26 November 2020

News Flash

व्यापारचक्र

अर्थव्यवस्थेतील चढ-उतार कधी आणि किती प्रमाणात होणार आहेत

|| कौस्तुभ जोशी

अर्थव्यवस्थेतील चढ-उतार कधी आणि किती प्रमाणात होणार आहेत याचे निश्चित भाकीत आजपर्यंत कोणीही करू शकलेले नाही! मात्र ढोबळमानाने विचार करता अर्थव्यवस्थेत ऊध्र्व आणि अधो अशा दिशेने सतत हेलकावे सुरू असतात या चक्रालाच व्यापारचक्र असे म्हणतात.

अर्थव्यवस्थेतील प्रगती किंवा अर्थव्यवस्थेतील घसरण ही जीडीपीच्या दराने मोजली जाते. साधारण तीस ते चाळीस वर्षांचा जीडीपीचा अंदाज घेतल्यास देशाने कोणत्या प्रकारे प्रगतीचा आलेख नोंदवला आहे हे आपल्या लक्षात येते. अर्थव्यवस्थेत तेजी, मंदी आणि मंदीनंतर पुन्हा तेजी आणि पुन्हा मंदी असा क्रम सुरू राहतो. व्यापारचक्रे निश्चित कालावधीची नसली तरी आठ ते दहा वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेतील चढ किंवा उतरणीचा ढोबळ अंदाज नक्की येतो.

सार्वत्रिक घटना – एखादा देश गरीब आहे आणि एखाद्या श्रीमंत आहे म्हणून तेथे अशा प्रकारे तेजी-मंदी येणारच नाही असे होत नाही. ही एक अत्यंत नसíगक घटना आहे गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात  आशियाई राष्ट्रांमध्ये जी आर्थिक मंदी आली ती राष्ट्रे अमेरिकेसारखी बलाढय़ नव्हती! यावरून हेच स्पष्ट होते की, ही एक वैश्विक संकल्पना आहे आणि ती सगळ्यांनाच लागू पडते.

कालावधी – व्यापारचक्राचा कालावधी हा नक्की किती वर्षांचा असेल हे सांगता येणं कठीण असतं. तेजीतून घसरण होऊन मंदीचा फेरा यायला कमी काळ लागतो मात्र एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकलेली  अर्थव्यवस्था पुन्हा खेचून बाहेर काढणे ही प्रक्रिया कधी कधी दीर्घकाळ सुरू राहते. १९२९ मधील जागतिक महामंदीचे पडसाद अमेरिकेसह युरोपात जवळजवळ दहा वर्षँ उमटत राहिले.

तीव्रता – व्यापारचक्रात प्रत्येक वेळी बसणारे झटके हे हे तितक्याच तीव्रतेने असतीलच असे नाही. कधी कधी अर्थव्यवस्था त्यातून अल्प काळातही सावरली जाऊ शकते, तर कधी तो कालावधी जास्त असतो.

व्यापारचक्राच्या चार अवस्था

तेजी – वस्तूची मागणी वाढती असते, वेतनमान दमदार असते, नफ्याचे प्रमाणही वाढते, किमती वाढतात, गुंतवणूक वाढते, उद्योजक अधिक जोखीम घेऊन पसे गुंतवतात.

घसरण – तेजीचा शेवट आणि मंदीची सुरुवात यातील कालावधी म्हणजेच घसरणीचा कालावधी. मागणीचा वेग कमी होण्यास सुरुवात होते. कर्ज घेऊन नवीन व्यवसाय सुरू करण्याचा उत्साह कमी होतो, उत्पादन आखडते घेतले जाते.

मंदी – असं म्हणतात की, प्रत्येक तेजीतच मंदीची बीजं असतात! जो आर्थिक वेग तेजीत अनुभवला गेला त्याला मर्यादा येऊ लागतात. नसíगक आपत्तीसारखी कारणं किंवा युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय तंटे किंवा व्यवस्थेतील धोके (सबप्राइम संकट) यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होते. निराशावाद वाढीस लागतो, रोजगारनिर्मितीचा वेग कमी होतो. व्याजाचे दर कमी झाले तरीसुद्धा नव्या गुंतवणुका करण्यात उद्योगपती स्वारस्य दाखवत नाहीत बेकारीचे प्रमाण वाढू लागते उपभोग्य वस्तू आणि चनीच्या वस्तूची मागणी हळूहळू कमी होते.

पुनरुज्जीवन – मंदीतून सावरण्यासाठी सरकारने व मध्यवर्ती बँकेने उपाययोजना सुरू केल्यावर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्यास सुरुवात होते. रोजगार वाढू लागतो, मागणी वाढू लागते, खरेदी करण्यास लोक उत्सुक असल्याचे दिसू लागते. थोडय़ा प्रमाणात का होईना औद्योगिक उत्पादनाचा दर वाढता राहतो.

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:19 am

Web Title: trade cycle
Next Stories
1 कांद्यासाठी अच्छे दिन
2 नकुशा मालमत्ता
3 कर्जरहित कंपनीचा – हाय-बीटा शिलेदार
Just Now!
X