01 March 2021

News Flash

माझा पोर्टफोलियो : पॉलिमरच्या किमतीतील घसरणीचा लाभ

पॉलिमरच्या किमतीत झालेली घट कंपनीच्या उत्पादन खर्चात कपात करेल.

अजय वाळिंबे

विम प्लास्ट म्हणजे सेलो. १९६७ मध्ये बांगडय़ा आणि पीव्हीसी चप्पलचे उत्पादन करणाऱ्या सेलोने १९८८ मध्ये मुंबईत प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. आज विमप्लास्टचे दमन, बड्डी, चेन्नई, हरिद्वार आणि कोलकता येथे उत्पादन प्रकल्प असून नऊ वितरण डेपो आहेत. भारतामध्ये सुप्रसिद्ध सेलो ब्रँड प्रस्थापित असून कंपनीची बहुतांशी उत्पादने याच ब्रँडने विकली जातात. नीलकमल आणि सुप्रीमनंतर विमप्लास्ट ही भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील मोठी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचा बाजार हिस्सा २० टक्के होता. सेलोची विस्तृत उत्पादन श्रेणी असून त्यामध्ये प्लास्टिक हाऊसवेअर, ग्लासवेअर, ओपल वेअर, मेलामाईन, किचन अप्लायन्सेस, मोल्ड फर्निचर, एअर कुलर, घरगुती साफसफाईची उत्पादने इ. अनेक उत्पादनांचा समावेश होतो.

करोनाकाळात टाळेबंदीमुळे पहिल्या तिमाहीत कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र टाळेबंदी उठल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी करून दाखवली. या सप्टेंबरअखेर तिमाहीसाठी कंपनीने ६०.५९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६.९५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीशी त्याची तुलना करता येणार नाही. मात्र लॉकडाऊननंतर छोटय़ा शहरातून तसेच ग्रामीण भागातून कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष अधिक चांगले असू शकतील अशी आशा आहे.

पॉलिमरच्या किमतीत झालेली घट कंपनीच्या उत्पादन खर्चात कपात करेल. तसेच प्लास्टिक उत्पादनांच्या आयतीवरील बंधने, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे फ्लेक्सिबल प्लास्टिक फर्निचरला असलेली वाढती मागणी आणि उत्तम ब्रँड या सगळ्याचा कंपनीच्या कामकाजावर सकारात्मक परिणाम आगामी काळात अपेक्षित आहे. केवळ १२ कोटी भाग भांडवल आणि फक्त ‘बीएसई’वर नोंदणी असलेला हा मायक्रो कॅप शेअर अर्थसंकल्पपूर्व एक फायद्याची खरेदी ठरू शकेल.

विम प्लास्ट लिमिटेड

(बीएसई कोड – ५२६५८६)

शुक्रवारचा बंद भाव :          रु. ३७१/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :     रु.४५९/२११

बाजार भांडवल :             रु. ४४५ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. १२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ६९.९१

परदेशी गुंतवणूकदार            २.५१

बँक/ म्यु. फंड/ सरकार          ६.४८

इतर/ जनता               २१.१०

संक्षिप्त विवरण

* शेअर गट                          : मायक्रो-कॅप

* प्रवर्तक                             : सेलो समूह

* व्यवसाय क्षेत्र                    : प्लास्टिक्स

* पुस्तकी मूल्य          :    रु. २९६.२१

दर्शनी मूल्य                      :   रु. १०/-

* लाभांश                             :   ७०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न                     : रु. २२.३६

*  पी/ई गुणोत्तर                                    : १६.६

*  समग्र पी/ई गुणोत्तर (उद्योग क्षेत्र)     : २३.४

*  डेट इक्विटी गुणोत्तर                           : ००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                    : २१६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्लॉइड               : १६.४९

*  बीटा                                                    : ०.७६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 12:05 am

Web Title: wim plast ltd campany profile zws 70
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : स्पर्धात्मक नवपर्व आणि विमा नियामकाची भूमिका
2 फंडाचा ‘फंडा’.. : ‘न्यू नॉर्मल’चा लाभार्थी!
3 बाजाराचा तंत्र-कल : पाहिले न मी तुला..
Just Now!
X