आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत त्या हेमा पांडे या उद्या सेवानिवृत्त होत आहेत. नागपूरमधील माधव नगरच्या त्या रहिवासी आहेत. त्यांचे चिरंजीव मंदार पांडे यांनी पाठविलेल्या मूळ इंग्रजी भाषेतील ई मेलचे स्वैर भाषांतर या प्रमाणे..
नमस्कार !
माझी आई, हेमा पांडे ही महाराष्ट्र शासनाच्या एका अंगिकृत उपक्रमातून ३२ वर्षांच्या सेवेनंतर ज्येष्ठ लिपिक या पदावरून या महिनाअखेर निवृत्त होत आहे. आमची कौटुंबिक पाश्र्वभूमी पुढीलप्रमाणे, मी व माझी विवाहित मोठी बहीण माहिती तंत्रज्ञान उद्योगातील कंपन्यांत काम करतो. मी पुण्यात, तर बहीण नवी मुंबईत असते. आई सेवानिवृत्तीनंतर सध्या तरी नागपूरला स्वतंत्र राहणार असून कदाचित भविष्यात माझ्याकडे कायम वास्तव्यास येण्याची शक्यता आहे. आईवर कोणतेही कर्ज नाही. तिला मिळणाऱ्या निवृत्तीपश्चात लाभांचा अंदाजे तपशील याप्रमाणे –
६ भविष्य निर्वाह निधी    ३३ लाख रु.
६ ग्रॅच्युइटी                 ६ लाख रु.
६ शिल्लक रजेचा पगार   ४ लाख रु.
६ तिची बचत (अंदाजे)    १० लाख रु.
या व्यतिरिक्त वडिलांची दरमहा १,८०० रुपयांची पेन्शन आईला मिळते.
तिचा वैयक्तिक खर्च मासिक २० हजार रु. आहे. त्याची आणि एखादे मोठे आजारपण अकस्मात उद्भवल्यास खर्चाची तजवीज करणे हे दोन प्रमुख उद्देश या नियोजनाचे आहेत. तिला मिळणाऱ्या निवृत्तीपश्चात लाभांचे नियोजन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करावे. माझी आई ही ‘लोकसत्ता’ची अनेक वर्षांपासूनची वाचक आहे व ही मेल मी तिच्या सांगण्यावरून लिहित आहे.
धन्यवाद !
– मंदार पांडे
हेमा पांडे यांच्या नियोजनाला सुरुवात करण्यापूर्वी त्या बाबतचा काही महत्त्वाचा तपशील विचारात घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट हेमा यांनी वयाची ५८ वष्रे पूर्ण केली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यास ६० वर्षांची वयोमर्यादा असल्याने सरकारच्या अनेक योजनांमध्ये त्या गुंतवणूक करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट मागील वर्षी हेमा यांनी २२ हजार रुपये आयकर भरला होता. या वर्षीसुद्धा त्यांच्या पगारातून आयकर कपात झाली आहे. तसेच वर उल्लेख केलेल्या रकमेतून काही आयकर कापला जाईल. या आíथक वर्षांत मिळालेल्या वेतनावर व सेवा निवृत्तीपश्चात मिळणाऱ्या लाभांवर नक्की किती आयकर कापला जाईल व पुढील आíथक वर्षांत कर विवरण पत्र (रिटर्न) दाखल केल्यास हा उगमस्थानी कापलेला कर (टीडीएस) परत मिळेल किंवा कसे याविषयी आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. एका अंदाजानुसार या वर्षी आपल्याला ३० ते ३५ हजाराची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक केवळ याच वर्षी करायची असल्याने ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीतील ‘अ‍ॅक्सिस लॉग टर्म इक्विटी फंडा’त गुंतवणूक करावी. भविष्यात शून्य कर द्यावा लागला तरी व नियमित विवरण पत्र सादर करावे. यात हयगय करू नये.
कोणाचेही नियोजन करीत असताना वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्याचे दोन ते तीन मार्ग असतात. ते पर्याय व त्यांचे फायदे तोटे क्रमाने जाणून घेऊ.
विमा कंपनीचा ‘पेन्शन प्लान’
पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे निवृत्तीपश्चात मिळणाऱ्या लाभाची रक्कम Immediate annuity pension plans with purchase valuया प्रकारच्या योजनेत गुंतविणे. विद्यमान कायद्यानुसार दरमहा ठरावीक रक्कम म्हणजे Annuity देण्याचे अधिकार फक्त विमा उद्योगालाच आहेत. म्हणून आपल्या देशात ‘पेन्शन प्लान’ विकण्याचा परवाना विमा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत विमा कंपन्यांनाच फक्त आहे. या प्रकारच्या विमा योजनात पेन्शन लगेचच सुरू होत असल्याने या योजनात विमा छत्र नसते. या प्रकारच्या योजनेचे उदाहरण म्हणजे एलआयसीची जीवन अक्षय-४ हे होय. Differed annuity किंवा काही कालावधीनंतर सुरू होणाऱ्या योजनेत पेन्शन सुरु होताना विमाछत्र संपुष्टात येते. प्रत्येक विमा कंपनीची आपली पेन्शन योजना असते. आपल्या पसंतीच्या दोन-तीन विमा कंपन्यांकडे त्यांच्या योजनांचे सादरीकरण मागवावे व पसंतीच्या विमा कंपनीची योजना खरेदी करावी.

आजचा दरमहा पेन्शन मिळण्याचा दर अर्थात annuity rate साधारण ६ ते ७ टक्क्यादरम्यान आहे. म्हणजे ४० लाख गुंतविल्यास अंदाजे दरमहा २० ते २३ हजारांदरम्यान पेन्शन मिळेल. अनेकांना annuity हा प्रकार पसंत नसतो. या प्रकारात पेन्शनमध्ये महागाईच्या दराशी सुसंगत वाढ होत नाही. व दुसरे कारण या प्रकारात रोकड सुलभता नसते. एकदा का पेन्शन प्लान खरेदी केला की योजनेच्या अटीनुसार दहा किंवा पंधरा वष्रे यातून बाहेर पडता येत नाही. एकदा का annuity विकत घेतली की आयुष्यभर काही करायला नको. अशा लोकांसाठी हे उत्तम साधन आहे.

nagpur, Voters Confused, polling station, Voters Confused between polling station, new hyderabad house, old hyderabad house, voting 2024, lok sabha 2024, election 2024, nagpur news, voting news, marathi news,
नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

दुसरा पर्याय:
बिर्ला सनलाईफ ९५, कॅनरा रोबेको बॅलेन्स्ड फंड, एचडीएफसी बॅलेन्स्ड फंड, एसबीआय बॅलेन्स्ड फंड, आयसीआयसीआय प्रू. बॅलेन्स्ड फंड, एलआयसी नोमुरा बॅलेन्स्ड, टाटा बॅलेन्स्ड, एचडीएफसी प्रुडन्स असे समभाग गुंतवणुककेंद्रीत आठ बॅलेन्स्ड फंड सुचवीत आहे. या बॅलेन्स्ड फंडापकी सहा फंडांची निवड करून प्रत्येकी सात लाख (एकूण ४२ लाख) गुंतवावे. गुंतवणूक केल्यापासून तेराव्या महिन्यात मासिक खर्चासाठी एका फंडातून २० हजार काढावे. असे प्रत्येक फंडातून वर्षांतून दोनदा रक्कम ‘सिस्टेमॅटिक विथड्रावल प्लान’ पद्धतीने काढावी. दहा लाखाची बचत जी सध्या बँकेच्या मुदत ठेवीत आहे त्याचे फेरनियोजन होणे जरूरीचे आहे. बॅलेन्स्ड फंड गुंतवणुकीवर एक वर्षांच्या आधी गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू होईल. हे टाळण्यासाठी वर सुचविल्याप्रमाणे तेराव्या महिन्यापासून पुढे मासिक खर्चाची रक्कम काढावी. एका वर्षांच्या खर्चाचे २.४० लाख लिक्विड फंडात गुंतवून दरमहा २० हजार काढावे. उर्वरित ५.५० लाख दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ६०:४० या प्रमाणात लार्ज कॅप व मिड कॅप समभागात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांत गुंतवावे. जेणेकरून दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती होऊ शकेल. परताव्याचा दर १५ टक्के जरी गृहित धरला तरी दर पाचव्या वर्षी मुद्दल दुप्पट होईल.
तिसरा पर्याय: एनपीएस खाते उघडावे. त्यात साठाव्या वर्षी ३० लाख जमा करून सर्व रकमेची पेन्शन घ्यावी. जी अंदाजे मासिक १५ हजार असेल. उर्वरित २० लाख दीर्घ मुदतीसाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवावे.
मुंबई विमानतळावरून पुण्याचा द्रुतगती मार्ग गाठण्याचे ढोबळमानाने तीन पर्याय वापरले जातात. पहिला जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्गाचा वापर करून पूर्व द्रुतगती मार्गावरून नवी मुंबई गाठणे. दुसरा कालिना माग्रे नवीन सीएसटी रस्त्याने थेट मानखुर्द माग्रे नवी मुंबई गाठणे व तिसरा सायन मानखुर्द माग्रे नवी मुंबई गाठणे. या पर्यायाची निवड प्रवास सुरु करण्याची वेळ, उपलब्ध वाहन व अन्य गोष्टीवर ठरते. याच प्रमाणे आजच्या नियोजनात तीन पर्याय देण्याचे कारण प्रत्येक आíथक उद्दिष्ट गाठण्यासाठी दोन ते तीन पर्याय असतात. प्रत्येक पर्यायाचे उपजत गुण-दोष असतात. हे गुण-दोष जाणून घेऊन आपल्या मानसिकतेला साजेसा पर्याय निवडणे योग्य असते. जोखीम टाळण्याकडे कल असेल तर पहिला पर्याय उत्तम आहे. मर्यादित जोखीम स्वीकारून परताव्याचा दर थोडा अधिक मिळविणे हे उद्दिष्ट असेल तर दुसरा पर्याय उपलब्ध आहे. मर्यादित जोखीम व मर्यादित परतावा यासाठी तिसरा पर्याय आहे. आजपासून दोन वर्षांपूर्वी जून जुल २०१३ मध्ये भारतात आíथक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलर बरोबरचा रुपयाचा विनिमय दर सत्तरी गाठेल अशी परिस्थिती होती व निफ्टी ५,२०० पर्यंत घसरला होता. अनेक ‘मंथली इन्कम प्लान’ मासिक लाभांश जाहीर करू शकले नाहीत. या स्थितीत दहा वष्रे सुरु असलेल्या एसआयपीच्या परताव्याचा दर चार टक्के होता. आज वाघाच्या काळजाचा आव आणणाऱ्या अनेक मंडळीनी आपल्या एसआयपी नुसत्या बंदच केल्या नाहीत तर त्यातील निधी काढून घेतला. ज्या मंडळींचा बाजारावर विश्वास होता त्यांनी आपल्या एसआयपी सुरु ठेवल्या. म्युच्युअल फंडातील रक्कमही काढली नाही. ज्यांनी नुकसान सोसून धीराने एसआयपी सुरू ठेवली त्यांच्या परताव्याचा दर आज २०-२१ टक्क्यांदरम्यान आहे. आíथक नियोजन करतांना आयकराच्या कलम ‘८० सी’ खाली वजावटीची सवलत प्राप्त गुंतवणुका ठरविताना ‘पीपीएफ’ की ‘ईएलएसएस’ असे द्वैत निर्माण होते व अनेकांचा आग्रह ईएलएसएस असतो. अशा मंडळींची जेव्हा गाठ पडते तेव्हा जून-जुल २०१३३ ची हमखास आठवण होते व ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ असे सांगावेसे वाटते. म्हणूनच पीपीएफ व ईएलएसएस या दोन्ही गोष्टी नियोजनांत हव्या. नियोजन आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेशी साजेसे हवे. तरच नियोजन पूर्णत्वास जाते.
shreeyachebaba@gmail.com