News Flash

सहा पायऱ्यांत गुंतवणूक!

गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांची यादी बनवा.

पोर्टफोलिओ बांधताना

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या सर्व मालमत्तेची  व देणी यांची यादी केली असेलच. या यादीत खालील गोष्टींचा अंतर्भाव असायला हवा.

१.  बँकेतील ठेवी, कंपनी ठेवी

२. बचत खात्यातील जमा रक्कम

३. पोस्टाच्या योजनांतील ठेव

४. कंपनीचे शेअर्स

५. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

६.  सोने – चांदी

७.  स्थावर मालमत्ता

८. घर, जमीनजुमला इत्यादी

९. भविष्य निर्वाह निधी

१०. सरकारी रोखे व इतर रोखे

अशा प्रकारे यादी वाढतच जाईल, पण अशा मोठय़ा यादीमुळे आपण गोंधळून जाऊ. आपल्याला कळणार नाही की यांची एकमेकांशी तुलना कशी करायची? कोणती गुंतवणूक जास्त चांगली आहे, जास्त फायदा देणारी आहे हे कसे ठरवायचं? माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी कोणती गुंतवणूक घेणे योग्य ठरेल? या सगळ्याची माहिती मला कुठे मिळेल? मी काय केले की मला जितका शक्य असेल तितकी कमी जोखीम पत्करून जास्तीत  जास्त परतावा मिळवता येईल? असा जेव्हा आपण विचार करायला लागतो आणि मग सर्व गुंतवणूक पर्यायांचा आढावा घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की सर्व गुंतवणूक पर्यायांची आपण ठळकपणे चार विभागांत विभागणी करू शकतो :

१) रोख रक्कम

२) स्थिर परतावा देणारी गुंतवणूक  (fixed Interest)

३) स्थावर जंगम मालमत्तेतील गुंतवणूक

४) शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक.

अशा चार भागांत विभागणी केली तर मग सतराशे साठ गुंतवणूक पर्यायांचा विचार करत न बसता आपल्याला कुठे / कशात गुंतवणूक करायची आहे याचा निर्णय घेणे सोपे जाईल. कारण आता आपाल्याला फक्त या चार पर्यायांचाच विचार करायचा आहे.

आता आपण हे ठरवले पाहिजे की मला सर्व चारही पर्यायांमध्ये गुंतवणूक करायची आहे की त्यापकी फक्त काही पर्यायांमध्येच गुंतवणूक करायची आहे? असे ठरवून झाले की, मग आपल्याला हे ठरवावे लागेल की मी ज्या पर्यायात गुंतवणूक करणार आहे त्यात मी किती पसे गुंतविणार आहे? म्हणजे जर माझ्याकडे १०० रुपये असतील तर त्यातील किती रुपये मी कोणत्या पर्यायात गुंतवेन? जर तुम्ही एकच पर्याय निवडला असेल तर सर्व पसे त्याच पर्यायात गुंतवता येतील, पण जास्त पर्याय निवडले असतील तर आपल्याला ठरवावे लागेल कोणत्या पर्यायात किती गुंतवायचे ते कसे ठरवायचे? तर कोणत्या पर्यायात किती जोखीम आहे आणि त्याचा परतावा किती आहे यावरून.

आपण दोन प्रकारे आपल्या गुंतवणुकीवर फायदा मिळवू शकतो.

१) आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा (Return) उदा. व्याज, घरभाडे, डिव्हिडंड इत्यादी.

२) दीर्घकाळ गुंतवणूक ठेवल्यामुळे होणारा दीर्घकालीन नफा (capital appreciation).

एकदा आपण कोणत्या प्रकारचा परतावा (Return) मिळणे आपल्याला अपेक्षित आहे हे ठरवले की कोणत्या पर्यायात गुंतवणूक करायची आहे हे ठरवणे सोपे जाईल. उदा. काही कंपन्यांचे समभाग जास्त लाभांश देतात, जर आपणास लाभांश मिळवणे अपेक्षित असेल तर आपण असेच शेअर्स आपल्या पोर्टफोलिओसाठी निवडू जे जास्त लाभांश देतात.

अशा प्रकारे एकदा कुठे गुंतवणूक करायची ते ठरलं की मग आपण आपल्या वित्तीय ध्येयांकडे म्हणजेच आपली उद्दिष्टे काय आहेत त्याकडे वळूया.

आतापर्यंत तुम्ही तुमची वित्तीय ध्येये काय आहेत हे लिहून काढलंच असेल. आपण जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे आपली वित्तीय ध्येये बदलत जातील, उदा. जर तुम्ही तरुण असाल तर दुचाकी किंवा चारचाकी वाहन, सेकंड होम घेणे इत्यादी आणि जर तुम्ही रिटायर्ड झाला असाल तर माझ्याकडे असलेले पसे महागाई वाढीमुळे (चलनवाढ) कमी न होता तेवढेच कसे राहतील, अर्थात मुदलाची सुरक्षितता आणि होत असेल तर औषध-उपचारांवर होणारा खर्च भागविला जाणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. तर मग आता कुठे गुंतवणूक करायची आणि कशासाठी करायची हे ठरल्यावर, आपण गुंतवणूक करताना आपली गल्लत का व कशी होते ते पुढील भागात बघू.

पसे कुठे गुंतवायचे, हे कसे ठरवायचे?

१. गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांची यादी बनवा.

२. त्यांची चार ठळक पर्यायांत विभागणी करा : रोख रक्कम, स्थिर परतावा देणारी गुंतवणूक, स्थावर जंगम मालमत्ता, शेअर्स.

३. कुठल्या पर्यायामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे ते ठरवा.

४. प्रत्येक पर्यायात किती गुंतवणूक करणार ते ठरवा.

५. कोणत्या प्रकारचा परतावा तुम्हाला अपेक्षित आहे – नियमित का दीर्घकालीन नफा?

६) वर ठरवल्याप्रमाणे तुमच्या गरजा पूर्ण करेल अशी गुंतवणूक खरेदी करा.

(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2016 1:33 am

Web Title: tips for investment
टॅग : Investment
Next Stories
1 आगाऊ कर वेळेवर भरा आणि व्याज वाचवा!
2 आरोग्यं धनसंपदा
3 घोटाळा..कमीत कमी ५०,००० कोटींचा!
Just Now!
X