26 January 2021

News Flash

बाजाराचा तंत्र-कल : टू बी ऑर नॉट टू बी

सेन्सेक्सवर ४८,१२१ ते ४८,९०० आणि निफ्टीवर १४,१०० ते १४,३०० हे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी साध्य झाले.

आशीष ठाकूर

गेल्या लेखात उल्लेख केलेले निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४८,१२१ ते ४८,९०० आणि निफ्टीवर १४,१०० ते १४,३०० हे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी साध्य झाले.

या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ४८,७८२.५१

निफ्टी: १४,३४७.२५

येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने ४८,३०० आणि निफ्टीवर १४,३००च्या स्तरावर सातत्याने टिकल्यास, आपण सुरू केलेल्या जीपीएस ट्रँकिंग प्रणालीप्रमाणे निफ्टी निर्देशांकावर २०० अंशाची वृद्धी ही १४,५०० व नंतर १४,७०० आणि सेन्सेक्सवर ४८,८२५ ते ५०,००० अशी त्या त्या निर्देशांकाची वरची लक्ष्ये असतील.

अविरत पैशाच्या ओघामुळे असे वाटते की बाजारात घसरण ही अशक्यप्राय बनली आहे. एकंदरीत मनाची अशी धारणा बनत असल्याने या स्तरावर खरेदी करू या म्हटले तर तेही धाडसाचेच वाटते. या उच्चांकी स्तरावर समभाग खरेदी केले आणि बाजार कोसळला तर अशी ‘टू बी ऑर नॉट टू बी’सारखी गुंतवणूकदारांच्या मनाची द्विधावस्था झाली आहे. आज आपण या संभ्रमावस्थेच्या निवारणाचा प्रयत्न करू या.

आताच्या घडीला सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. जोपर्यंत हा स्तर राखण्यास निर्देशांक यशस्वी ठरतोय, तोपर्यंत तेजीची कमान कायम राहील. भविष्यात सेन्सेक्सला ४७,८०० आणि निफ्टीला १४,००० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४६,७०० आणि निफ्टीवर १३,७०० असे असेल.

निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ४६,४४० आणि निफ्टीवर १३,६०० च्या खाली टिकल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४३,८५७ आणि निफ्टीवर १२,८०८ असे असेल.

आता आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

१) टाटा एलेक्सी लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १२ जानेवारी

०  ८ जानेवारीचा बंद भाव- २,०४१.८५ रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर -१,९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,२५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,३५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८०० रुपयांपर्यंत घसरण.

२) एचडीएफसी बँक

० तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, १६ जानेवारी

०  ८ जानेवारीचा बंद भाव- १,४३१.८५ रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३०० रुपयांपर्यंत घसरण.

३) बजाज फायनान्स लिमिटेड

० तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २० जानेवारी

० ८ जानेवारीचा बंद भाव – ५,०८० रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,८०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ५,३५० द्वितीय लक्ष्य ५,५५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,६०० रुपयांपर्यंत घसरण.

४) एशियन पेंट्स लिमिटेड

० तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २१ जानेवारी

०  ८ जानेवारीचा बंद भाव- २,८४४ रु.

० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,७०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३,००० द्वितीय लक्ष्य ३,१५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,५०० रुपयांपर्यंत घसरण.

५) बजाज ऑटो लिमिटेड

०  तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २१ जानेवारी

०  ८ जानेवारीचा बंद भाव- ३,५३२ रु.

०  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३,७००, द्वितीय लक्ष्य ३,९०० रु.

ब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,२०० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:06 am

Web Title: weekly stock market update weekly market update zws 70
Next Stories
1 विमा..विनासायास : करोनाकाळ संकट, संधीही!
2 रपेट बाजाराची : सावधगिरी हवीच!
3 ‘दीघरेद्देशी गुंतवणूक नियोजन बदलण्याची आवश्यकता नाही’
Just Now!
X