्यालयात निवृत्तीचे वय साठ वर्षे आहे. मात्र वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त व्हावे असा त्यांचा विचार आहे. या विचाराला अनुसरून त्यांचे आíथक नियोजन केले आहे. म्हणून दहा वष्रे मुदतीच्या म्हणजे त्यांच्या सेवा निवृत्तीच्या वयापर्यंतच विम्याची मुदत ठेवली. त्यांच्या अनेक शंकाचे निरसन मागील दोन महिन्याहून अधिक काळ सुरू होते.
विविध संभाषणादरम्यान त्यांची पुढील पंधरा वर्षांची वित्तीय ध्येये वित्तीय नियोजाकाच्या साह्याने निश्चित केली. त्यांच्या सेवानिवृत्तीसमयी दोन कोटी रुपयांचा निधी असावा हे मुख्य ध्येय ठरले. त्या पकी साठ-सत्त्तर लाख रुपये त्यांच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रँच्युइटीतून मिळणाऱ्या रकमेतून, या व्यतिरिक्त दीड कोटीचा निधी त्यांना स्वत: तयार करायचा आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांच्या असलेल्या समिधा यांनी हा कोष येत्या दहा वर्षांत निर्माण करावा असे ठरविण्यात आले.
त्यांनी २०१० साली पंचेचाळीस लाखाचे पंधरा वर्ष मुदतीचे गृहकर्ज घेतले होते. २०१५ मध्ये त्या कर्जाला सहा वष्रे पूर्ण होत आहेत. अजून तीस लाखाचे कर्ज शिल्लक आहे. कर्ज किती असावे यावर त्यांचे व वित्तीय नियोजकाचे तीव्र मतभेद होते. वितीय नियोजकाच्या मते कर्ज फेडून टाकणे व व्याज वाचविणे चांगले तर त्यांना आयकरात मिळणारी सूट व रोखता कमी होण्याची भीती या गोष्टी कर्ज न फेडण्यासाठी समिधा यांना मोहात पाडत होत्या. शेवटी एका दीर्घ चच्रेदरम्यान डिसेंबर २०१५ ही कर्ज फेडण्याची समयसीमा ठरली. 

सध्या त्यांच्या कंपनीकडून त्यांना पाच लाखाची आरोग्य विम्याची सोय उपलब्ध आहे. त्यांच्याकडे स्वत:ची पाच लाखाचे आरोग्यविमा छत्र असलेली पॉलिसी आहे. त्यांना पाच लाखाची ‘क्रिटिकल हेल्थ इन्श्युरन्स’ पॉलिसी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. .

यापूर्वी सुनिता यादव  (‘अर्थ वृत्तान्त’, २० जानेवारी रोजी) यांचे अर्थनियोजन प्रसिद्ध झाले होते. ते वाचल्यावर समिधा यांनाही आपले अर्थनियोजन करून घेण्याची इच्छा झाली आणि त्यांनी सदर मेल लिहिली. समिधा या अतिशय व्यस्त असतात आठवड्यातून किमान दोन वेळा त्या मुंबईबाहेर प्रवास करतात. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता एक प्रश्न सारखा मनात येत होता की, या इंग्रजी वर्तमान पत्र नक्कीच वाचत असतील. अनेक उच्चभ्रू व्यक्ती विशिष्ट इंग्रजी वर्तमानपत्राचे नांव घेत असत. समिधा त्यांचे वित्तीय नियोजन करण्याला अनेक नियोजक सहज            उपलब्ध असताना त्यांनी ‘लोकसत्ते’ची निवड का केली असेल? वित्तीय नियोजन प्रसिद्ध होण्यापूर्वी ज्याचे नियोजन आहे त्या कुटुंबाला हे लेखन वाचावयास दिले जाते. व त्या व्यक्तीच्या भावना दुखावणारे व चुकीच्या संदर्भ लेखनात असू नये हा त्याचा हेतू असतो. समिधा यांनी हे प्रसिद्ध होण्यास हरकत नाही हे सांगण्यास व औपचारिकरीत्या आभार मानण्या साठी फोन केला तेव्हा हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलेले, ‘‘त्या’ इंग्रजी वर्तमानपत्रापेक्षा ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’ची विश्वासार्हता नक्कीच कितीतरी पट अधिक आहे,’’ हे उत्तर ऐकल्यावर येत असलेल्या जबाबदारीने छाती दडपली.
‘सेंट्रल विमा’ नव्हे, सेंट्रल इन्श्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड!
ल्ल ‘माझीही ई-विमा पॉलिसी’ या लेखात (अर्थ वृत्तान्त, १४ एप्रिल २०१४) विमा पॉलिसींचे डिमॅट करणाऱ्या पाच संस्थांची नावे प्रसिद्ध झाली, त्यात ‘सेंट्रल विमा लिमिटेड’ असे जे कंपनीचे नाव आले आहे. ते अयोग्य असून, त्या ऐवजी ते ‘सेंट्रल इन्श्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड’ असे असावयास हवे, याची वाचकांनी दखल घ्यावी.