सध्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मंदीचे वातावरण असल्याने अनेक उत्तम शेअर्स आकर्षक भावात उपलब्ध आहेत. तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या ‘आयपीओ’चे शेअर्सदेखील विक्री केलेल्या किमतीपेक्षा (ऑफर प्राइस) कमी भावात मिळत आहेत. अर्थात ऑफर प्राइसपेक्षा एखादा शेअर कमी भावात उपलब्ध असेल तर ती खरेदी चांगली असे मुळीच नाही. कारण ‘आयपीओ’मध्ये कुठलीही कंपनी बाजाराचा मूड पाहून जास्तीत जास्त अधिमूल्य मिळवण्याचा प्रयत्न करीत असते. आणि शेअर बाजारात काही कालावधीनंतर त्या शेअरचे खरे मूल्य दिसू लागते. अर्थात यालाही काही अपवाद असतातच. आज सुचविलेला इंडोस्टार कॅपिटल फायनान्स ही अशीच अपवाद करण्याजोगी एक कंपनी आहे. या कंपनीचा ‘आयपीओ’ नुकताच, मे २०१८ मध्ये ५६२ रुपये अधिमूल्याने येऊन गेला. आणि आयपीओचा भरणादेखील ६.७७ पटीने झाला होता. मात्र सध्याच्या वातावरणात हा शेअर आयपीओच्या बऱ्याच कमी किमतीत उपलब्ध आहे.

वर्ष २००९ मध्ये स्थापन झालेली इंडोस्टार ही एक आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून रिझव्‍‌र्ह बँकेने तिला ‘सिस्टेमिकली’ महत्त्वाची कंपनीचा दर्जा दिला आहे. प्रामुख्याने कॉर्पोरेट, एसएमई, वाहन कर्ज आणि गृह कर्ज वितरण या चार व्यवसायांत ती असून तिच्या देशभरात दहा प्रमुख शाखा असून व्यवसायानुसार इतर शाखा आहेत. वाहन कर्ज वितरणासाठी गेल्या वर्षभरात कंपनीने ७५ शाखा उघडल्या असून ६०० जणांना नियुक्त केले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखविली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात २५ टक्के  वाढ होऊन ते ५०९.५ कोटीवर तर कर्ज वितरणात १० टक्के वाढ होऊन ते ५,३८८.४ कोटी रुपयांवर गेले आहे. तर कंपनीच्या एकूण मालमत्तांमध्ये (एयूएम) १९ टक्के वाढ होऊन त्या ६,२०७.३ कोटींवर गेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची अनुत्पादित कर्जे केवळ १.१ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. सध्या भारतीय बँकिंग उद्योग संकटात आहे, अनेक सरकारी बँकांना कर्ज वितरणावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मोठय़ा बिगर बँकिंग कंपन्यांना बरे दिवस आले आहेत. गेली काही वर्षे मंदीत असलेला रियल इस्टेट व्यवसाय पुन्हा भरारी घेईल अशी चिन्हे दिसत असून पंतप्रधान आवास योजना, अनेक राज्यांतून सध्या जोरात असलेली ‘अ‍ॅफोर्डेबल हाऊसिंग’ योजना तसेच कंपनीने सुरू केलेली सेकंड हॅण्ड वाहनांसाठी कर्ज योजना या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होईल. नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे थोडा काळ संकुचित झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुधारू लागली आहे. इंडोस्टारसारख्या अनुभवी प्रवर्तक असेलल्या कंपन्या म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात. सध्या ४५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर प्रत्येक मंदीला खरेदी करावा.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
solar waste in india
चिंताजनक अहवाल, २०३० पर्यंत भारतातील सौर कचऱ्यात होणार तब्बल २० पटींनी वाढ

इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड        

(बीएसई कोड – ५४१३३६)

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.