अजय वाळिंबे

करोना कालावधीत गुंतवणूक करण्याजोगी जी काही क्षेत्रे आहेत त्यातील एक आघाडीचे क्षेत्र म्हणजे माहिती-तंत्रज्ञान, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर क्षेत्र. आज सुचविलेली झेन्सार टेक्नॉलॉजी ही आरपीजी समूहाची याच क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी. झेन्सार ही जगातील पहिली एंटरप्राइझ-वाईड ‘एसईआय सीएमएम लेव्हल ५’ कंपनी असून कंपनीचे उद्योग, कौशल्य आणि वितरण, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, उत्पादन आणि दूरसंचार इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रावीण्य आहे. आपले क्षेत्र विस्तारताना झेन्सारने आयटी आणि बीपीओमधील सेवांचे विस्तृत पोर्टफोलिओ तयार केले आणि त्याचे एकत्रीकरण केले.

कंपनीच्या प्रमुख ग्राहकांच्या मांदियाळीत सिस्को, नॅशनल ग्रिड, फुजित्सु, मार्क्‍स अ‍ॅण्ड स्पेन्सर, डॅनेर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रॉनिक आर्ट्स आणि लॉजिटेक इत्यादींचा समावेश होतो. आयसीएम, मायक्रोसॉफ्ट, सन मायक्रोसिस्टीम आणि ओरॅकल या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांशी झेन्सारने सामरिक तंत्रज्ञान भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे आपल्या ग्राहकांना व्यापक आणि अत्याधुनिक व्यवसायाचे समाधान सुनिश्चित करून झेन्सारला त्याच्या मूलभूत कौशल्यांचा फायदा उठवता येतो.

कंपनी मुख्यत्वे रिटेल, हाय-टेक आणि मॅन्युफॅ क्चरिंग, फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस आणि इन्शुरन्स व्यवसायासंबंधित सेवा पुरवते. याखेरीज झेन्सार ओरॅकलची जगभरातील प्रमाणित भागीदार म्हणून कार्यरत असून एसएपी (सॅप) स्पेसमध्ये डेअरी, टेक्स्टाईल, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी/ऑपरेशन्सच्या प्रमुख व्हर्टिकलमध्ये सोल्युशन्स प्रदान करते. कंपनीची आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, बीईए स्टार, सन, एसएपी, ऑफशोअरसॉफ्ट जीएमबीएच (जर्मनी) इ. कंपन्यांशी तंत्रज्ञान भागीदारी असून त्यायोगे कंपनी जगभरातील कंपन्यांना विविध सेवा पुरवते.

कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. कंपनीने टाळेबंदी कालावधीत ९९१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७३ कोटी रुपयांचा (गेल्या आर्थिक वर्षांत ७५ कोटी रुपये) नक्त नफा कमावला आहे. करोना परिस्थितीत आपल्या ग्राहकांच्या सेवेत सातत्य राखण्यासाठी कंपनीने आर्टिफिश्यल इंटेलिजन्स (एआय), फ्युचर रेडी-क्लाऊड तसेच बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रासाठी खास सेवा सुरू केल्या आहेत. जून महिन्यात ९० पर्यंत खाली आलेला हा शेअर आता २०० रुपयांवर गेला आहे. मात्र इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत अजूनही हा शेअर आकर्षक भावात उपलब्ध आहे. मध्यम कालावधीत उत्तम व्यवस्थापन असलेल्या झेन्सारसारख्या अनुभवी कंपनीमधील गुंतवणूक आकर्षक परतावा देऊ शकेल.

* आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे आणखी खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

झेन्सार टेक्नॉलॉजीज लि.

(बीएसई कोड – ५०४०६७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १९८.३५

स्मॉल कॅप

व्यवसाय :                           माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर

प्रवर्तक :                                                   आरपीजी समूह

बाजार भांडवल :                                         रु.  ४,४७२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                         रु. २२३/ ६४

भागभांडवल भरणा :                                रु. ४५.०९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ४९.२३

परदेशी गुंतवणूकदार      १६.००

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २४.५४

इतर/ जनता     १०.२३

पुस्तकी मूल्य :  रु.९२.७०

दर्शनी मूल्य :   रु. २/-

लाभांश : १४०%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. ११.६३

पी/ई गुणोत्तर :  १७.१४

समग्र पी/ई गुणोत्तर :    २०.४५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.१६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ७.२९

रिटर्न ऑन कॅपिटल :    १८.१०

बीटा :  १.३५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.