प्रश्न: मी आíथक वर्ष २०१३-१४ सालचे विवरण पत्र अजून भरले नाही. ते मी आता ऑनलाइन भरू शकतो का? माझा दुसरा प्रश्न माझ्या बायकोला कर निर्धारण वर्ष २०१३-१४ साठी २,४४० रुपये भरण्यासाठी प्राप्तीकर खात्याकडून पत्र आले आहे. विवरण पत्रात ७०० रुपयांचा कर परतावा (कठउडटए ळअ फएावठऊ) दर्शविण्यात आला होता. परंतु त्या वर्षीचा कर भरताना चुकून कर निर्धारण वर्ष २०१२-१३ असे दाखविण्यात आले होते. त्यामुळे कर भरण्यासाठी पत्र आले आहे. ही चूक कशी दुरुस्त करावी?
–  सुगम आंबेकर
उत्तर : आíथक वर्ष २०१३-१४ सालचे विवरण पत्र भरण्याची मुदत ३१ जुल २०१४ ही होती (ज्यांना लेखा परीक्षण बंधनकारक नाही अशांसाठी). परंतु हे विवरण पत्र ३१ मार्च २०१५ पूर्वी संगणकाद्वारे ऑनलाइन दाखल करता येईल. जर कर देय असेल तर त्यावर कलम २३४ अ प्रमाणे अतिरिक्त व्याज भरावे लागेल.
दुसऱ्या प्रश्नासंबंधी आपल्याला आपल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याला पत्र लिहून चलानमध्ये कर निर्धारण वर्ष जे चुकीचे भरले आहे ते दुरुस्त करून घ्यावे लागेल. ते घेतल्यानंतर जर विवरण पत्र संगणकाद्वारे भरले असेल तर कलम १५४ खाली देय कराच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आणि विवरण पत्र प्राप्तीकर खात्याकडे जमा केले असेल तर कलम १५४ खाली देय कराच्या दुरुस्तीसाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल.       

प्रश्न: मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्याकडे एका सूचिबद्ध बहुराष्ट्रीय कंपनीचे ८६१ शेअर्स ३० वर्षांपूर्वी विकत घेतलेले आहेत. हे शेअर्स मी माझ्या दुसऱ्या डिमॅट खात्यात जमा केले तर त्यावर कर भरावा लागेल का? मला जर हे शेअर्स विकावयाचे असतील तर किती कर भरावा लागेल?
– दीपक नायक
उत्तर: जर शेअर्स स्वतच्या एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या डिमॅट खात्यात जमा केल्यास कर भरावा लागत नाही. हे शेअर्स जर शेअर बाजारामार्फत विकले आणि त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. हा कर कलम १०(३८) नुसार करमुक्त आहे. जर का हे शेअर्स खाजगीरित्या दुसऱ्याला विकले तर त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला जाणार नाही. त्यामुळे त्यावर आपल्याला २०% (महागाई सूचक मूल्य- इंम्डेक्सेशन विचारात घेऊन) किंवा १०% (महागाई सूचक मूल्य विचारात न घेता) कर भरता येतो.     

प्रश्न: मी इक्विटी मुचुअल फंडात एक लाख रुपये जानेवारी २०१३ मध्ये गुंतविले आहेत आता त्याची किंमत १५ हजार रुपयांनी वाढली आहे. ही गुंतवणूक आता विकली तर मला कर भरावा लागेल का?
– अश्विन काटे
उत्तर: इक्विटी मुचुअल फंडातील गुंतवणूक विकत घेतल्याच्या दिवसापासून एक वर्षांपेक्षा जास्त मुदतीनंतर विकली गेली तर त्यावर कर भरावा लागत नाही.

प्रश्न: मी ऑगस्ट २०१४ मध्ये एक घर विकत घेतले त्यासाठी मी बँकेकडून गृह कर्ज घेतले, एका संस्थेकडून वैयक्तिक कर्ज आणि सहकारी संस्थेकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. या सर्व कर्जाच्या व्याजाची मला माझ्या उत्पन्नातून वजावट मिळविता येईल का?
– डॉ. मदनसिंग  
उत्तर: घरासाठी घेतलेल्या कर्जावर कलम २४ प्रमाणे वजावट मिळते. त्यासाठी ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या कडून मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीचे प्रमाण पत्र घेतले पाहिजे.

प्रश्न: मी जून २०१० साली एक घर विकत घेतले होते. हे घर मी डिसेंबर २०१३ मध्ये विकले. या घरावर मी गृहकर्ज घेतले होते आणि गृहकर्जावर व्याज आणि मुद्दल परतफेडीची वजावट मी प्रत्येक वर्षी घेतली होती. या घरावर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा मी दुसऱ्या घरात गुंतवू शकतो का?
 विजय कोलते
उत्तर: हे घर आपण तीन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर विकल्यामुळे हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आहे आणि या नफ्याएवढी रक्कम आपण नवीन घरामध्ये गुंतवली तर त्यावर कर भरावा लागणार नाही. परंतु आपण २०१० मध्ये घेतलेले घर पाच वर्षांच्या आत विकले आहे त्यामुळे आपण मुद्दल परतफेडीची वजावट जी कलम ८० क कलमाखाली घेतली आहे ती वजावट आपल्या उत्पन्नामध्ये दाखवावी लागेल.

प्रश्न: मी काश्मीर मध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानासाठी काही देणगी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीला (ढ१्रेी ट्रल्ल्र२३ी१ ठं३्रल्लं’ फी’्रीऋो४ल्ल)ि देऊ इच्छिते. मला या देणगीची कर सवलत मिळेल का?
– सुमन िशदे
उत्तर: प्राप्तिकर खात्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीला दिलेली देणगी कलम ८० जी नुसार १०० टक्के वजावटीला पात्र आहे. त्यामुळे आपण या फंडाला दिलेली देणगी पूर्णपणे उत्पन्नातून वजा करता येते.

प्रश्न: मला माझ्या कंपनीकडून ५०,००० रुपयांची वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळाली ही रक्कम करपात्र आहे काय?
सचिन जाधव
उत्तर: वैद्यकीय भरपाई ही १५,००० रुपयांपर्यंत करमुक्त आहे. आपल्याला मिळालेली रक्कम ही ठरावीक रोगासाठी आणि प्राप्तिकर खात्याने मान्यता दिलेल्या इस्पितळात उपचारासाठी खर्च केली असेल  तर १५,००० रुपयांपेक्षा जास्त मिळालेली रक्कम ही करमुक्त ठेवता येईल.

प्रश्न: मी जून २०१४ मध्ये काही शेअर्स विकले त्यावर ३५,००० रुपयांचा अल्प मुदतीचा तोटा झाला. हा तोटा मला माझ्या इतर उत्पन्न जसे व्याज किंवा पगाराच्या उत्पन्नातून ‘सेट ऑफ’ करता येईल का?
– प्रसाद जोशी
उत्तर: भांडवली तोटा हा इतर उत्पन्नातून ‘सेट ऑफ’ करता येत नाही. दीर्घ मुदतीचा तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून ‘सेट ऑफ’ करता येतो आणि अल्प मुदतीचा तोटा हा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या नफ्यातून ‘सेट ऑफ’ करता येतो. हा तोटा आपल्याला पुढील आठ वर्षांसाठी समान विभागता येईल, कॅरी फॉरवर्ड करता येईल. परंतु यासाठी आपल्याला विवरण पत्र मुदतीपूर्वी भरणे गरजेचे आहे.

मी अनिवासी भारतीय आहे. मला ठफए आणि ठफड खात्यासंबंधी माहिती द्या.
– एक वाचक
उत्तर: अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाची व्यक्ती एनआरई आणि एनआरओ खाती बँकेत उघडू शकतात. एनआरई खाती ही बचत, चालू किंवा मुदत ठेवीच्या रुपात असू शकतात. या खात्यात जमा होणारी रक्कम ही भारताबाहेरून पाठवलेली असली पाहिजे किंवा दुसऱ्या एनआरई किंवा एनआरओ खात्यातून जमा केली असली पाहिजे. या खात्यातून गुंतवणूक केलेल्या सरकारी रोखे किंवा म्युच्युअल फंडावर मिळालेले व्याज किंवा लाभांश सुद्धा या खात्यात जमा करता येतो. या खात्यातील रक्कम ही भारताबाहेर पाठवता येते, किंवा दुसऱ्या एनआरई किंवा एनआरओ खात्यात जमा करता येते किंवा भारतीय शेअर्स, रोखे आदींमध्ये गुंतवणूक करता येते. एनआरई खात्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त आहे. एनआरओ खातीसुद्धा बचत, चालू किंवा मुदत ठेवीच्या रुपात असू शकतात. या खात्यात भारताबाहेरून आलेली रक्कम, भारतात मिळणारे व्याज, घर भाडे, पेन्शन, लाभांश, स्थावर किंवा जंगम मालमत्तेची विक्री, इ. जमा करता येते. या खात्यातील ठरावीक रक्कम भारताबाहेर पाठवता येते. त्यासाठी काही अटी आहेत. एनआरओ खात्यावरील मिळणारे व्याज हे करपात्र आहे. बँक या व्याजावर मूळ स्रोतापासून (टीडीएस) ३०% कर कापून घेते.