majha-portfolio321सुमारे २६ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही कंपनी फ्लेक्स इंडस्ट्रीज या नावाने ओळखली जायची. सध्या यूफ्लेक्स ही भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सीबल पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनी आहे. भारताखेरीज दुबईत उत्पादन करणाऱ्या या कंपनीची अनेक उत्पादने असून ८० हून अधिक देशांतील बाजारपेठेत ती आपली उत्पादने पुरवते. इंग्लंड, अमेरिका तसेच आखाती देशांत यूफ्लेक्सच्या उप कंपन्या असून अनेक मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या उदाहरणार्थ नेस्ले, पेप्सी, युनिलीवर समूह, हेन्केल, हाइन्झ, स्मिथक्लाइन वगैरे या कंपनीच्या प्रमुख ग्राहक आहेत. या av-04खेरीज टाटा, गोदरेज, आयटीसी, अशा अनेक भारतीय उद्योग समूहाचाही यात समावेश करावा लागेल. बीओपीईटी फिल्म्स, बीओपीपी फिल्म्स, सीपीपी फिल्म्स, होलोग्राफी, लॅमिनेशन्स इ. अनेक महत्वाची उत्पादने करणारी ही सर्वात मोठी पॅकेजिंग कंपनी आहे. सध्या आíथक परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळत असल्याने मंदीचे सावट लवकरच दूर होईल. ग्राहकोपयोगी उत्पादनांतील म्हणजे एफएमसीजी कंपन्यांच्या मालाला चांगला उठाव आहेच, त्या खेरीज ऑनलाइन शॉिपगमुळेही पॅकेजिंग कंपन्यांचे दिवस बहरत जातील. ३० सप्टेंबर २०१४ रोजी समाप्त तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आíथक निष्कर्षांप्रमाणे यंदाच्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत १२% वाढ होऊन ती ८९१.४ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात १२७% वाढ होऊन तो ४५.५ कोटीवर आला आहे. मध्यम ते दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा असा हा हाय बीटा शेअर आहे.