वर्ष १९८५ मध्ये स्थापन झालेली वेलस्पन इंडिया ही वेलस्पन समूहाची फ्लॅगशिप अर्थात ध्वजाधारी प्रमुख कंपनी म्हणावी लागेल. टेरी टॉवेलचे उत्पादन करणारी वेलस्पन ही आशिया खंडातील सर्वात मोठी, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनी आपल्या एकूण उत्पादनांपैकी सुमारे ९४ टक्के उत्पादन जगातील ५० हून अधिक देशांत निर्यात करते. गेली पाच वर्षे सातत्याने अमेरिकेतील सर्वात मोठी पुरवठादार कंपनी म्हणून वेलस्पनने बहुमान मिळविला आहे. जगातील तीस मोठय़ा रिटेलर ग्राहकांपैकी १७ मोठय़ा ग्राहकांना वेलस्पन आपली उत्पादने पुरविते. यामध्ये वॉलमार्ट, जे सी पेनी आणि मॅकीचा समावेश आहे. कंपनीचा सुप्रसिद्ध क्रिस्ती ब्रँड आता चीनमध्येदेखील स्थिरावत आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जगभरात आपली टेरी टॉवेल, कारपेट, बेड शीट्स, रग्स इ. उत्पादने पुरवणाऱ्या वेलस्पनची गुजरातेत दोन अत्याधुनिक उत्पादन केंद्रे असून कंपनीकडे १०० लूम्स, तर ३,०५,००० स्पिंडल्स आहेत. आपल्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी उत्पादन क्षमता वाढवत असून त्याकरिता सुमारे ७०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करीत आहे. सप्टेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या उलाढालीत घट होऊन ती २५६९.२४ कोटी रुपयांवर आली आहे, तर नक्त नफ्यातदेखील ६९ टक्के घट होऊन तो १४६.५५ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी टार्गेट कॉर्प या अमेरिकन कंपनीने वेलस्पनच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर आरोप केल्यानंतर कंपनीच्या विक्रीवर आणि एकूणच गुणवत्तेच्या विश्वासार्हतेवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र कंपनी आपली बाजारातील पत आणि स्थान परत मिळवण्यात यशस्वी झाली आहे असे दिसते. येत्या दोन वर्षांत उत्पादन क्षमतावाढीनंतर कंपनीच्या नफ्यात भरीव वाढ अपेक्षित आहे तसेच संपूर्ण कर्जमुक्त होण्याचा कंपनीचा मानस आहे. सध्या ७० च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
  • गेल्या वर्षीच्या पोर्टफोलियोमधील विकास इकोटेक, नोसिल आणि जीएनए अ‍ॅक्सल्स हे तीन शेअर्स दुपटीहून अधिक झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली असेल ते नफा कमावू शकतात.